third wave of corona virus in 22 countries of the world and patient gone over 13 crore
भयंकर! जगातील २२ देशांमध्ये कोरोनाची तिसरी लाट; रुग्णसंख्या १३ कोटी ३० लाख By ऑनलाइन लोकमत | Published: April 08, 2021 12:39 PM1 / 15गेल्या काही दिवसांपासून भारतातील कोरोना परिस्थिती गंभीर होत चालली आहे. कोरोना विस्फोटामुळे भारतात दुसरी लाट आल्याचा अंदाज वर्तवला जात आहे. ही लाट नसून त्सुनामी असल्याचे बोलले जात आहे. 2 / 15एकीकडे भारतामध्ये करोना रुग्ण वाढत असतानाच दुसरीकडे जगभरातील २२ देशामध्ये करोनाची तिसरी लाट आल्याचे सांगितले जात आहे. ब्राझील, फ्रान्स, युक्रेन आणि रशिया यांसारख्या देशांचा यात प्रामुख्याने समावेश आहे. 3 / 15जगभरामध्ये कोरोनाचे १३ कोटी ३० लाखांहून अधिक रुग्ण आढळून आल्याची माहिती एका वृत्तसंस्थेने दिली आहे. यापैकी २८ लाख ८६ हजार जणांचा मृत्यू झाल्याचे समजते. 4 / 15जागतिक स्तरावर १० कोटी ७२ लाख जणांनी करोनावर मात केली असून, २ कोटी २८ लाख लोकांवर उपचार सुरू आहे. उपचार सुरू असणाऱ्यांपैकी २ कोटी २७ लाख जणांना कोरोनाची कमी अधिक प्रमाणात लक्षणे दिसून येत आहेत.5 / 15एकूण उपाचाराधीन रुग्णांपैकी ९९ हजार ५०० हून अधिक जणांची प्रकृती चिंताजनक आहे. जगभरामध्ये करोनाचा प्रादुर्भाव अंत्यंत वेगाने होत असून यासंदर्भात चिंता व्यक्त केली जात आहे. धक्कादायक बाब म्हणजे जगातील अनेक देशांमध्ये लसीकरणाला सुरुवात झाल्यानंतरही अगदी वेगाने कोरोनाचा प्रादुर्भाव होऊ लागल्याचे सांगितले जात आहे. 6 / 15जगभरामध्ये करोनाची दुसरी लाट सर्वाधिक घातक ठरत आहे. या लाटेमध्ये कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढलीय आणि सर्वाधिक मृत्यू सुद्धा याच कालावधीमध्ये झाले असल्याचे म्हटले जात आहेत.7 / 15२१ फेब्रुवारी रोजी जगामध्ये सर्वात कमी म्हणजे तीन लाख २२ हजार रुग्ण आढळून आले होते. या कालावधीत कोरोना लसीकरणाचा वेग वाढवण्यात आला असला, तरी सध्या दिवसाला ५ लाखांहून अधिक कोरोनाबाधित रुग्ण जगभरामध्ये आढळून येत आहेत.8 / 15ब्राझीलमध्ये पहिल्या लाटेत दिवसाला ७० हजार कोरोना रुग्ण आढळून आले होते. तर, दुसऱ्या लाटेत ९७ हजारांहून अधिक झाल्याचे दुसऱ्या लाटेत पहायला मिळाले. आता येथे कोरोनाची तिसरी लाट आली आहे, असे सांगितले जात आहे. 9 / 15अमेरिकेत पहिल्या लाटेमध्ये येथे ८० हजारांहून अधिक रुग्ण एका दिवसात आढळून येत होते. दुसऱ्या लाटेमध्ये या संख्येत एक हजार पटींनी वाढ झाली असून, दुसऱ्या लाटेत एका दिवशी अमेरिकेत तब्बल ३ लाख ८० हजार रुग्णही आढळून आलेत. 10 / 15जपानमध्ये काही दिवसांनी ऑलम्पिकला सुरुवात होणार असून, कोरोनाच्या वाढत्या रुग्णांमुळे चिंता व्यक्त केली जात आहे. जपानमध्ये तर कोरोनाची चौथी लाट येईल, अशी भीती व्यक्त करण्यात आली आहे. 11 / 15युरोपमधील ५१ देशांमध्ये आतापर्यंत ११ लाख जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. युनायटेड किंग्डम, रशिया, फ्रान्स, इटली आणि जर्मनीसह ५ युरोपीयन देशांमध्ये एकूण कोरोना मृत्यूंपैकी ६० टक्के मृत्यूंची नोंद करण्यात आली आहे. 12 / 15अमेरिकेत कोरोनामुळे मरण पावलेल्यांची संख्या ५ लाख ५५ हजार इतकी आहे. कोणत्याही देशात कोरोनामुळे झालेले हे सर्वाधिक मृत्यू असून, गेल्या ३ आठवड्यांमध्ये अमेरिकेतील मृत्यूंचे प्रमाण पुन्हा एकदा वाढताना दिसत आहे.13 / 15एका जारी केलेल्या डेटानुसार, जगात रविवारपर्यंत किमान ३७ कोटी ३० लाख जणांना करोना लसीचा पहिला डोस देण्यात आला आहे. दुसरीकडे, जागतिक आरोग्य संघटनेकडून (WHO) जगातील गरीब देशांना लस पुरवठा करण्यासाठी मोठ्या देशांनी पुढाकार घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.14 / 15दरम्यान, भारतामध्ये एका दिवसांत सव्वा लाखांहून अधिक रुग्ण आढळून आले आहेत. कोरोना रुग्णसंख्येने एक लाखांचा टप्पा ओलांडण्याची देशात गेल्या चार दिवसातील ही तिसरी वेळ आहे. देशात आतापर्यंत ९ कोटी १ लाख ९८ हजार ६७३ जणांना कोरोना लस देण्यात आली आहे. 15 / 15कोरोनाचा सर्वाधिक फटका महाराष्ट्राला बसला असून, काल दिवसभरात राज्यात तब्बल ३२२ करोना रुग्णांचा मृत्यू झाला. राज्यातील एकूण मृतांचा आकडा ५६ हजार ६५२ वर गेला. तसेच २४ तासांत राज्यात ५९ हजार ९०७ नव्या कोरोनाबाधितांची नोंद करण्यात आली आहे. आणखी वाचा Subscribe to Notifications