शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

अमेरिकेत कोरोना लसीची चार्टर फ्लाइटमधून डिलिव्हरी सुरू, तयार केले सुटकेस सारखे बॉक्स

By ravalnath.patil | Published: November 28, 2020 4:30 PM

1 / 8
अमेरिकेत कोरोना लस वितरणासाठी चार्टर फ्लाइट्स सुरू करण्यात आली आहेत. फायझरची कोरोना लस युनायटेड एअरलाइन्सच्या विमानाने एका ठिकाणाहून दुसर्‍या ठिकाणी पाठविली जात आहे.
2 / 8
दरम्यान, काही दिवसांपूर्वी फायझरने म्हटले आहे की, त्याची कोरोना लस 95 टक्के प्रभावी आहे. फायझर कंपनीच्या योजनेनुसार, अमेरिकेतील लसीकरण केंद्राच्या अगदी जवळपर्यंत फ्लाइट्समधून लस वितरीत केली जाईल.
3 / 8
मात्र, वितरण केंद्रापासून लसीकरण केंद्रापर्यंत कोरोना लस पोहोचण्यास तीन दिवसांचा कालावधी लागू शकतो. वॉल स्ट्रीट जर्नलच्या अहवालानुसार, जागतिक पुरवठा आणि वितरणासाठी फ्लाइटमधून लस पाठविणे ही एक महत्त्वपूर्ण तयारी आहे.
4 / 8
डिसेंबर महिन्याच्या शेवटच्या दिवसांमध्ये अमेरिकेत लसीकरण सुरू केले जाईल, अशी अपेक्षा आहे. अन्न व औषध प्रशासनाकडून लवकरच या लसीला मंजुरी मिळण्याची शक्यता आहे.
5 / 8
युनायटेड एअरलाइन्सलाही लस पुरवण्यासाठी फ्लाइट्समध्ये अतिरिक्त बर्फ ठेवण्यास मंजुरी देण्यात आली आहे.
6 / 8
फायझरची लस उणे 70 डिग्री सेल्सियसवर ठेवावी लागते. लसीच्या पुरवठ्यासाठी फायझरने सूटकेसच्या आकाराचे बॉक्स तयार केले आहेत.
7 / 8
फायझरने याआधी सांगितले होते की, अमेरिका आणि युरोपमधील कंपनीच्या स्टोअरमध्ये आधीपासूनच लसीचे लाखों डोस तयार आहेत.
8 / 8
त्यामुळे वितरणाची तयारी केली जात आहे. जेणेकरुन या लसीला मंजुरी मिळाताच सुरू होऊ शकेल. कंपनी दररोज 20 फ्लाइटमधून लस वितरीत करू शकते.
टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याAmericaअमेरिका