शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

  • महाराष्ट्रात १० पैकी ६ एक्झिट पोल महायुतीच्या बाजुने; एकाने तर कोणालाच बहुमत दिले नाही
  • एक्झिट पोलमध्ये ठाकरेंपेक्षा शरद पवार, काँग्रेस सर्वात मोठ्या फायद्यात...; भाजपा सर्वात मोठा पक्ष
  • बिटकॉइन घोटाळ्यातील ऑडिओ क्लिपमध्ये आवाज सुप्रिया सुळे आणि पटोलेंचाच; अजित पवारांचा दावा
  • पुणे जिल्ह्यात दुपारी १ वाजेपर्यंत २९.०३ टक्के मतदान.
  • गडचिराेली - मुलचेरा तालुक्यात १११ वर्षांच्या आजीने प्रत्यक्ष बुथवर जाऊन केले मतदान
  • केदार दिघेंवर पैसे वाटप केल्याचा शिंदे गटाचा आरोप, पोलिसांत गुन्हा दाखल
  • Jio युजर्स सतर्क व्हा! तुमच्या एका चुकीमुळे कॉल हिस्ट्री दुसऱ्याच्या हाती लागू शकते
  • झारखंडने महाराष्ट्राला पछाडले! तिकडे दुपारी एक वाजेपर्यंत ४७.९२ टक्के, इकडे एवढेच मतदान
  • दुपारी दीड वाजेपर्यंत अहिल्यानगर जिल्ह्यात सरासरी 32 टक्के मतदान
  • लातूर जिल्ह्यात दुपारी १ वाजेपर्यंत ३३.२७% मतदान
  • महाविकास आघाडीमधील ठाकरेंच्या शिवसेनेचे कोपरी-पाचपाखाडी मतदारसंघाचे उमेदवार केदार दिघे आणि त्यांच्या पदाधिकाऱ्यांविरोधात कोपरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
  • सोलापूर : सोलापूर जिल्ह्यातील ११ विधानसभा मतदारसंघात दुपारी एक वाजेपर्यंत सरासरी एकूण २९.४४% मतदान झालेले आहे
  • सपाला मतदान करण्यास विरोध केला म्हणून तरुणीची हत्या; मैनपुरी हादरली, बलात्काराचाही संशय
  • PM नरेंद्र मोदींचा जगात डंका; आता गयाना आणि बार्बाडोसकडून 'सर्वोच्च सन्मान' जाहीर!
  • रत्नागिरी जिल्ह्यात मतदानाला उत्साही सुरुवात, ११ वाजेपर्यंत २२.९३ टक्के मतदान
  • कोल्हापुरातील शिरोलीत भगवी टोपी घालण्यावरुन हिंदूत्ववादी संघटनेचे कार्यकर्ते आणि पोलिस यांच्यात वाद
  • हर्षवर्धन पाटील यांनी बावडा येथे सहकुटुंब बजावला मतदानाचा हक्क
  • भुसावळ रेल्वे विभागाच्या डीआरएम इति पांडेय यांनी भुसावळ येथील डी.एस. हायस्कूल केंद्रात मतदानाचा हक्क बजावला.
  • आमदार राजू कारेमोरे त्यांच्या पत्नी रंजिता कारेमोरे व मुलगी वैभवी व वैभव सहकुटुंब त्यांची मूळ गाव एकलारी येथील मतदान केंद्रावर मतदान करताना.
  • ठाणे जिल्ह्यात ११ वाजेपर्यंत १६.६३ टक्के मतदान
  • केंद्रीय सहकार आणि नागरी हवाई वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी पत्नी मोनिका आणि कन्या सिद्धी यांच्यासमवेत कोथरूड येथील एमआयटी स्कुलमध्ये मतदानाचा हक्क बजावला.
  • १०३ वय वर्ष असणारे स्वातंत्र्यसैनिक जी.जी. पारिख यांनी मलबार हिल मतदार संघात मतदानाचा हक्क बजावला.
  • मुलुंड म्हाडा कॉलनीत राहणाऱ्या प्रणव पालवे (२१) या तरुणाने दोन्ही डोळ्यांनी दिसत नसतानाही पहिल्यांदा मतदानाचा हक्क बजावला.
  • ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन व त्यांच्या पत्नी साधना महाजन यांनी जामनेर येथील मतदान केंद्रात मतदानाचा हक्क बजावला.
  • अकोला जिल्ह्यात सकाळी ११ वाजेपर्यंत सरासरी १६.३४ टक्के मतदान!
  • विधानसभा निवडणुकीत 'आप' कोणाला तिकीट देणार? अरविंद केजरीवालांकडून मोठा खुलासा
  • मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि कल्याण-डोंबिवलीचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी ठाणे येथील वागळे इस्टेट येथील एलिमेंट आयटी पार्क येथील मतदान केंद्रावर आपला मतदानाचा हक्क बजावला.
  • सोलापूर : सोलापूर जिल्ह्यातील अकरा विधानसभा मतदारसंघात सकाळी सात ते अकरा या वेळेत 15.66% मतदान झालेले आहे.
  • दुसऱ्या सत्रात नाशिकमध्ये वाढला मतदानाचा टक्का
  • ठाणे - येणारे सरकार पूर्णपणे महायुतीचं, बहुमताचं असेल, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची मतदानानंतर प्रतिक्रिया.
  • नाशिक : जिल्ह्यात सकाळी ११ वाजेपर्यंत सरासरी १८.८२ टक्के मतदान. शहरात सर्वाधिक मध्य मतदारसंघात १८.४२टक्के मतदान. जिल्ह्यात दिंडोरी मतदारसंघात २६.४१टक्के तर मालेगाव मध्यमध्ये २२.७६ टक्के मतदान.
  • रायगड जिल्हा ७ विधानसभा मतदारसंघ सकाळी ७ ते ११ या कालावधीत २०.४०% मतदान
  • कोपरी पाचपाखाडी विधानसभा मतदारसंघात ११ वाजेपर्यंत १८.२२ टक्के मतदान झाले.
  • सकाळच्या दोन तासांत नाशिक शहरात सरासरी ६ टक्के मतदान
  • अकोल्यात जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी अजित कुंभार यांनी मतदान केंद्राची पाहणी करीत, मतदान प्रक्रियेची माहिती घेतली. ज्येष्ठ मतदारांशी संवाद साधला!
  • वर्सोवा विधानसभेच्या महायुतीच्या उमेदवार डॉ.भारती लव्हेकर यांनी आज सकाळी चार बंगला येथील ग्यान केंद्र शाळेत मतदानाचा हक्क बजावला.
  • नितीन गडकरी यांनी सहपरिवारासोबत टाऊन हॉल महाल येथे मतदानाचा हक्क बजावला.
  • जळगाव : पळासखेड ता. भडगाव येथे सकाळी १०.३० वाजेपर्यंत १८००पैकी ३०जणांनी मतदानाचा हक्क बजावला होता.
  • पोलीस आयुक्त मुंबई विवेक फणसळकर यांनी बजावला मतदानाचा अधिकार
  • तिरोडा विधानसभा मतदारसंघाचे आमदार विजय रहांगडाले व गोंदिया विधानसभा मतदारसंघाचे आमदार विनोद अग्रवाल यांनी कुटुंबीयांसह बजाविला मतदानाचा अधिकार.
  • विषारी हवा, प्रदूषणामुळे परिस्थिती गंभीर; दिल्ली सरकारचा कर्मचाऱ्यांसाठी वर्क फ्रॉम होमचा निर्णय
  • राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोक्कलिंगम यांनी बजावला मतदानाचा अधिकार
  • नांदेड: रवी नगर भागात एक तासापासून ईव्हीएम बंद आहे, मतदार प्रतीक्षेत, दोन मशीनमध्ये झाला बिघाड, १८२ मतदान केंद्र क्रमांक
  • सोलापूर : सोलापुरातील सर्वच मतदान केंद्रावर मतदानास प्रारंभ; बूथ प्रमुख, नेतेमंडळी व पक्षाच्या प्रमुखांसोबत कार्यकर्त्यांचे मतदान सुरू

Ukraine Russia War: युक्रेनला तो त्याग नडला! नाहीतर आज रशियाची हिम्मतही झाली नसती; लुळापांगळा बनला

By ऑनलाइन लोकमत | Published: February 24, 2022 8:00 PM

1 / 10
रशियाने अखेर आज युक्रेनवर पूर्ण ताकदीनिशी हल्ला केला. २००८ मध्ये जॉर्जिया, २०१४ मध्ये क्रिमिया आणि २०२२ मध्ये युक्रेन. रशियाने एकेक करून आपल्यापासून विभक्त झालेल्या देशांवर हल्ले चढविले. जॉर्जिया आणि युक्रेन एकेकाळी सोव्हिएत रशियाचा भाग होते.
2 / 10
बलाढ्य साम्राज्य होते. परंतू १९९१ मध्ये रशियाची शकले झाली आणि नवीन देश निर्माण झाले. तरी देखील रशियाला या देशांवर ताबा ठेवायचा होता. आज युक्रेन रशियाच्या तोडीस तोड असला असता, कदाचित जास्ती. परंतू १९९६ चा तो दिवस युक्रेनला कायमस्वरुपी लुळापांगळा बनवून गेला.
3 / 10
आज रशिया केवळ १४ तासांत युक्रेनच्या राजधानीमध्ये घुसला. युक्रेनचे सैन्य रशियाच्या आक्रमक हल्ल्यांसमोर हतबल झाले. थोडाफार प्रतिकार केला, परंतू बहुतांश बटालियननी रशियन सैन्यासमोर शरणागती पत्करली. अनेक चेकपोस्टवर तर रशियन सैन्याला हल्लाही करावा लागला नाही अशी अवस्था आज युक्रेनमध्ये दिसली.
4 / 10
हतबल झालेला युक्रेन रशियाला तोडीस तोड उत्तर देऊ शकला असता. किंबहूना रशियावने युक्रेनवर हल्लाही केला नसता एवढी शक्ती युक्रेनकडे होती. रशियाकडे आज सहा हजार अण्वस्त्रे आहेत. एक वेळ अशी होती की युक्रेनकडेही मोठ्या प्रमाणावर अण्वस्त्रे होती, एवढी की अमेरिका, रशियानंतर युक्रेनचाच नंबर लागत होता. विचार करा आज जर ती असती तर....रशियाचा हिंमत तरी झाली असती का?
5 / 10
दुसरे महायुद्ध संपासंपायला अमेरिका आणि सोव्हिएत युनियनमध्ये शीतयुद्धाला सुरुवात झाली होती. तेव्हा रशियातच असल्याने युक्रेनमध्येही अणुबॉम्ब होते. तेव्हा दोन्ही देशांमध्ये अण्वस्त्रे बनविण्याची स्पर्धा रंगली होती. अमेरिका आणि सोव्हिएत संघामध्ये बिनसले तेव्हा नाटोमध्ये असलेल्या युरोपियन देशांवर वचक ठेवण्यासाठी रशियाने हजारो अणुबॉम्ब आणि अण्वस्त्रे युक्रेनमध्ये तैनात केली होती.
6 / 10
१९९१ मध्ये सोव्हिएत संघ फुटला आणि तेव्हाच शीतयुद्ध संपल्याचे मानले गेले. युक्रेननेही रशियापासून विभक्त होण्याची घोषणा केली. मात्र ही हजारो अण्वस्त्रे युक्रेनमध्येच राहिली. रशिया आणि समर्थक देशांची आर्थिक परिस्थिती बिघडू लागली. यामुळे या देशांना पश्चिमी देशांशी चांगले संबंध आणि सहकार्याची गरज भासली. इथूनच युक्रेनच्या अण्वस्त्रांच्या त्यागाची स्टोरी लिहीली गेली.
7 / 10
विविध तज्ज्ञ आणि मीडिया रिपोर्टनुसार हा दावा केला जातो. युक्रेनमध्ये तेव्हा १८०० ते २००० अण्वस्त्रे होती. ही संख्या अमेरिका आणि रशियानंतर सर्वात जास्त होती. सध्याच्या माहितीनुसार एवढ्या मोठ्या प्रमाणावर अमेरिका आणि रशियाकडेच अण्वस्त्रे आहेत.
8 / 10
५ डिसेंबर १९९४ मध्ये हंगेरीची राजधानी बुडापेस्टमध्ये रशिया, युक्रेन, बेलारूस, कजाकिस्तान, ब्रिटन आणि अमेरिकेच्या नेत्यांमध्ये एक बैठक झाली. या बैठकीत एका सहकार्य करारावर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या. यामध्ये युक्रेन, बेलारूस आणि कजाकिस्तानच्या स्वातंत्र्यावर आणि त्यांचे हक्क अबाधित राखण्याचे आश्वासन दिले गेले. याला बुडापेस्ट मेमोरंडम ऑन सिक्योरिटी अश्योरेंस असे नाव दिले गेले. या बदल्यात या तीन देशांना त्यांच्याकडील अण्वस्त्रांचा त्याग करायचा होता.
9 / 10
१९९६ मध्ये युक्रेनने त्यांच्याकडे असलेले सर्व अणुबॉम्ब रशियाकडे सुपूर्द केले. काही निष्क्रीय केले. अनेक तज्ज्ञांनी युक्रेनला तेव्हा घाईघाईत निर्णय न घेण्याचा सल्ला दिला होता. याच त्यागाचा आज युक्रेनला परिणाम भोगावा लागला आहे. युक्रेनला २०१४ मध्ये पहिला फटका बसला.
10 / 10
रशियाने तेव्हा युक्रेनवर आक्रमण करून क्रिमिया क्षेत्राचा ताबा घेतला. सैन्य कारवाई करत युक्रेनचे दोन तुकडे केले. यानंतर रशियाने जनमत घेऊन क्रिमियाचे रशियात विलिनीकरण केले. तेव्हाही अमेरिकेने रशियावर प्रतिबंध लादले होते. परंतू त्याचा काहीच परिणाम झाला नाही.
टॅग्स :Russia Ukrainयुक्रेन आणि रशियाwarयुद्धAmericaअमेरिका