शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

  • मुंबई उपनगरातील भांडुपमध्ये सर्वाधिक ६१.१२ टक्के मतदान
  • महाराष्ट्रात १० पैकी ६ एक्झिट पोल महायुतीच्या बाजुने; एकाने तर कोणालाच बहुमत दिले नाही
  • एक्झिट पोलमध्ये ठाकरेंपेक्षा शरद पवार, काँग्रेस सर्वात मोठ्या फायद्यात...; भाजपा सर्वात मोठा पक्ष
  • बिटकॉइन घोटाळ्यातील ऑडिओ क्लिपमध्ये आवाज सुप्रिया सुळे आणि पटोलेंचाच; अजित पवारांचा दावा
  • पुणे जिल्ह्यात दुपारी १ वाजेपर्यंत २९.०३ टक्के मतदान.
  • गडचिराेली - मुलचेरा तालुक्यात १११ वर्षांच्या आजीने प्रत्यक्ष बुथवर जाऊन केले मतदान
  • केदार दिघेंवर पैसे वाटप केल्याचा शिंदे गटाचा आरोप, पोलिसांत गुन्हा दाखल
  • Jio युजर्स सतर्क व्हा! तुमच्या एका चुकीमुळे कॉल हिस्ट्री दुसऱ्याच्या हाती लागू शकते
  • झारखंडने महाराष्ट्राला पछाडले! तिकडे दुपारी एक वाजेपर्यंत ४७.९२ टक्के, इकडे एवढेच मतदान
  • दुपारी दीड वाजेपर्यंत अहिल्यानगर जिल्ह्यात सरासरी 32 टक्के मतदान
  • लातूर जिल्ह्यात दुपारी १ वाजेपर्यंत ३३.२७% मतदान
  • महाविकास आघाडीमधील ठाकरेंच्या शिवसेनेचे कोपरी-पाचपाखाडी मतदारसंघाचे उमेदवार केदार दिघे आणि त्यांच्या पदाधिकाऱ्यांविरोधात कोपरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
  • सोलापूर : सोलापूर जिल्ह्यातील ११ विधानसभा मतदारसंघात दुपारी एक वाजेपर्यंत सरासरी एकूण २९.४४% मतदान झालेले आहे
  • सपाला मतदान करण्यास विरोध केला म्हणून तरुणीची हत्या; मैनपुरी हादरली, बलात्काराचाही संशय
  • PM नरेंद्र मोदींचा जगात डंका; आता गयाना आणि बार्बाडोसकडून 'सर्वोच्च सन्मान' जाहीर!
  • रत्नागिरी जिल्ह्यात मतदानाला उत्साही सुरुवात, ११ वाजेपर्यंत २२.९३ टक्के मतदान
  • कोल्हापुरातील शिरोलीत भगवी टोपी घालण्यावरुन हिंदूत्ववादी संघटनेचे कार्यकर्ते आणि पोलिस यांच्यात वाद
  • हर्षवर्धन पाटील यांनी बावडा येथे सहकुटुंब बजावला मतदानाचा हक्क
  • भुसावळ रेल्वे विभागाच्या डीआरएम इति पांडेय यांनी भुसावळ येथील डी.एस. हायस्कूल केंद्रात मतदानाचा हक्क बजावला.
  • आमदार राजू कारेमोरे त्यांच्या पत्नी रंजिता कारेमोरे व मुलगी वैभवी व वैभव सहकुटुंब त्यांची मूळ गाव एकलारी येथील मतदान केंद्रावर मतदान करताना.
  • ठाणे जिल्ह्यात ११ वाजेपर्यंत १६.६३ टक्के मतदान
  • केंद्रीय सहकार आणि नागरी हवाई वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी पत्नी मोनिका आणि कन्या सिद्धी यांच्यासमवेत कोथरूड येथील एमआयटी स्कुलमध्ये मतदानाचा हक्क बजावला.
  • १०३ वय वर्ष असणारे स्वातंत्र्यसैनिक जी.जी. पारिख यांनी मलबार हिल मतदार संघात मतदानाचा हक्क बजावला.
  • मुलुंड म्हाडा कॉलनीत राहणाऱ्या प्रणव पालवे (२१) या तरुणाने दोन्ही डोळ्यांनी दिसत नसतानाही पहिल्यांदा मतदानाचा हक्क बजावला.
  • ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन व त्यांच्या पत्नी साधना महाजन यांनी जामनेर येथील मतदान केंद्रात मतदानाचा हक्क बजावला.
  • अकोला जिल्ह्यात सकाळी ११ वाजेपर्यंत सरासरी १६.३४ टक्के मतदान!
  • विधानसभा निवडणुकीत 'आप' कोणाला तिकीट देणार? अरविंद केजरीवालांकडून मोठा खुलासा
  • मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि कल्याण-डोंबिवलीचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी ठाणे येथील वागळे इस्टेट येथील एलिमेंट आयटी पार्क येथील मतदान केंद्रावर आपला मतदानाचा हक्क बजावला.
  • सोलापूर : सोलापूर जिल्ह्यातील अकरा विधानसभा मतदारसंघात सकाळी सात ते अकरा या वेळेत 15.66% मतदान झालेले आहे.
  • दुसऱ्या सत्रात नाशिकमध्ये वाढला मतदानाचा टक्का
  • ठाणे - येणारे सरकार पूर्णपणे महायुतीचं, बहुमताचं असेल, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची मतदानानंतर प्रतिक्रिया.
  • नाशिक : जिल्ह्यात सकाळी ११ वाजेपर्यंत सरासरी १८.८२ टक्के मतदान. शहरात सर्वाधिक मध्य मतदारसंघात १८.४२टक्के मतदान. जिल्ह्यात दिंडोरी मतदारसंघात २६.४१टक्के तर मालेगाव मध्यमध्ये २२.७६ टक्के मतदान.
  • रायगड जिल्हा ७ विधानसभा मतदारसंघ सकाळी ७ ते ११ या कालावधीत २०.४०% मतदान
  • कोपरी पाचपाखाडी विधानसभा मतदारसंघात ११ वाजेपर्यंत १८.२२ टक्के मतदान झाले.
  • सकाळच्या दोन तासांत नाशिक शहरात सरासरी ६ टक्के मतदान
  • अकोल्यात जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी अजित कुंभार यांनी मतदान केंद्राची पाहणी करीत, मतदान प्रक्रियेची माहिती घेतली. ज्येष्ठ मतदारांशी संवाद साधला!
  • वर्सोवा विधानसभेच्या महायुतीच्या उमेदवार डॉ.भारती लव्हेकर यांनी आज सकाळी चार बंगला येथील ग्यान केंद्र शाळेत मतदानाचा हक्क बजावला.
  • नितीन गडकरी यांनी सहपरिवारासोबत टाऊन हॉल महाल येथे मतदानाचा हक्क बजावला.
  • जळगाव : पळासखेड ता. भडगाव येथे सकाळी १०.३० वाजेपर्यंत १८००पैकी ३०जणांनी मतदानाचा हक्क बजावला होता.
  • पोलीस आयुक्त मुंबई विवेक फणसळकर यांनी बजावला मतदानाचा अधिकार
  • तिरोडा विधानसभा मतदारसंघाचे आमदार विजय रहांगडाले व गोंदिया विधानसभा मतदारसंघाचे आमदार विनोद अग्रवाल यांनी कुटुंबीयांसह बजाविला मतदानाचा अधिकार.
  • विषारी हवा, प्रदूषणामुळे परिस्थिती गंभीर; दिल्ली सरकारचा कर्मचाऱ्यांसाठी वर्क फ्रॉम होमचा निर्णय
  • राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोक्कलिंगम यांनी बजावला मतदानाचा अधिकार
  • नांदेड: रवी नगर भागात एक तासापासून ईव्हीएम बंद आहे, मतदार प्रतीक्षेत, दोन मशीनमध्ये झाला बिघाड, १८२ मतदान केंद्र क्रमांक
  • सोलापूर : सोलापुरातील सर्वच मतदान केंद्रावर मतदानास प्रारंभ; बूथ प्रमुख, नेतेमंडळी व पक्षाच्या प्रमुखांसोबत कार्यकर्त्यांचे मतदान सुरू

Russia-Ukraine War: तिसऱ्या महायुद्धाला सुरुवात? जाणून घ्या पहिल्या आणि दुसऱ्या महायुद्धाची कारणे

By ऑनलाइन लोकमत | Published: February 24, 2022 2:57 PM

1 / 11
रशिया आणि युक्रेनमधील वाद शिगेला पोहचला आहे. रशियाने युक्रेनमधील 11 शहरांवर हल्ले करुन तेथील लष्करी ठिकाणे उद्धवस्त केले आहेत. यानंतर NATO रशियावर कारवाई करण्याच्या तयारीत आहे. यावरुन आता जगावर तिसऱ्या महायुद्धाचे सावट आहे. हे तिसरे महायुद्ध टाळण्याचे अनेक देशांचे प्रयत्न आहेत, पण युद्ध झालेच तर जगावर मोठे परिणाम पडणार आहेत.
2 / 11
रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी बेलारुस मार्गे आपले सैन्य पाठवले आहेत. डेली मेलच्या वृत्तानुसार, कीवमधील गृह मंत्रालयाच्या हवाल्याने म्हटले आहे की, रशियन हल्ल्यात अनेक युक्रेनियन लोक मारले गेले आहेत. या हल्ल्याची भीषणता सोशल मीडियावरील अनेक व्हिडिओंमध्ये पाहायला मिळत आहे.
3 / 11
रशियाने युक्रेनवर आपली पकड मजबुत करायला सुरुवात केली असून, रशिया आणि युक्रेनमधील युद्धाला सुरुवात झाली आहे. यावरुन आता तिसऱ्या महायुद्धाचा धोका वाढला आहे. दुसरीकडे, अमेरिका, फ्रान्स, ब्रिटन आणि जर्मनीसारखे 'नाटो' देश युक्रेनच्या संरक्षणासाठी संयुक्त कारवाई करू शकतात.
4 / 11
जगाला आधीच दोन महायुद्धांचा सामना करावा लागला आहे. त्या काळात संपूर्ण जगात कोट्यवधी लोकांचे मृत्यू तर झालेच पण जगावर अनेक दिवस उपासमारीची परिस्थिती निर्माण झाली. त्या परिस्थितीमुळे आता तिसऱ्या महायुद्धाला लोकही घाबरत आहेत. आज आपण पहिल्या आणि दुसऱ्या महायुद्धांची कारणे जाणून घेणार आहोत.
5 / 11
पहिले महायुद्ध का झाले?- पहिल्या महायुद्धाची जबाबदारी कोणताही देश घेत नाही. पहिल्या महायुद्धाचे कारण ऑस्ट्रिया-हंगेरी साम्राज्याचा वारस आणि त्याच्या पत्नीची हत्या असल्याचे मानले जाते. सुमारे 108 वर्षांपूर्वी, जून 1914 मध्ये ऑस्ट्रिया-हंगेरी साम्राज्याचे वारस आर्कड्यूक फर्डिनांड यांनी आपल्या पत्नीसह बोस्नियामधील सारेवोला भेट दिली होती.
6 / 11
तर, 28 जून 1914 रोजी त्यांची हत्या झाली, सर्बियावर खुनाचा आरोप होता. एका महिन्यानंतर ऑस्ट्रियाने सर्बियाविरुद्ध युद्ध पुकारले. हळूहळू अनेक देशांनी त्यात उडी घेतली आणि अशा प्रकारे दोन देशांच्या युद्धाचे रूपांतर पहिल्या महायुद्धात झाले.
7 / 11
त्या लढ्यात जर्मनी, फ्रान्स, ब्रिटन, अमेरिका आदी देश सक्रिय होते. चार वर्षांच्या लढाईनंतर 11 नोव्हेंबर 1918 रोजी जर्मनीच्या आत्मसमर्पणाने पहिले महायुद्ध संपले. 28 जून 1919 रोजी जर्मनीने करारावर स्वाक्षरी केली, ज्याअंतर्गत त्यांना आपला मोठा हिस्सा गमवावा लागला होता.
8 / 11
दुसऱ्या महायुद्धाचे कारण- पहिल्या महायुद्धाची जबाबदारी जर्मनीवर लादली गेली आणि व्हर्सायच्या तहावर स्वाक्षरी करण्यास भाग पाडले गेले असे सांगण्यात आले. पहिल्या महायुद्धाच्या समाप्तीच्या 20 वर्षांनंतर, जर्मन राष्ट्रीय समाजवादी (नाझीवाद) पक्षाचा नेता अॅडॉल्फ हिटलरने व्हर्सायचा करार रद्द करण्याची घोषणा केली.
9 / 11
मार्च 1938 मध्ये जर्मनी आणि ऑस्ट्रिया एकत्र आले आणि हिटलरच्या सैन्याने 1939 मध्ये चेकोस्लोव्हाकियावर कब्जा केला. 1 सप्टेंबर 1939 रोजी जर्मन सैन्य पोलंडमध्ये दाखल झाले तेव्हा दुसरे महायुद्ध सुरू झाले. यानंतर जगाचे दोन भाग पडले. एकीकडे मित्र राष्ट्र होते ज्यात अमेरिका, फ्रान्स, ब्रिटन, सोव्हिएत युनियन यांचा समावेश होता तर दुसरीकडे जर्मनी, जपान आणि इटली यांचा समावेश असलेले राष्ट्र होते.
10 / 11
हिटलरच्या सैन्याने नॉर्वे, डेन्मार्क, लक्झेंबर्ग, बेल्जियम, नेदरलँड आदी देश काबीज करायला सुरुवात केली. अचानक जर्मन सैन्यानेही सोव्हिएत संघाविरुद्ध युद्ध पुकारले. तथापि, जर्मन सैनिक सोव्हिएत युनियनच्या सैन्यासमोर उभे राहू शकले नाहीत. हिटलरने 30 एप्रिल 1945 रोजी आत्महत्या केली आणि 8 मे 1945 रोजी जर्मनीने आत्मसमर्पण केले.
11 / 11
जर्मनीने आत्मसमर्पण करुनही जपान यासाठी तयार नव्हता. त्यानंतर अमेरिकेने 6 ऑगस्ट 1945 रोजी हिरोशिमा आणि 9 ऑगस्ट 1945 रोजी नागासाकीवर अणुबॉम्बने हल्ला केला. जपानने बळजबरीने आत्मसमर्पण केले तेव्हा दुसरे महायुद्ध 2 सप्टेंबर 1945 रोजी संपले.
टॅग्स :Russia Ukrainयुक्रेन आणि रशियाwarयुद्धrussiaरशियाAmericaअमेरिका