the outbreak of monkeypox has been a wake up call ho soumya swaminathan india
Monkeypox : मंकीपॉक्सचा कहर जगासाठी धोकादायक; WHO च्या मुख्य वैज्ञानिकाचा इशारा By ऑनलाइन लोकमत | Published: July 27, 2022 9:49 AM1 / 10जागतिक आरोग्य संघटनेच्या (WHO) मुख्य शास्त्रज्ञ सौम्या स्वामीनाथन (Soumya Swaminathan) यांनी मंकीपॉक्सचा प्रादुर्भाव (outbreak of Monkeypox) डोळे उघडणारा असल्याचे म्हटले आहे. दरम्यान, स्मॉलपॉक्स लसीकरण कार्यक्रम १९७९-८० पासून बंद असल्याची माहिती एनडीटीव्हीला दिलेल्या विशेष मुलाखतीत त्यांनी दिली.2 / 10मंकीपॉक्सचा प्रादुर्भाव हा आपले डोळे उघडायला लावणारा आहे. प्रत्येक वेळी आपल्याला या घातक प्रादुर्भावापासून सुरक्षेसाठी तयार राहण्याची आवश्यकता आहे. सध्या आपल्याकडे स्मॉलपॉक्सच्या दुसऱ्या आणि तिसऱ्या जनरेशनच्या लसी आहेत. परंतु त्याचे डोस मर्यादित आहेत, असंही त्यांनी स्पष्ट केलं. 3 / 10सौम्या स्वामीनाथन यांनी सांगितले की, डेन्मार्क-आधारित कंपनी बव्हेरियन नॉर्डिकने मंकीपॉक्ससाठी लस विकसित केली आहे. परंतु ती किती प्रभावशाली आहे याचा मात्र डेटा उपलब्ध नसल्याचे त्या म्हणाल्या. हा डेटा त्वरित गोळा करणे आवश्यक असल्याचेही त्यांनी सांगितले. 4 / 10मंकीपॉक्स हा कोविडच्या म्युटेंट विषाणूपेक्षा वाईट असू शकतो का या प्रश्नावर सौम्या स्वामीनाथन म्हणाल्या की या दोघांची थेट तुलना होऊ शकत नाही. डेटा उपलब्ध नसतानाही, हे स्पष्ट आहे की मंकीपॉक्स हा एक वेगळा विषाणू आहे आणि तो कोविड प्रमाणेच त्याच गतीनं म्युटेंट होणार नाही. 5 / 10आम्हाला सिक्वेन्सिंग आणि इतर सर्व गोष्टी करण्याची गरज आहे. आम्हाला डेटाच्या जागतिक शेअरिंगची गरज आहे. आत्ता आम्हाला याची महासाथ बनण्यापासून थांबवायचे आहे. याची लवकर ओळख पटली आहे. भारताबद्दल बोलायचे झाले तर येथे मंकीपॉक्सच्या चार केसेस नोंदवल्या गेल्या आहेत. केरळमध्ये तीन आणि दिल्लीत एक प्रकरण नोंदवले गेले आहे, असेही स्वामीनाथ यांनी सांगितले.6 / 10काय आहे मंकीपॉक्स? - अमेरिकन सेंटर फॉर डिजीज कंट्रोलनुसार, पहिल्यांदा हा आजार १९५८ मध्ये समोर आला होता. तेव्हा रिसर्चसाठी वापरलेल्या एका माकडामध्ये हे संक्रमण आढळून आलं होतं. त्यामुळे याचं नाव मंकीपॉक्स ठेवण्यात आलं. या माकडांमध्ये देवीसारखी लक्षणं दिसली होती.7 / 10वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशननुसार, मनुष्याला मंकीपॉक्स झाल्याची पहिली केली १९७० मध्ये समोर आली होती. तेव्हा कॉन्गोमध्ये राहणाऱ्या एका ९ वर्षाच्या मुलामध्ये हे संक्रमण आढळलं होतं. १९७० नंतर ११ आफ्रिकी देशांमध्ये मनुष्यांना मंकीपॉक्स झाल्याच्या केसेस आढळल्या होत्या. जगात मंकीपॉक्सचं संक्रमण आफ्रिकेतून पसरलं. २००३ मध्ये अमेरिकेत मंकीपॉक्सच्या केसेस समोर आल्या होत्या.8 / 10कसा पसरतो मंकीपॉक्स? - मंकीपॉक्स एखाद्या संक्रमित प्राण्याच्या रक्तातून, त्याच्या शरीरावरील घामातून किंवा त्याच्या जखमांच्या थेट संपर्कात आल्याने पसरतो. आफ्रिकेत उंदरांमध्येही मंकीपॉक्स आढळला. अर्ध शिजलेलं मांस किंवा संक्रमित प्राण्याच्या उत्पादनांचं सेवन केल्यानेही संक्रमण वाढतं. मनुष्यातून मनुष्याला संक्रमण झाल्याच्या फार कमी केसेस समोर आल्या आहेत. मात्र, संक्रमित व्यक्तीला स्पर्श केल्याने किंवा त्याच्या संपर्कात आल्याने हे संक्रमण पसरू शकतं.9 / 10सेक्स केल्यानेही पसरतो मंकीपॉक्स? - मंकीपॉक्स शारीरिक संबंध ठेवूनही पसरतो. समलैंगिक आणि बायसेक्शुअल लोकांना याच्या संक्रमणाचा जास्त धोका राहतो. WHO नुसार, अलिकडे ज्या देशांमध्ये मंकीपॉक्सच्या केसेस समोर आल्या, त्यांच्यातील अनेकांना हे संक्रमण लैंगिक संबंध ठेवल्याने पसरलं. CDC नुसार, जर तुम्ही मंकीपॉक्सने संक्रमित व्यक्तीसोबत संबंध ठेवले तर तुम्हाला संक्रमण होऊ शकतं. संक्रमित व्यक्तीला मिठी मारणे, किस करणे आणि इतकंच काय तर समोरसमोर कॉन्टॅक्स केल्याने संक्रमण परसण्याचा धोका असतो.10 / 10काय आहेत लक्षणे - मंकीपॉक्स व्हायरसचा इन्क्यूबेशन पीरियड ६ ते १३ दिवसांपर्यंत असतो. कधी कधी ५ ते २१ दिवसांपर्यंत होतो. इन्क्यूबेशन पीरियडचा अर्थ संक्रमित झाल्यावर लक्षणं दिसायला किती दिवस लागलेत. संक्रमित झाल्यावर ५ दिवसांच्या आता ताप, डोकेदुखी, सूज, पाठदुखी, मांसपेशींमध्ये वेदना आणि थकवा अशी लक्षणं दिसतात. मंकीपॉक्स सुरूवातीला चिकनपॉक्स, देवीसारखा दिसतो. ताप आल्यावर एक ते तीन दिवसात याचा प्रभाव त्वचेवर दिसू लागतो. शरीरावर पुरळ येऊ लागते. ही पुरळ जखमांसारखी दिसते आणि स्वत:हून सुकून नष्ट होते. आणखी वाचा Subscribe to Notifications