शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

'या' देशात पसरतेय कोरोनापेक्षाही घातक महामारी, चिनी अधिकाऱ्यांचा धक्कादायक दावा

By ऑनलाइन लोकमत | Published: July 10, 2020 10:28 PM

1 / 10
संपूर्ण जग कोरोना व्हायरसचा सामना करत असतानाच आणखी एक घातक आजार तोंड वर काढत असल्याचे वृत्त आहे. कझाकिस्तानमध्ये आणखी एक महामारी झपाट्याने पसरू लागली आहे. CNNने दिलेल्या एका वृत्तानुसार, चीनच्या अधिकाऱ्यांनी इशारा देत म्हटले आहे, की कझाकिस्तानमध्ये एक नव्या प्रकारचा 'निमोनिया' वेगाने पसरत आहे. जो कोरोना व्हायरसपेक्षाही अधिक जीवघेणा आणि घातक आहे.
2 / 10
प्रसिद्ध झालेल्या वृत्तानुसार, कझाकिस्तानातील चीनी दुतावासने एका निवेदनात म्हटले आहे, 'कझाकिस्तानातील आरोग्य विभाग आणि इतर काही संस्था यासंदर्भात संशोधन करत आहेत. मात्र अद्याप या निमोनियाच्या व्हायरसची ओळख पटलेली नही.
3 / 10
दुतावासाने म्हटले आहे, कझाकिस्तानात जून महिन्याच्या मध्यापासून या अज्ञात निमोनियाचे नवे रुग्ण मोठ्या प्रमाणावर वाढले आहेत. एवढेच नाही तर काही ठिकाणी दिवसाला शेकडो रुग्ण समोर येत आहेत.
4 / 10
स्थानिक माध्यमांचा हवाला देते दुतावासाने आपल्या निवेदनात म्हटले आहे, की आतापर्यंत अतायरू, अकोतोब आणि श्यामकेंट या भागांत अधिक लक्ष दिले जात आहे. येथे जवळपास 500 नवे रुग्ण आहेत. तर 30 हून अधिक जण गंभीर आहेत.
5 / 10
चीनी दुतावासाने दिलेल्या माहितीनुसरा, या आजाराने आतापर्यंत 1,772 जणांचा मृत्यू झाला आहे. यात काही चिनी नागरिकांचाही समावेश आहे.
6 / 10
यातील 628 जणांचा मृत्यू केवळ जून महिन्यातच झाला आहे. दुतावासाने म्हटले आहे, की 'हा आजार Covid-19 पेक्षाही अधिक घात आहे.'
7 / 10
कझाकिस्तानातील मुख्य वृत्त संस्था कझिनफॉर्मने दिलेल्या आकड्यांचा हवाला देत सांगण्यात आले आहे, की राजधानी नूरसुल्तानमध्ये गेल्या वर्षीच्या जून महिन्याच्या तुलनेत यावर्षीच्या जून महिन्यात निमोनियाच्या रुग्णांची संख्या दुप्पट झाली आहे.
8 / 10
कजिनफॉर्मने दिलेल्या माहितीनुसार, नूरसुल्तान आरोग्य विभागाच्या प्रमुखांनी म्हटेल आहे, की 'रोज 200 हून अधिक लोक रुग्णालयात दाखल होत आहेत. गेल्या काही दिवसांपासून रोज, निमोनियाने त्रस्त असलेल्या जवळपास 300 लोकांना रुग्णालयात न्यावे लागत आहे.
9 / 10
या गंभीर आजारामुळे प्रभावित झालेल्या भागांतील रहिवाशांना गर्दीच्या ठिकाणी जाऊ नये, असा इशारा चीनी दुतावासाने दिला आहे.
10 / 10
याशिवाय येथील लोकांना, मास्कचा वापर करणे, राहण्याचे ठिकाण सॅनिटाईज करणे आणि वारंवार हात धुण्यास सांगण्यात येत आहे.
टॅग्स :chinaचीनhospitalहॉस्पिटलcorona virusकोरोना वायरस बातम्याdocterडॉक्टर