शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Turkiye Earthquake: आक्रोश-किंकाळ्या...! कधीही न विसरणारा भूकंप अन् थरकाप उडवणारी दृश्य, तुर्की उद्धवस्त

By ऑनलाइन लोकमत | Published: February 07, 2023 11:10 AM

1 / 15
तुर्की (Turkey) आणि सीरिया (Syria) एकापाठोपाठ एक भूकंपाच्या धक्क्यांनी हादरलं आहे. तुर्की, सीरियात ४० हून अधिक भूकंपाचे धक्के बसले आहेत.
2 / 15
सर्वात जास्त ७.८ तीव्रतेचा भूकंपाचा झटका बसला. यामुळे अनेक जणांचा मृत्यू झाला असून हजारो इमारती जमीनदोस्त झाल्या आहेत. तर आतापर्यंत ४ हजाराहून अधिक जणांचा मृत्यू झाला असल्याची माहिती समोर येत आहे.
3 / 15
भूकंपग्रस्त भागात बचावकार्य सुरू आहे. येथील अनेक भागांत ४० सेकंद भूकंपाचे धक्के जाणवल्याचे लोकांनी सांगितले. तुर्कीचे उपाध्यक्ष फुआत ओक्ते यांच्या कार्यालयाने जारी केलेल्या निवेदनानुसार, देशातील १० शहरांमध्ये आणीबाणी लागू करण्यात आली आहे. आठवडाभर सर्व शाळा आणि महाविद्यालये बंद राहणार आहेत. २०० उड्डाणे रद्द करण्यात आली आहेत.
4 / 15
उंचच उंच इमारती पत्त्यासारख्या एका क्षणात कोसळल्या. वर्दळीच्या शहरांचं रुपांतर आज खंडरमध्ये झालंय. दोन्ही देशांमधील मृत्यूंचा आकडा आता वाढतच चालला आहे.
5 / 15
तुर्कीचे उपाध्यक्ष फुआत ओक्ते यांच्या कार्यालयाने जारी केलेल्या निवेदनानुसार, देशातील १० शहरांमध्ये आणीबाणी लागू करण्यात आली आहे. आठवडाभर सर्व शाळा आणि महाविद्यालये बंद राहणार आहेत. २०० उड्डाणे रद्द करण्यात आली आहेत.
6 / 15
भूकंपग्रस्त भागात बचावकार्य सुरू आहे. येथील अनेक भागांत ४० सेकंद भूकंपाचे धक्के जाणवल्याचे लोकांनी सांगितले.
7 / 15
इस्रायल, अझरबैजान, रोमानिया, नेदरलँडस्ही बचावकार्यासाठी पथके पाठवत आहेत. तुर्कस्तानमध्ये भूकंपग्रस्त भागात रक्तदान शिबिरे सुरू करण्यात आली आहेत. रशियानेही तुर्की आणि सीरियाला मदत पाठविण्याची घोषणा केली आहे.
8 / 15
पुतीन सध्या दोन इलुशिन-७६ विमाने पाठविण्याच्या तयारीत आहेत. भूकंपामुळे हजारो इमारती कोसळल्या असून आफ्टरशॉक अजूनही जाणवत आहेत.
9 / 15
भारत सरकारने सांगितले की, एनडीआरएफची १०० कर्मचारी असलेली दोन पथके तुर्कस्तानला पाठविण्यात येणार आहेत. ज्यात विशेष प्रशिक्षित श्वान पथके आणि आवश्यक उपकरणे भूकंपग्रस्त भागात जाण्यासाठी सज्ज आहेत.
10 / 15
भूकंपाच्या दरम्यान तुर्कस्तानच्या अनेक भागात तापमान शून्याच्या खाली नोंदवण्यात आले आहे. सध्या देशात कडाक्याची थंडी पडत आहे. भूकंपामुळे येथील विमानतळाच्या धावपट्टीचे नुकसान झालं आहे. बर्फवृष्टीमुळे बचाव कार्यातही अडचण निर्माण झाली आहे.
11 / 15
एखाद्या युद्धात शहरं बेचिराख होतात अशी दृश्य समोर आली आहेत. शहरं उद्ध्वस्त झाली आहेत. चकचकीत आणि सुंदर शहरं अक्षरशः नेस्तनाबूत झाली. इमारतीच्या ढिगाऱ्याखाली अडकलेल्या लहान मुलांना बाहेर काढण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरु आहेत..
12 / 15
काही इमारती अर्धवट कोसळल्या... आणि त्यात जीवाच्या आकांतानं ओरडणाऱ्या चिमुरड्याचा आवाज ऐकून अनेकांच्या काळजाचं पाणी झालं.
13 / 15
सकाळी या भूंकपानं केलेल्या नुकसानीची भयावह दृश्य समोर आली. आक्रोश... किंकाळ्या आणि जीव वाचवण्यासाठी दिलेल्या हाक .. इतकंच ऐकू येत होतं.
14 / 15
पृथ्वीच्या भूगर्भात मोठ-मोठ्या आकाराच्या टेक्टॉनिक प्लेट्स आहेत. त्याखाली लाव्हारस आहे. त्यावर या प्लेट्स तरंगत असतात. त्यांची ज्यावेळी एकमेकांशी टक्कर होते, त्यावेळी खूप दबावामुळे या प्लेट्सचे तुकडे होऊ लागतात. त्यामुळे भूगर्भातील ऊर्जा तिथून बाहेर पडण्यासाठी मार्ग शोधू लागते. त्यातून होणाऱ्या भूगर्भीय हालचालींमुळे भूकंप येतो. तुर्कस्थानचा बहुतांश भाग हा एनाटोलियन टॅक्टोनिक प्लेटच्या क्षेत्रात आहे. ही प्लेट युरोशियन, आफ्रिकन, अरेबियन या तीन प्लेटच्या मधोमध आहे. आफ्रिकन, अरेबियन प्लेट आपल्या जागेवरून हलली की तुर्कस्थानचा भाग असलेल्या प्लेटवर सारा दबाव येऊन त्या देशामध्ये भूकंप येतो.
15 / 15
सोमवारी पहाटे दक्षिण तुर्की आणि उत्तर सीरियामध्ये ७.८ तीव्रतेच्या शक्तिशाली भूकंपाने हजारो लोकांचा बळी गेला, पण सौर प्रणाली भूमिती सर्वेक्षण (एसएसजीईओएस) संस्थेमध्ये काम करणाऱ्या फ्रँक हूगरबीट्स या संशोधकाने या दुर्घटनेचा इशारा तीन दिवस आधीच वर्तवला होता. ३ फेब्रुवारी रोजी संध्याकाळी ५.३३ वाजता त्यांनी “लवकरच किंवा नंतर, दक्षिण-मध्य तुर्की, जॉर्डन, सीरिया आणि लेबनॉनच्या प्रदेशात ७.५ तीव्रतेचा भूकंप होईल” असे ट्वीट केले होते. त्यांनी भूकंपाचा केंद्रबिंदू दाखवणारा मॅपही शेअर केला होता. तीन दिवसांनंतर त्यांचा इशारा खरा ठरला आणि ट्वीट प्रचंड व्हायरल झाले असून, नेटकऱ्यांमध्ये चर्चेचा विषय आहे.
टॅग्स :EarthquakeभूकंपDeathमृत्यूInternationalआंतरराष्ट्रीय