शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

सर्च ऑपरेशन युद्ध सामग्रीचं, पण १३५० फूट खोलावर जे सापडलं ते पाहून सर्वांचेच डोळे विस्फारले!

By ऑनलाइन लोकमत | Published: December 14, 2022 6:16 PM

1 / 7
युरोपमध्ये एका सरोवराच्या सर्वेक्षणादरम्यान संशोधकांना शेकडो वर्षे जुने जहाज सापडले आहे. या सरोवरात संशोधक युद्ध साहित्याचा शोध घेत होते. दरम्यान, त्यांची नजर तलावात १३५० फूट खोलीवर असलेल्या या जहाजावर पडली. शोधकर्त्यांनी सांगितले की, हे जहाज शेकडो वर्षे जुने असूनही अतिशय चांगल्या स्थितीत आहे.
2 / 7
तलावाच्या पृष्ठभागावरून शेकडो वर्षे जुन्या जहाजाचे अवशेष सापडले आहेत. एवढा वेळ लोटूनही जहाज अतिशय सुस्थितीत सापडले आहे. जणुकाही या जहाजासाठी वेळच थांबली आहे. नॉर्वेच्या सर्वात मोठ्या सरोवर मिओसाच्या पृष्ठभागावर हे जहाज सापडले.
3 / 7
जहाजाची आगळीवेगळी रचना आणि त्याच्या फळ्या या तलावाच्या सागरी इतिहासाची साक्ष देतात. हे जहाज १३०० ते १८०० च्या दरम्यानचे असल्याचे सांगितले जात आहे.मिशन मिओसा प्रकल्पाअंतर्गत संशोधकांनी हा शोध लावला आहे. ३६३ स्क्वेअर किलोमीटरमध्ये पसरलेल्या या सरोवराच्या पृष्ठभागामध्ये लपलेली रहस्ये उच्च रिझोल्यूशन सोनार तंत्रज्ञानाने शोधून काढणे हा या मोहिमेचा उद्देश आहे.
4 / 7
नॉर्वेजियन डिफेन्स रिसर्च एस्टॅब्लिशमेंटने सरोवराच्या पृष्ठभागावर दोन महिन्यांच्या निरीक्षणानंतर युद्धातील सामुग्री सापडल्यानंतर ही शोधमोहीम सुरू केली होती. नॉर्वेजियन युनिव्हर्सिटी ऑफ सायन्स अँड टेक्नॉलॉजीच्या मते, हा तलाव पिण्याच्या पाण्याचा प्रमुख स्त्रोत आहे. या तलावातून देशातील सुमारे १ लाख लोकांपर्यंत पाणी पोहोचते. त्यामुळे त्यात युद्धसाहित्य असल्याने नागरिकांचे आरोग्य बिघडण्याची शक्यता होती.
5 / 7
तलावाच्या पाहणीदरम्यान जहाजाचे अवशेष आढळून आले. नॉर्वेजियन युनिव्हर्सिटी ऑफ सायन्स अँड टेक्नॉलॉजीचे वरिष्ठ संशोधक आणि या मिशनचे प्रिन्सिपल इन्व्हेस्टिगेटर ओयविंड ओडेगार्ड म्हणाले की, युद्धातील सामग्रीची माहिती घेत असताना जहाजाचे अवशेष देखील सापडतील अशी आम्हाला अपेक्षा होती आणि तसेच झाले.
6 / 7
जहाजाचा हा अवशेष १३५० फूट खोलवर सापडला आहे. या जहाजाची लांबी ३३ फूट असल्याचे सांगण्यात येत आहे. सरोवरातील स्वच्छ पाण्याचे वातावरण आणि लाटांच्या अनुपस्थितीमुळे जहाज त्याच्या मूळ स्थितीत असल्याचे दिसते. मात्र, काही लोखंडी खिळ्यांना नक्कीच गंज चढला आहे.
7 / 7
जहाजाची रचना पाहून पुरातत्व विभागाच्या लोकांनी अंदाज लावला आहे की, हे जहाज १३०० ते १८५० च्या दरम्यान बांधले गेले असावे. हे जहाज तलावाच्या मध्यभागी सापडले आहे. त्यामुळेच हे जहाज खराब हवामानामुळे बुडाले असावे, असे ओयविंड ओडेगार्ड यांचे मत आहे.
टॅग्स :Internationalआंतरराष्ट्रीयJara hatkeजरा हटके