1 / 9कोरोना महामारीवरून सुरू असलेल्या आरोप-प्रत्यारोपामुळे गेल्या काही आठवड्यांपासून चीनचे अमेरिका आणि ऑस्ट्रेलियासोबत संबंध बिघडले आहेत. अशातच अमेरिकेने दोन महिन्यांपूर्वीचा आपला निर्णय बदलून ऑस्ट्रेलियामध्ये त्यांच्या मरीन सैनिकांना तैनात करण्याचा निर्णय घेतलाय.2 / 9डेली मेलच्या एका रिपोर्टनुसार, ऑस्ट्रेलियातील डार्विनमध्ये साधारण 1200 सैनिकांना तैनात केलं जात आहे. काही आठवड्यांपूर्वी ऑस्ट्रेलियाने चीनकडून कोरोना व्हायरस पसरण्याबाबत चौकशीची मागणी केली होती. 3 / 9चीनने यावर विरोध दर्शवला होता. आणि चीनने ऑस्ट्रेलियातून आयात होणाऱ्या वस्तूंवर मोठ्या प्रमाणात टॅरिफ लावला होता.4 / 9रिपोर्टनुसार, येणाऱ्या काही आठवड्यांमध्ये अमेरिका त्यांचे 1200 सैनिक ऑस्ट्रेलियात तैनात करणार आहे. याआधी अमेरिकेने मार्चमध्ये निर्णय घेतला होता की, कोरोना महामारीच्या धोक्यामुळे ते यावर्षी मरीन रोटेशनल फोर्सची तैनाती ऑस्ट्रेलियात करणार नाहीत. 5 / 9अमेरिकेचे संरक्षण मंत्री मार्क इस्पर यांनी त्यावेळी अमेरिकन सैनिकांच्या देशाबाहेरील सर्वच मुव्हमेंटवर बंदी आणली होती.6 / 9अमेरिकी मरीन्स आता ऑस्ट्रेलियाच्या सुरक्षा दलासोबत सप्टेंबरपर्यंत ट्रेनिंग करतील. मूळ योजनेनुसार 2500 मरीन्स ऑस्ट्रेलियातील डारविनमध्ये तैनात केले जाणार होते. एवढ्याच संख्येत मरीन गेल्यावर्षीही तैनात करण्यात आले होते.7 / 9ऑस्ट्रेलियात पोहोचल्यावर मरीन्सना 14 दिवसांसाठी क्वारंटाइनमध्ये रहावं लागेल. ऑस्ट्रेलियाच्या संरक्षण मंत्री लिंडा रेनॉल्ड्स यांनी सांगितले की. सैनिकांना तैनात करणं हे अमेरिका आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील जवळचे संबंध दर्शवतो.8 / 9लिंडा रेनॉल्डस म्हणाल्या होत्या की, मरीन रोटेशनल फोर्स, अमेरिका-ऑस्ट्रेलिया संबंध किती मजबूत आहे हे दर्शवतं. आणि याने क्षेत्रिय सुरक्षेबाबत ठरलेल्या प्रतिबद्धतेचा संदेशही जातो.9 / 9पहिल्यांदा 2011 मध्ये तत्कालीन अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा आणि ऑस्ट्रेलियाच्या तत्कालीन पंतप्रधान जुलिया गिलार्ड यांनी रोटेशनल फोर्स तैनात करण्याचा निर्णय घेतला होता. मरीन्सचा पहिला दल 2012 मध्ये ऑस्ट्रेलियात आला होता. ज्यात 200 सैनिक होते. त्यानंतर मरीन्सची संख्या वाढत गेली.