Typhoon Hato lashes Macau, Hong Kong and southern China
चीन, मकाऊ आणि हाँगकाँगला चक्रीवादळाचा फटका, जनजीवन विस्कळीत By ऑनलाइन लोकमत | Published: August 24, 2017 5:05 PM1 / 12चीनच्या समुद्रकिना-यावर 'टायफून' वादळ धडकलं आहे. मकाऊ आणि हाँगकाँग शहरालाही या वादळाचा मोठा फटका बसला आहे. 2 / 12मकाऊ आणि हाँगकाँग शहरातील जनजीवन पुर्णपणे विस्कळीत झालं असून पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे. 3 / 12दक्षिण चीनमध्ये टायफून वादळामुळे एकूण बारा जणांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळाली आहे. 4 / 12मकाऊमध्ये मेक्का आणि पोर्तुगीज कॉलनीत एकूण आठ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती सरकारने दिली आहे. 5 / 12बुधवारी सकाळी दक्षिण वादळामुळे काही ठिकाणी लँडस्लाईड झालं. यामुळे मकाऊमध्ये अनेक ठिकाणी वीजपुरवठा खंडित झाला होता. 6 / 12मकाऊमध्ये आलेलं हे वादळ गेल्या 53 वर्षातील सर्वात मोठं वादळ असल्याची माहिती सरकारने दिली आहे. 7 / 12पाणी आणि वीजपुरवठा सुरळीत व्हावा यासाठी सरकार पुर्ण प्रयत्न करत आहे. 8 / 12समुद्रकिनारी असलेल्या अनेक परिसरांना उंच लाटांचा फटका बसला असून झाडे कोलमडून पडली आहेत. 9 / 12हाँगकाँगमध्ये 700 हून अधिक झाडं पडली असून, 100 हून अधिक जणांना वैद्यकीय मदत देण्यात आली आहे. 10 / 12सुरुवातीला आलेलं वादळ छोटं होतं, मात्र नंतर त्याचा वेग वाढला आणि रौद्र रुप धारण केलं. 11 / 12हाँगकाँगमध्ये अनेक ठिकाणी पुरपरिस्थिती निर्माण झाली असून वाहतूक ठप्प झाली आहे. 12 / 12वादळामुळे अनेक व्यवसाय ठप्प पडले असून अर्थव्यवस्थेवर परिणाम होताना दिसत आहे आणखी वाचा Subscribe to Notifications