these cities inspire to fighting against global warming
ही शहरे देताहेत ग्लोबल बॉर्मिंगशी लढण्याची प्रेरणा By ऑनलाइन लोकमत | Published: October 17, 2019 3:27 PM1 / 8ग्लोबल वॉर्मिग अर्थात जागतिक तापमान वाढ ही सध्या जगासमोरील गंभीर समस्या बनलेली आहे. ग्लोबल वॉर्मिंग रोखण्यासाठी जागतिक पातळीवर विविध प्रयत्न सुरू आहेत. दरम्यान, जगात अशी काही शहरे आहेत. ज्यांनी ग्लोबल वॉर्मिंग रोखण्यासाठी सुरू केलेेले प्रयत्न अन्य शहरांसाठी प्रेरणादायी ठरू शकतात. अशाच शहरांचा घेतलेला हा आढावा...2 / 8ग्लोबल वॉर्मिंगला आळा घालण्यासाठी मेडेलिन शहरात 2016 पासून 30 ग्रीन कॉरिडॉर विकसित केले जात आहेत. त्याअंतर्गत 9 हजार झाले लावण्यात आली असून, त्यामुळे शहरातील तापना दोन डिग्री सेल्सिअसने कमी झाले आहे. 3 / 8आफ्रिकी देश असलेल्या घानामधील अक्रा येथे सरकार 600 कचरावेचकांसोबत काम करत आहे. हे लोक पूर्वी कचरा वेचून जाळत असत. मात्र आता हा कचरा रिसायकल केला जात आहे. 4 / 8ग्लोबल वॉर्मिंग रोखण्यासाठी भारतातील कोलकाता या शहरानेही महत्त्वपूर्ण असे पाऊल उचलले आहे. कोलकात्यात इलेक्ट्रिक बस रस्त्यावर आणण्यात आल्या आहेत. आतापर्यंत अशा 80 इलेक्ट्रिक बस खरेदी करण्यात आल्या आहेत. 2030 पर्यंत सुमारे 30 हजार इलेक्ट्रिक बस खरेदी करण्याची योजना आहे. 5 / 8शहरातील प्रदूषण रोखण्यासाठी लंडनमध्ये अल्ट्रा लो इमिशन अमलात आणले गेले आहे. त्याअंतर्गत शहरात येणाऱ्या वाहनांना प्रदूषण नियमनाबाबतचे कडक नियम पाळावे लागतात. 6 / 8सॅन फ्रान्सिस्को शहरात क्लीनपावरएसएफ योजनेंतर्गत नागरिकांना अपारंपरिक स्रोतांमधून निर्माण झालेली वीज पुरवली जात आहे. त्यामुळे 2025 पर्यंत ग्रीन हाऊस गॅसचे उत्सर्जन 40 टक्क्यांनी कमी होईल, असा प्रशासनाचा अंदाज आहे. 7 / 8ग्वांग्झूमधील शहर प्रशासनाने शहर परिवहनमधील सर्व 11 हजार 200 बसचे इलेक्ट्रॉनिक बसमध्ये परिवर्तन केले आहे. यामुळे शहरातील वायू प्रदूषण आणि ध्वनी प्रदूषण मोठ्या प्रमाणात कमी झाले आहे. 8 / 8दक्षिण कोरियाची राजधानी सियोलमध्ये 10 लाख घरांमध्ये सोलर पॅनेल बसवण्यासाठी सब्सिडी दिली आहे. त्याअंतर्गत 2022 पर्यंत 1 गीगावॅट ऊर्जेचे उत्पादन होण्याची अपेक्षा आहे. आणखी वाचा Subscribe to Notifications