Their marriage was on 36 thousand feet
पोप फ्रान्सीस यांच्या साक्षीने 36 हजार फुटांवर झाला त्यांचा विवाह By ऑनलाइन लोकमत | Published: January 19, 2018 4:48 PM1 / 5लग्नाच्या गाठी स्वर्गातच बांधलेल्या असतात असं म्हटलं जातं. पण एका जोडप्याची लग्नगाठ मात्र हवेतच 36 हजार फूट उंचीवर बांधली गेली तिही पोप फ्रान्सीस यांच्या साक्षीने. 2 / 5चिलीच्या विमानवाहतूक कंपनीच्या विमानामध्ये कार्यरत असणाऱ्या पाऊला पोडेस्ट आणि कार्लोस सियुफर्डी यांचा विवाह पोप फ्रान्सीस यांनी विमानातच लावून दिला.3 / 5या दोघांच्या विवाहाचे विधी चर्चमध्ये पार पडले नव्हते. त्यामुळे पोप फ्रान्सीस यांनी तात्काळ मी तुमचं लग्न लावून देतो असे सांगितले आणि विमानाचे सर्व कर्मचारी या अनोख्या विवाहसोहळ्याचे साक्षीदार झाले. 4 / 5 पोप यांनी विमानात लग्न लावून दिल्याचं कधीही घडलेलं नाही.' कार्लोस आणि पाऊला यांना दोन मुले आहेत. 5 / 52010 साली चिलीमध्ये झालेल्या भूकंपात चर्चचे नुकसान झाल्यामुळे तेथे विवाह सोहळा पार पाडता आला नव्हता. आणखी वाचा Subscribe to Notifications