शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

ही आहेत मुस्लिम राष्ट्रांमध्ये असलेली काही जगप्रसिद्ध हिंदू मंदिरे

By ऑनलाइन लोकमत | Published: September 18, 2019 3:34 PM

1 / 6
सध्या भारत आणि नेपाळ या दोनच देशात हिंदू बहुसंख्येने राहत असले तरी हिंदू संस्कृतीच्या खुणा जगातील बहुतांश ठिकाणी आढळून येतात. आज आपण जाणून घेऊयात मुस्लिम देशात असलेल्या काही जगप्रसिद्ध हिंदू मंदिरांविषयी...
2 / 6
कटासराज मंदिर पाकिस्तानमधील चकवाल जिल्ह्यात आहे. या मंदिराच्या आवारात पौराणिक पार्श्वभूमी असलेले एक तलाव आहे. तसेच या मंदिराच्या आवारात शिवमंदिरासोबत राम आणि हनुमान यांची मंदिरे आहेत.
3 / 6
मलेशियामध्ये तामिळ वंशाचे बरेच हिंदू राहतात. त्यामुळे मलेशियामध्ये बरीच हिंदू मंदिरे आढळतात. गोमबाकमधील बातू गुहांच्या परिसरात अनेक हिंदू मंदिरे आहेत. तसेच या गुहांच्याा प्रवेशद्वाराजवळ भगवान मुरुगनची मोठी मूर्ती आहे.
4 / 6
इंडोनेशिया हा जगातील सर्वाधिक मुस्लिम लोकसंख्या असलेला देश म्हणून ओळखला जातो. मात्र येथील लोकजीवनावर जूनही हिंदू संस्कृतीचा प्रभाव दिसून येतो. येथे मोठ्या प्रमाणावर हिंदू मंदिरे असून, प्रामबानान मंदिर त्यापैकीच एक आहे.
5 / 6
मुस्लिमबहूल असलेल्या बांगलादेशची राजधानी ढाका येथे ढाकेश्वरी मंदिर आहे. बांगलादेशच्या कानाकोपऱ्यातून हिंदू भाविक येथे दर्शनासाठी येतात.
6 / 6
ओमानमध्ये हिंदूंची संख्या फार कमी आहे. मात्र ओमानची राजधानी मस्कत येथील श्रीकृष्ण मंदिर प्रसिद्ध आहे. या मंदिराला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 2018 मध्ये भेट दिली होती.
टॅग्स :TempleमंदिरHinduहिंदूInternationalआंतरराष्ट्रीय