घरी परतली पण दोन बोटं गमावली! तीन इस्रायली नागरिकांची १५ महिन्यांनी सुटका, ह्रदयद्रावक क्षण नेतन्याहूंनी केले शेअर
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 20, 2025 13:59 IST
1 / 7युद्ध विराम करारानंतर तेल अवीवमधील वातावरण बदलून गेले. गेल्या १५ महिन्यांपासून हमासच्या कैदेत असलेल्या तीन इस्रायली नागरिक परतताच कुटुंबीयांना अश्रू अनावर झाले.2 / 7इस्रायल-हमास यांच्या युद्ध शस्त्रसंधी झाल्यानंतर पहिल्या टप्प्यात तीन इस्रायली महिला घरी परतल्या, ज्यांना हमासने ओलीस ठेवले होते.3 / 7रोमी जोनेन, डोरोन स्टीनब्रीचर आणि एमिली डेमरी या तीन महिलांची हमासने सुटका केली. यांना रेड क्रॉस अधिकाऱ्यांच्या ताब्यात देण्यात आले. त्यानंतर त्या इस्रायलमध्ये परतल्या.4 / 7हमासच्या अतिरेक्यांनी ७ ऑक्टोबर २०२३ रोजी हल्ला केला होता. या हल्ल्यात १२०० इस्रायली नागरिक मारले गेले होते. त्याचवेळी या तीन महिलांना अतिरेक्यांनी पकडून ओलीस ठेवले होते.5 / 7या तीन महिलांच्या मोबदल्यात इस्रायलने ९० पॅलेस्टिनी कैद्यांची सुटका केली आहे. करारानुसार पहिल्या टप्प्यात सुटका झालेले ओलीस परतल्यानंतरच्या क्षणांचे व्हिडीओ इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांनी शेअर केला आहे. 6 / 7इस्रायलचा ध्वज खांद्यावर घेऊन तीन महिला त्यांच्या कुटुंबीयांना भेटल्या. आपल्या माणसांना भेटल्यानंतर तिघींच्याही अश्रूंचा बांध फुटला. कुटुंबातील सदस्यांच्या गळ्यात पडून तिघीही हमसून हमसून रडल्या. 7 / 7यातील एका महिलेसोबत हमासने भयंकर कृत्य केल्याचे समोर आले. अतिरेक्यांकडून एका महिलेचे दोन बोट कापून टाकण्यात आली आहेत.