शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Heera Zeeshan: १६ वर्षांपासून दर आठवड्यात नववधूप्रमाणे सजते ही महिला, समोर आलं असं कारण

By ऑनलाइन लोकमत | Published: May 29, 2022 10:09 PM

1 / 7
लग्नावेळी नववधूचा थाट हा खास असाच असतो. आपणही लग्नात लक्षवेधी थाट करावा, असं प्रत्येक वधूला वाटत असतं. मात्र पाकिस्तानमधील एक महिला गेल्या १६ वर्षांपासून दर आठवड्यात नववधूप्रमाणे सजते. हीरा जीशान असं तिचं नाव आहे. सध्या ती सोशल मीडियावर चांगलीच चर्चेत आहे. तसेच लोक तिला जुम्मा ब्रायडल म्हणून ओळखतात.
2 / 7
हीरा जीशान गेल्या १६ वर्षांपासून न चुकता दर आठवड्यात हा रिवाज पाळत आहे. असं नाही की ती केवळ वधूप्रमाणे कपडे घालते. तर ती हातांमध्ये मेंहंदी लावून पूर्ण श्रृंगार करते.
3 / 7
४२ वर्षीय हीरा जीशान दर शुक्रवारी वधुसारखा थाट करते त्यामुळे लोक तिला जुम्मा ब्रायडल या नावाने ओळखतात.
4 / 7
हीरा जीशान केवळ पाकिस्तानमध्येच नाही तर टिकटॉक आणि इन्स्टाग्रामच्या माध्यमातून संपूर्ण जगामध्ये तिच्या अजब शौकामुळे फेमस झाली आहे.
5 / 7
१६ वर्षांपासून सुरू असलेल्या या परंपरेत तिने कुठल्याही शुक्रवारी खंड पडू दिलेला नाही.
6 / 7
पाकिस्तानच्या एका फॅशन मॅगझिनला दिलेल्या मुलाखतीमध्ये हीराने सांगितले की, १६-१७ वर्षांपूर्वी तिची आई आजारी पडली होती. त्यानंतर तिला रुग्णालयात दाखल करावे लागले होते. मरण्यापूर्वी आपल्या मुलीला वधूच्या वेशात पाहण्याची आजारी आईची इच्छा होती. त्यामुळे ज्या व्यक्तीने तिच्या आईला रक्त दिले होते. त्याच्याशीच तिने लग्न केले.
7 / 7
त्यामुळे ती आपल्या विवाहामध्ये कुठलीच तयारी आणि हौसमौज करू शकली नाही. एवढंच नाही तर तिची वरातही रिक्षेतून निघाली. त्यानंतर हिराच्या आईचा मृत्यू झाला. त्यामुळे आता ती तिच्या जीवनातील दु:ख विसरण्यासाठी दर आठवड्यात वधूप्रमाणे सजते आणि इतर दिवसांमध्ये या दिवसाची तयारी करते.
टॅग्स :Pakistanपाकिस्तानmarriageलग्न