These are the most remote places in the world, no one can think of going here
या आहेत जगातील सर्वात दुर्गम जागा, कुणी करू शकत नाही इथे जाण्याचा विचार By ऑनलाइन लोकमत | Published: February 20, 2020 5:22 PM1 / 12सुमारे दोन लाख चौकिमी विस्तार असलेले थारचे वाळवंट भारत आणि पाकिस्तानमध्ये पसरलेले आहे. यातील बहुतांश भाग वालुकामय आहे. येथे वाळूचे मोठमोठे ढीग असून, ते वाहत्या वाऱ्यामुळे आपली जागा बदलत असतात. 2 / 12चीनमध्ये असलेल्या ताकलामाकान वाळवंटाचा विस्तार सुमारे 2 लाख 70 हजार चौकिमी आहे. येथे मनुष्यवस्ती फार विरळ आहे. 3 / 12अमेरिका आणि मेक्सिकोमध्ये पसरलेल्या सोनोरन वाळवंटाचा विस्तार 3 लाख 10 हजार चौकिमी आहे. 4 / 12अमेरिकेतील कोलोराडो पठाराचा विस्तार सुमारे 3 लाख 37 हजार चौकिमी आहे. 5 / 12अमेरिकेतील सीरियन वाळवंटाचा विस्तार 4 लाख 92 हजार चौकिमी आहे. 6 / 12पॅटागोनियन वाळवंट हे अर्जेंटिना आणि चिली या देशांमध्ये पसरलेले आहे. या वाळवंटाचे क्षेत्रफळ 6 लाख 20 हजार चौकिमी आहे. 7 / 12दक्षिण आफ्रिकेत असलेल्या कालाहारी वाळवंटाचा समावेश जगातील सर्वात मोठ्या वाळवंटांमध्ये होतो. त्याचे क्षेत्रफळ 9 लाख चौकिमी इतका आहे. 8 / 12 चीन आणि मंगोलिया या देशांमध्ये पसरलेल्या गोबीच्या वाळवंटाचा विस्तार हा 10 लाख चौकिमी इतका आहे. 9 / 12अरेबियन वाळवंट हे इराक, जॉर्डन, कुवेत, ओमान, कतार, सौदी अरेबिया, संयुक्त अरब अमीराती आणि येमेन या देशांमध्ये पसरलेले आहे. या वाळवंटाचा विस्तार 23 लाख 30 हजार चौकिमी आहे. 10 / 12सहारा महावाळवंट हे अल्जीरिया, चाड, इजिप्त, इरिट्रिया, लीबिया, माली, मोरिटानिया या देशात पसरलेले आहे. 11 / 12आर्क्टिक प्रदेश अलास्का, कॅनडा, फिनलँड, ग्रीनलँड, आइसलँड, नॉर्वे, रशिया आणि स्वीडन या देशांमध्ये पसरलेला आहे. 12 / 12संपूर्ण बर्फाच्छादित असलेले अंर्टार्क्टिका खंड पूर्णपणे निर्मनुष्य आहे. काही संशोधक आणि हौशी पर्यटक वगळता सहसा इथे कुणीही जात नाहीत. आणखी वाचा Subscribe to Notifications