UK infosys Narayan Murthys son in law in race for britain pm rushi sunak know journey and detain
UK : ब्रिटनच्या पंतप्रधानपदाच्या शर्यतीत नारायण मूर्तींचे जावई; पाहा कोण आहेत ऋषी सुनक By ऑनलाइन लोकमत | Published: January 15, 2022 8:45 AM1 / 9कोरोनामुळे लॉकडाऊन (Coronavirus Lockdown) सुरू असताना पार्टीत सामील होणारे ब्रिटनचे पंतप्रधान (Britain Prime Minister) बोरिस जॉन्सन (Boris Johnson) यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी त्यांच्या कॉन्झर्व्हेटिव्ह पक्षातील काही नेते व विरोधक करत आहेत. बोरिस यांना पायउतार व्हावे लागले तर ब्रिटनच्या पंतप्रधानपदी भारतीय वंशाचे ऋषी सुनक (Rushi Sunak) यांची वर्णी लागण्याची शक्यता आहे.2 / 9ऋषी सुनक हे ब्रिटनचे नागरिक असून सध्या ते ब्रिटनचे अर्थमंत्री (Finance Minister) आहेत. ते ब्रिटनचे असले तरी त्याची मूळे भारताशी निगडित आहेत. 3 / 9ब्रिटनमधील सध्याच्या सरकारमध्ये ऋषी सुनक यांचा कार्यकाळ चांगला चालला आहे. सुनक यांच्या मंत्रालयाच्या कामावर लोक खूप खूश आहेत. याच कारणामुळे ते पंतप्रधानपदाचे प्रमुख दावेदार मानले जात आहेत.4 / 9ऋषी सुनक हे दिग्गज भारतीय सॉफ्टवेअर कंपनी इन्फोसिसचे (Infosys) सह-संस्थापक नारायण मूर्ती (Narayan Murty) यांचे जावई आहेत. सुनक यांच्या पत्नी अक्षता मूर्ती या नारायण मूर्ती यांच्या कन्या आहेत. २००९ मध्ये दोघांचा विवाह झाला होता. ऋषी आणि अक्षता यांना दोन मुली आहेत.5 / 9ऋषी सुनक यांचे आई-वडील मूळचे पंजाबचे होते. ऋषी सुनक हे पंजाबी कुटुंबातील आहेत. त्यांच्या वडिलांचे नाव यशवीर सुनक आणि आईचे नाव उषा सुनक असं आहे. यशवीर सुनक आणि उषा सुनक यांचे कुटुंबीय फार पूर्वीच परदेशात स्थायिक झाले होते. त्यांचे वडील डॉक्टर होते व आई औषधाचे दुकान चालवत होती.6 / 9ऋषी सुनक यांचा जन्म हॅम्पशायरमध्ये झाला. ३९ वर्षीय सुनक हे २०१५ पासून रिचमंड (यॉर्कशायर) चे खासदार आहेत. त्यांचं शालेय शिक्षण ब्रिटनमधील विंचेस्टर कॉलेज याठिकाणी झालं. त्यांनी ऑक्सफर्ड विद्यापीठातून आणखी उच्चशिक्षण घेतलं, तसंच अमेरिकेतील स्टॅनफोर्ड विद्यापीठातून त्यांनी एमबीए केले आहे. 7 / 9ब्रिटनमधील राजकारणात येण्यापूर्वी ऋषी यांनी ग्लोडमन सॅक्स, हेज फंड येथे काम केले होते. त्यानंतर त्यांनी इन्व्हेस्टमेंट कंपनी सुरू केली. सुनक हे गेल्या वर्षी रिचमंड (यॉर्क्स) मतदारसंघातून दुसऱ्यांदा खासदार म्हणून निवडून आले होते. यापूर्वी २०१८ मध्ये त्यांच्याकडे ब्रिटनच्या गृहनिर्माण मंत्रीपदाची धुराही सोपवण्यात आली होती.8 / 9सध्या अनेकदा माध्यमांशी संवाद साधताना अनेकदा सुनक हे सरकारतर्फे जाताना दिसतात. याशिवाय त्यांनी पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांच्या निवडणूक प्रचारातही महत्त्वाची भूमिका बजावली होती. पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांच्या जागी अनेक प्रसंगी सुनक यांनी टीव्ही डिबेट्समध्ये भाग घेतला होता.9 / 9सध्या बोरिस जॉन्सन यांच्यावर मोठ्या प्रमाणात टीका होत आहे. २०२० मध्ये कोरोनामुळे ब्रिटनमध्ये लॉकडाऊन सुरू असताना पंतप्रधान बोरिस जॉन्सन एका गार्डन पार्टीमध्ये सामील झाले होते. ही पार्टी पंतप्रधानांच्या शासकीय निवासस्थानी झाली होती. लॉकडाऊनच्या नियमांचा पंतप्रधानच भंग करत असतील तर इतरांकडून काय अपेक्षा ठेवणार, असा सवाल टीकाकारांनी केला. आणखी वाचा Subscribe to Notifications