रशियामध्ये बस आणि ट्रेनचा भीषण अपघात, 19 जणांचा मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 6, 2017 15:53 IST
1 / 4मॉस्को येथे पॅसेंजर बसला ट्रेनने धडक दिल्याने भीषण अपघात झाला असून 19 जणांचा मृत्यू झाला आहे. राजधानी मॉस्कोपासून 110 किमी अंतरावर असणा-या व्लादिमीर शहराजवळ हा अपघात झाला2 / 4संरक्षण मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, ट्रेन सेंट पीटर्सबर्ग येथील पश्चिम शहरापासून ते पूर्व मॉस्को येथील निजनी - नोवोग्राद येथे चालली होती. पहाटे 3.29 च्या सुमारास हा अपघात झाला. 3 / 4बसमध्ये असणा-या सर्व लोकांचा अपघातात मृत्यू झाला आहे. मंत्रालयाने रेल्वे ट्रॅकजवळील फोटो प्रसिद्ध केले आहेत. तसंच ट्रेनमधील सर्व प्रवासी सुरक्षित असल्याची माहिती दिली. 4 / 4रशियामध्ये बस दुर्घटना होण्याचं प्रमाण जास्त आहे. याआधी ऑगस्ट महिन्यात बांधकाम कामगारांना घेऊन जाणा-या एका बसचा अपघात झाला होता. या दुर्घटनेत 17 जणांचा मृत्यू झाला होता.