These countries are still at risk of ISIS
या देशांना अजूनही आहे आयएसचा धोका By ऑनलाइन लोकमत | Published: November 04, 2019 10:50 PM1 / 7आयएसआयएचा म्होरक्या अबू बक्र अल बगदादीचा अमेरिकेच्या फौजांनी नुकताच खात्मा केला. अमेरिकेच्या सैनिकांनी घेरल्यानंतर बगदादीने बॉम्बने उडवून घेत आत्मघात केला. मात्र बगदारीचा मृत्यू झाला तरी आयएसआयएसचा जगाला असलेला धोका कमी झालेला नाही. आज जाणून घेऊयात आयएसचा सर्वाधिक धोका असलेल्या देशांविषयी. 2 / 7अमेरिकेचे पाठबळ असलेल्या फौजेकडून पराभव झाला असला तरी इराकला असलेला आयएसचा धोका टळलेला नाही. आयएसचे सुमारे दोन हजार दहशतवादी अजूनही इराकच्या विविध प्रांतात लढत आहेत. 3 / 7सीरियामध्ये पिछेहाट झाली असली तरी आयएसआयएचा अद्याप बीमोड झालेला नाही. सीरियातील पूर्व आणि वाळवंटी भागात आयएसआयएसचे दहशतवादी अद्याप दबा धरून आहेत. 4 / 7इजिप्तमध्ये गेल्या वर्षभरात कुठलाही मोठा हल्ला झालेला नाही. मात्र येथेही काही छोटे हल्ले झाले होते. 5 / 7आयएसआयएसने सौदी अरेबियामध्ये अनेक मोठे बॉम्बस्फोट घडवून आणले आहेत. त्यांनी सैन्य दलांसोबत अल्पसंख्याक शिया मुस्लिमांनाही लक्ष्य बनवले. सौदीमध्ये आयएसचे दहशतवादी सक्रिय आहेत. मात्र याविषयी अधिकाऱ्यांना माहिती आहे. 6 / 7येमेनमध्येसुद्धा आयएसचे अस्तित्व आहे. मात्रे येथे आयएसला अल कायदासोबतही लढावे लागत आहे. 7 / 7उत्तर नायजेरियामध्ये 2009 पासून बोको हराम या दहशतवादी संघटनेने मोठ्या प्रमाणात हिंसाचार घडवला आहे. त्यात हजारो नागरिकांचे बळी गेले आहे. मात्र या संघटनेचे दोन गटांत विभाजन झाले आहे. त्यातील एक गट स्वत:ला आयएसचा निकटवर्तीय मानतो. आणखी वाचा Subscribe to Notifications