शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

या आहेत जगातील सर्वात मोठ्या नॉन स्टॉप फ्लाइट, अवघ्या काही तासांत कापतात हजारो किमी अंतर

By ऑनलाइन लोकमत | Published: August 01, 2018 3:52 PM

1 / 6
जगातील एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाण्यासाठी विमान प्रवास हे सोईस्कर प्रवास साधन बनले आहे. काही लांब पल्ल्याच्या विमानफेऱ्या तर काही तासांमध्ये हजारो किमी अंतर पार करत असतात. अशाच विमानफेऱ्यांवर टाकलेला हा दृष्टिक्षेप.
2 / 6
कतार एअरवेजची सर्वात मोठी नॉन स्टॉप फ्लाइट दोहा ते ऑकलंड हे 14 हजार 536 किमी अंतर अवघ्या 18 तासांत पार करते. ही जगातील सर्वात मोठी नॉनस्टॉप फ्लाइट आहे.
3 / 6
क्वांटास एअरलाइन्सची पर्थ ते लंडन ही फ्लाइट 14 हजार 500 किमी अंतर अवघ्या 17 तास 20 मिनिटात पार करते.
4 / 6
एमिरेट्स एअरलाइन्सची दुबई ते ऑकलंड दरम्यान चालणारी विमान फेरी जगातील तिसरी सर्वात मोठी फ्लाइट आहे. ही विमान फेरी 17 तास 15 मिनिटांमध्ये 14 हजार 200 किमी अंतर कापते.
5 / 6
युनायटेड स्टेट फ्लाइटची लॉस एन्जलीस ते सिंगापूर दरम्यानची विमानफेरी 17 तास 50 मिनिटांमध्ये 14 हजार 114 किमी अंतर कापते.
6 / 6
युनायटेड स्टेट एअरलाइन्सची ह्युस्टनहून सिडनीला जाणारी विमान फेरी 17 तास 30 मिनिटांमध्ये 13 हजार 834 किमी अंतर कापते.
टॅग्स :airplaneविमानnewsबातम्या