Theres no country in the world when wives earn more than husbands
काय म्हणता! जगात एकही असा देश नाही की जिथं पत्नी पतीपेक्षा अधिक कमावते; आश्चर्यकारक माहिती वाचा... By ऑनलाइन लोकमत | Published: October 15, 2021 1:42 PM1 / 11गेल्या चार दशकांमध्ये विविध जोडप्यांवर करण्यात आलेल्या जागतिक स्तरावरील संशोधनात पती आणि पत्नीच्या मिळकतीबाबत धक्कादायक माहिती समोर आली आहे. बंगलोरमधील इंडियन इन्स्टीट्यूट ऑफ मॅनेजमेंटमधील सेंटर ऑफ पब्लिक पॉलिसीच्या संशोधनकर्त्यांनी १९७३ आणि २०१६ दरम्यान एकूण ४५ देशांमधील २८.५ लाख घरांची सार्वजनिक पातळीवर उपलब्ध आकडेवारीवरुन एक माहिती जमा केली आहे. 2 / 11घरातील कामं करण्यासाठी महिला दिवसातील अनेक तास व्यतित करतात. खूप मेहनत घेतात आणि त्यासाठी त्यांना कोणतंही मानधन मिळत नाही. आंतरराष्ट्रीय कामगार संघटनेच्या (ILO) माहितीनुसार, कोणत्याही मानधनाविना काम करण्यात महिला आघाडीवर आहेत. यात इराकमध्ये याचा सर्वाधिक आकडा आहे. 3 / 11इराकमध्ये महिला दर दिवशी ३४५ मिनिटं कोणत्याही मानधनाविना काम करतात. तर तैवानमध्ये हा आकडा सर्वात कमी म्हणजे १६८ मिनिटं इतका आहे. 4 / 11पुरुषांच्या बाबतीत कोणत्याही मानधनाविना कराव्या लागणाऱ्या घरगुती कामांमध्ये पुरूष दिवासीतील केवळ ८३ मिनिटं खर्च करतात. तर महिला पुरुषांपेक्षा तीन पट अधिक म्हणजेच २६५ मिनिटं खर्च करतात. 5 / 11टाइम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार जेव्हा दोघंही म्हणजेच पती आणि पत्नी नोकरी करतात. त्यातही जगात एकही असा देश नाही की जिथं पत्नी आपल्या पती इतकं कमावतात. इतकंच नव्हे, तर जगातील सर्वात संपन्न देशांमध्येही हिच परिस्थिती आहे. 6 / 11बंगलोरमधील इंडियन इंस्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंटच्या सेंटर फॉर पब्लिक पॉलिसीमधील प्राध्यापक दीपक मघलन यांच्या मतानुसार महिलांच्या कमाईचा वाटा प्रत्येक ठिकाणी ५० टक्क्यांहून कमी असल्याचं आढळून आलं आहे. 7 / 11 रिसर्च करणाऱ्या संशोधकांच्या म्हणण्यानुसार पुरुषांपेक्षा महिलांची कमाई कमी असण्याचं मुख्य कारण संपूर्ण जगाला ठावूक आहे. पुरुषांकडे सांस्कृतिक पद्धतीनं कमावता माणूस आणि महिलांकडे गृहिणीच्या रुपात पाहिलं जातं. बहुतांश महिला मुलांना जन्म दिला की नोकरी सोडून देतात. कोणतंही मानधन न मिळणारं काम आणि देखभाल यातच महिलांचा दिवस व्यतित होतो. 8 / 11एक चांगली गोष्ट अशी की संशोधकांच्या माहितीनुसार १९७३ ते २०१६ मधील घरगुती असमानता २० टक्क्यांपेक्षा कमी झाली आहे. याचं संपूर्ण श्रेय महिलांना जातं. कष्टाची काम करण्यात पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून महिला काम करू लागल्या आहेत. इतकंच नव्हे, तर महिलांना समान दर्जा आणि समान काम, समान वेतन दिलं जाण्यासाठी केल्या गेलेल्या आंदोलनांचंही यात मोठं योगदान आहे. 9 / 11ग्लोबल जेंडर गॅप रिपोर्ट २०२१ नुसार जगात सर्वात अधिक लैंगिक समानता असणाऱ्या देशांमध्ये आइसलँड पहिल्या क्रमांकावर आहे. त्यानंतर फिनलँड आणि नॉर्वेचा क्रमांक लागतो. तर न्यूझीलंड चौथ्या स्थानावर आहे. असं असलं तरी स्वीडनमध्ये अजूनही एक महिला पुरुषाच्या १ डॉलर कमाईच्या तुलनेत केवळ ८६ सेंट इतकं कमावतात. 10 / 11२०२१ मध्ये भारताच्या स्थानात तब्बल २८ स्थानांची घसरण झाली आहे. रँकिंगमध्ये समाविष्ट असलेल्या एकूण १५६ देशांमध्ये भारत १४० व्या क्रमांकावर आहे. भारत संपूर्ण दक्षिण आशियाई देशांमध्ये सर्वात खालच्या स्थानावरील तिसरा देश आहे. तर पाकिस्तान आणि अफगाणिस्तानची सर्वात वाईट परिस्थिती आहे. विशेष म्हणजे दक्षिण आशियाई देशांमध्ये बांगलादेश अव्वल क्रमांकावर आहे.11 / 11भारतात महिला घरगुती कामांवर दिवासाी २९७ मिनिटं खर्च करतात तर पुरुष केवळ ३१ मिनिटं खर्च करतात. एकूण पुरुषांमध्ये केवळ एक चतुर्थांश भागच पुरूष मानधनाविना करावी लागणारी कामं करतात. तर महिलांच्या बाबतीत हाच आकडा प्रत्येक ५ महिलांमागे चार महिला घरगुती कामांमध्ये वेळ व्यतित करतात. यावरुनच आकडेवारीची माहिती समोर येते. आणखी वाचा Subscribe to Notifications