शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

अमेरिकेचा 'रोमियो' उडवणार चीनची झोप, हिंद महासागरात राहणार भारताचा दबदबा

By ऑनलाइन लोकमत | Published: April 03, 2019 12:41 PM

1 / 6
शत्रूंना आक्रमकपणे भेदणारे मिसाईल आता हेलिकॉप्टरमधूनही सोडता येणार आहेत. लवकरच मिसाईल टाकणारे हेलिकॉप्टर भारताला मिळणार आहेत. अमेरिकेने 24 एमएच 60 'रोमियो' सीहॉक हेलिकॉप्टरच्या विक्रीला मंजूरी देण्यात आली आहे. या घातक हेलिकॉप्टरमधून शत्रूंवर मिसाईलने हल्ला करता येणार आहे.
2 / 6
या हेलिकॉप्टरचा वापर विशेषत: सागरी मिशनसाठी करण्यात येणार आहे. अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाकडून 2.4 अब्ज डॉलर रुपयांच्या किंमतीने भारताला हे हॅलिकॉप्टर देण्यात येणार आहे.
3 / 6
लॉकहीड मार्टीन या कंपनीकडून बनविण्यात येणाऱ्या हेलिकॉप्टरमध्ये पाणबुडी आणि नौकांना अचूक भेदण्याचा सामर्थ्य आहे. त्याचसोबत समुद्रातील बचाव आणि शोध कार्यातही याचा वापर होणार आहे.
4 / 6
ट्रम्प प्रशासनाकडून मंगळवारी 24 एमएच 60 या बहुउपयोगी हेलिकॉप्टरच्या विक्रीसाठी मंजूरी देण्यात आली आहे. भारताच्या ताफ्यात नव्याने दाखल होणाऱ्या या हेलिकॉप्टरमुळे भारताच्या सागरी सीमेवर युद्ध परिस्थिती यश मिळवण्यासाठी भारतीय नौदलला अजून सक्षम केले आहे.
5 / 6
या हेलिकॉप्टरमुळे हिंद महासागर, दक्षिण आशियात राजकीय स्थिरता, शांती आणि आर्थिक प्रगतीसाठी भारताला उपयोगी होणार आहे. तसेच शत्रूंपासून सुरक्षा करण्यातही महत्त्वपूर्ण भूमिका निभावणार आहे. भारताच्या सागरी सीमेवर शत्रूंपासून बचाव करण्यासाठी भारताला मदत मिळणार आहे.
6 / 6
भारताच्या सीमेवरील सुरक्षेसह अंतर्गत सुरक्षेसाठी मोठं पाऊल ठरणार आहे. हिंद महासागरात चीनकडून होणाऱ्या हालचालींमुळे भारताला सागरी सीमेवर करडी नजर ठेवावी लागणार आहे. भारतीय नौदलाची मारक क्षमता वाढविण्यात हेलिकॉप्टर योग्य दिशा देणार आहे
टॅग्स :IndiaभारतchinaचीनAmericaअमेरिका