tiktok ban australia chinese app risk national security
चीनला पुन्हा झटका, भारतानंतर आता 'हा' देश टिकटॉवर बंदी घालण्याच्या तयारीत By ऑनलाइन लोकमत | Published: July 06, 2020 1:11 PM1 / 10भारतात बंदी घातल्यानंतर आता चिनी अॅप टिकटॉकला (TikTok) आणखी एक धक्का बसण्याची शक्यता आहे. ऑस्ट्रेलियामध्ये आता टिकटॉकवर बंदी घालण्याची मागणी वाढत असून येथील संसदीय समिती या बंदीचा विचार करीत आहे. 2 / 10गेल्या काही आठवड्यांत ऑस्ट्रेलिया आणि चीनमध्ये तणाव वाढला आहे. राष्ट्रीय सुरक्षतेचा धोका आणि युजर्सचा डेटा चीनसोबत शेअर करण्याच्या मुद्द्यावर टिकटॉकवर ऑस्ट्रेलियामध्ये बंदी घातली जाऊ शकते. 3 / 10चिनी कंपनी Bytedance चे असलेल्या अॅप टिकटॉकचे ऑस्ट्रेलियातील 16 लाखांहून अधिक युजर्स आहेत. ऑस्ट्रेलियाच्या एका खासदाराने टिकटॉकवर बंदी घालण्याची योजना शेअर केली आहे. युजर्सचा डेटा चिनी सर्व्हरवर ठेवणे धोक्याचे ठरू शकते, असे ऑस्ट्रेलियामध्येही म्हटले जात आहे. 4 / 10डेली मेलच्या वृत्तानुसार, ऑस्ट्रेलियाच्या एका खासदाराने सांगितले की, आपल्या देशात टिकटॉक आता रडारवर आले आहे. त्याकडे चिनी कम्युनिस्ट पार्टीसाठी डेटा गोळा करण्याचे साधन म्हणून पाहिले पाहिजे.5 / 10Herald Sunला दिलेल्या मुलाखतीत ऑस्ट्रेलियाचे खासदार म्हणाले, आणखी बरेच खासदार अॅपवर बंदी घालण्याचा प्रयत्न करीत आहेत. चिनी मेसेजिंग अॅप वीचॅटपेक्षा टिकटॉकचा सर्वात जास्त धोका असल्याची शक्यता आहे, असेही ते म्हणाले.6 / 10सीनेटर जेनी मॅकएलिस्टर यांनी सांगितले की, टिकटॉक कंपनीच्या वरिष्ठ अधिकाऱ्याला सिनेट चौकशीसाठी हजर राहावे लागेल. ऑस्ट्रेलियन स्ट्रॅटेजिक पॉलिसी इन्स्टिट्यूटचे तज्ज्ञ फर्गस रयान म्हणाले की, टिकटॉक पूर्णपणे प्रचार आणि मास सर्व्हिलांससाठी आहे. 7 / 10याचबरोबर, फर्गस रयान म्हणाले, चीनच्या विरोधात केलेले विचार हे अॅप सेन्सॉर करते आणि ते थेट बीजिंगला माहिती पाठवू शकते. चिनी कम्युनिस्ट पार्टीतील बरेच सदस्य कंपनीत असल्याने पार्टीचे डेटावर नियंत्रण नाही, त्यामुळे असा प्रश्नच उद्भवत नाही.8 / 10विदेशी हस्तक्षेप समितीचे सदस्य किंबर्ली किचिंग यांनी सांगितले की, ऑस्ट्रेलियातील लोकांना माहीत नाही की, त्यांची वैयक्तिक माहिती टिकटॉक कशाप्रकारे वापरू शकते.9 / 10दरम्यान, भारतात टिकटॉकसह 59 चिनी अॅप्सवर बंदी घालण्यात आली आहे. भारताचे सार्वभौमत्व व एकात्मता, देशाची सुरक्षा आणि देशातील जनतेचे हित लक्षात घेऊन केंद्रीय माहिती व तंत्रज्ञान मंत्रालयाने माहिती तंत्रज्ञान कायद्यातील कलम 69अ च्या अधिकाराचा वापर करत निर्माण झालेल्या असुरक्षिततेच्या पार्श्वभूमीवर टिकटॉकसह 59 चिनी अॅप्सवर बंदी घालण्याचा निर्णय घेतला आहे.10 / 10चिनी अॅप्सवर बंदी घातल्यानंतर मेड इन इंडिया अॅप्समध्ये झपाट्याने वाढ होत आहे. तसेच, याआधी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही आत्मनिर्भर भारत मोहिमेची घोषणा केली होती. त्याअंतर्गत उद्योजक व नवोदितांना देशात अॅप्स विकसित करण्याचे आवाहन करण्यात आले. आणखी वाचा Subscribe to Notifications