These are the most expensive currencies in the world
ही आहेत जगातील सर्वात महागडी चलने By ऑनलाइन लोकमत | Published: November 14, 2019 3:08 PM1 / 10भारतासह जगभरातील बहुतांश चलनांचे मूल्यमापन हे अमेरिकन डॉलरच्या तुलनेत केले जाते. त्यातून अमेरिकन डॉलर हे जगातील सर्वात शक्तिशाली चलन असल्याचे दिसून येते. मात्र अमेरिकन डॉलरपेक्षाही काही चलने अधिक महागडी आहेत. अशाच चलनांचा हा आढावा. 2 / 10स्विस फ्रँक हे सर्वात महागड्या चलनांपैकी एक आहे. एक स्विस फ्रँकसाठी 71.86 रुपये मोजावे लागतात. 3 / 10अमेरिकन डॉलर हे जगातील सर्वात मजबूत चलन मानले जाते. एका अमेरिकन डॉलरसाठी 70.89 मोजावे लागतात. 4 / 10युरोपियन देशांनी एकत्र येत स्थापन केलेल्या युरोपियन युनियनचे युरो हे सामाईक चलन आहे. एका युरोसाठी 79.13 रुपये मोजावे लागतात. 5 / 10ब्रिटनचे चलन पौंड्स महागड्या चलनांपैकी एक आहे. एका पौंड्ससाठी 91.86 रुपये मोजावे लागतात. 6 / 10जिब्राल्टरचे चलन असलेले जिब्राल्टर पौंड्ससुद्धा बऱ्यापैकी महाग आहे. एका जिब्राल्टर पौंड्ससाठी 87.21 रुपये मोजावे लागतात.7 / 10लाटव्हिया या छोट्या देशाचे चलनसुद्धा बऱ्यापैकी महागडे आहे. एका लाटव्हिया लाटसाठी तब्बल 112.07 रुपये मोजावे लागतात. 8 / 10ओमान या देशाचे चलन ओमान रियाल प्रचंड मजबूत आहे. एका ओमान रियालसाठी 184.42 रुपये मोजावे लागतात. 9 / 10बहरीन या देशाचे चलन बहरीन दिनारसुद्धा बऱ्यापैकी महाग आहे. एका बहरीन दिनारसाठी 188.08 रुपये मोजावे लागतात. 10 / 10कुवेत या देशाचे चलन कुवेत दिनार इतर चलनांपेक्षा फार महाग आहे. एका कुवेत दिनारसाठी 233.77 रुपये मोजावे लागतात. आणखी वाचा Subscribe to Notifications