शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

अमेरिकेने कृत्रिमरित्या घडवून आणला तुर्कीचा भूकंप? 'या' खास तंत्रज्ञानाचा वापर

By ऑनलाइन लोकमत | Published: February 10, 2023 8:10 PM

1 / 7
Turkey Syria Earthquake : तुर्कस्तान आणि सीरियामध्ये झालेल्या भूकंपातील मृतांची संख्या 23 हजारांच्या पुढे गेली आहे. यातच आता एक नवा वाद सुरू झाला आहे. तुर्कस्थानमध्ये आलेला भीषण भूकंप अमेरिकेने घडवून आणल्याच्या चर्चा सोशल मीडियावर सुरू झाल्या आहेत. अमेरिकेने आपल्या प्रगत हवामान तंत्रज्ञानाचा वापर करुन हे केल्याचे बोलले जात आहे. अमेरिकन संशोधन केंद्र HAARP (हाय फ्रिक्वेन्सी अॅक्टिव्ह ऑरोरल रिसर्च प्रोग्राम) ला दोष दिला जात आहे.
2 / 7
सोशल मीडियावर काही व्हिडिओही पोस्ट करण्यात आले आहेत, ज्यामध्ये भूकंपाच्या वेळी वीज पडल्याचे दिसत. असे म्हटले जात आहे की, भूकंपादरम्यान वीज पडणे सामान्य घटना नाही. तुर्कीला शिक्षा व्हावी म्हणून अमेरिकेने हे कृत्रिमरीत्या घडवून आणले आहे. पण शिक्षा का? कारण तुर्कस्तानने पाश्चिमात्य देशांनी दाखवलेल्या मार्गावर जाण्यास नकार दिला होता. असे आरोप सोशल मीडिया युजर्सकडून करण्यात येत आहेत.
3 / 7
हा अलास्का येथील वेधशाळेत असलेला एक अमेरिकन प्रकल्प आहे, जो रेडिओ ट्रान्समीटरच्या मदतीने वरच्या वातावरणाचा (आयनोस्फीअर) अभ्यास करतो. 2022 मध्ये हवामानावर अनेक मोठे प्रकल्प सुरू करण्यात आले होते, परंतु त्यात भूकंप होण्याची क्षमता असल्याचे कधीही सांगितले नाही. यापूर्वीही, नैसर्गिक आपत्तींबाबत HAARP संशयाच्या भोवऱ्यात राहिली होती. अनेक देशांमध्ये भूकंप, त्सुनामी आणि भूस्खलनासाठी या संशोधन संस्थेला जबाबदार धरण्यात आले.
4 / 7
हवामानावर नियंत्रण ठेवून अनेक देश इतर देशांवर हल्ले करतील, असे अनेकदा बोलले गेले आहे. हा हल्ला शस्त्रे किंवा अणुबॉम्बने होणार नाही, तर नैसर्गिकरित्या होईल. एखादा देश पावसावर नियंत्रण ठेवून शत्रू देशात दुष्काळ किंवा पूर आणू शकतो. तसेच, भूकंप किंवा त्सुनामी आणण्याची क्षमताही आहे, असे अनेकदा बोलले गेले आहे.
5 / 7
हे शत्रू देशात धोकादायक व्हायरस किंवा बॅक्टेरिया पाठवण्यासारखे आहे. हवामान नियंत्रणाचे प्रयत्न आधी कोणी सुरू केले, यावरुन अनेकदा वाद झाले आहेत. रशिया अमेरिकेला दोष देतो आणि अमेरिका रशियाला दोष देतो. बहुतेक देश अमेरिकेवरच बोट ठेवतात. ऑगस्ट 1953 मध्ये, या देशाने हवामान नियंत्रणासाठी राष्ट्रपती सल्लागार समितीची स्थापना केली होती. हवामानातील बदल देशाच्या हितासाठी कसे करता येतील, हे समितीला समजून घ्यायचे होते. पन्नासच्या दशकात याबाबत उघड चर्चा रंगली होती. स्वच्छ हवामानात धुळीची वादळं कशी आणता येतात किंवा बर्फ वितळवून पूर कसा येऊ शकतो हे दाखवण्यासाठी लहान-मोठे प्रयोगही करण्यात आले होते.
6 / 7
व्हिएतनाम युद्धादरम्यान अमेरिकेने मान्सून वाढवण्यासाठी क्लाउड सीडिंगचा वापर केला होता असे आरोप झाले होते. यामुळे व्हिएतनामी सैन्याची पुरवठा साखळी बिघडली होती, कारण अतिवृष्टीमुळे जमीन दलदलीची झाली होती. पण, ही अमेरिकन युक्ती आहे की नैसर्गिक आपत्ती, याचा कोणताही पुरावा सापडला नाही.
7 / 7
देश एकमेकांच्या विरोधात हवामान बदल तंत्रज्ञानाचा वापर करू शकतात, यावर संयुक्त राष्ट्र संघाने खूप पूर्वी सतर्क केले होते. ऑक्टोबर 1987 मध्ये, UN ने ENMOD (मिलिटरी ऑर एनी अदर हॉस्टायल यूज ऑफ एन्व्हायर्नमेंटल मॉडिफिकेशन टेक्नीक) मसुदा तयार केला. कोणताही देश दुसऱ्या देशाला हवामानाच्या माध्यमातून त्रास देऊ शकत नाही, असे या मसुद्यात म्हटले. पण, या इशाऱ्याकडे किती गांभीर्याने पाहिले, हा चर्चेचा विषय आहे.
टॅग्स :EarthquakeभूकंपAmericaअमेरिकाSyriaसीरिया