शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Pentagon Latest Report to China: भारताला सीमावादात गुंतवून चीननं साधला 'डाव'; अमेरिकेचा धक्कादायक अहवाल

By ऑनलाइन लोकमत | Published: November 04, 2021 1:08 PM

1 / 9
चीनचं सैन्य मिशन आणि राष्ट्रपती क्षी जिनपिंग यांच्या (Xi Jinping) नेतृत्त्वाचा वाढता प्रभाव तसंच त्यांच्या कार्यकाळात सुरू करण्यात आलेल्या सर्व योजना अशा प्रत्येक गोष्टीबाबत अमेरिकेच्या पेंटागॉननं सविस्तर अहवाल जारी केला आहे. यात तैवान संकट, भारत-चीन सीमावाद सोबतच गेल्या वर्षी पीपल्स लिबरेशन आर्मी द्वारे आयोजित बहुपक्षीय अभ्यास पॅटर्नचाही सविस्तर डेटाचा समावेश आहे.
2 / 9
अमेरिकेसोबत भारताचे संबंध सुधारावेत असं चीनला अजिबात वाटत नाही. त्यासाठी भारताला रोखण्याचा चीनचा प्रयत्न आहे. इतकंच नव्हे तर भारत-चीन सीमावाद जाणवीपूर्वकरित्या ज्वलंत ठेवण्याचं काम चीनकडून केलं जात असल्याचं अहवालात नमूद करण्यात आलं आहे.
3 / 9
पेंटागॉनकडून नियमीत स्वरुपात पूर्व लदाखमधील भारत-चीन सैन्य कारवायांचा सविस्तर अहवाल अमेरिकन काँग्रेसला पाठवला जातो. चीन आपले शेजारी देश विशेषत: भारतासोबत आक्रमक व्यवहार करत आहे. शेजारील देशांना भीती घालण्यासाठी चीननं तिबेट आणि शिंजियांमध्ये निर्धारित सुरक्षा दलांना पश्चिम चीनमध्ये पाठवण्यात आलं. जेणेकरुन सीमेवर भीती निर्माण करता येईल, असं अहवालात नमूद करण्यात आलं आहे.
4 / 9
२०२० साली चीननं एलएसीच्या पूर्व भागात चीननं तिबेट स्वायत्त क्षेत्र आणि भारताच्या अरुणाचल प्रदेशातील राज्यामधील वादग्रस्त भागात १०० घरांचं एक गाव वसवलं असल्याचा अहवाल पेंटागननं दिला आहे. भारतासोबतचा सीमावाद याच काळात शिगेला पोहोचला होता. तरीही चीननं न थांबता आक्रमक पवित्रा घेतला. चीननं पश्चिम हिमालयात दूरवर एक फायबर-ऑप्टिक नेटवर्क प्रस्थापित केलं आहे.
5 / 9
फायबर-ऑप्टिक नेटवर्क प्रस्थापित करुन सहजपणे संचार व्यवस्थेला सुधारुन परदेशी हस्तक्षेप कमी करण्याचा मनसुबा चीनचा आहे.
6 / 9
रिपोर्टमधील माहितीनुसार चीनच्या फील्ड कमांडर्सना याचा फायबर ऑप्टिक नेटवर्कचा खूप फायदा झाला आहे. यामाध्यमातून चीनकडून रिअल टाइम आयएसआर (इंटेलिजन्स, सर्व्हिलन्स आणि रिकॉनिसन्स) आणि इतर महत्त्वपूर्ण माहितीवर नजर ठेवली जात आहे.
7 / 9
भारताला सीमा वादात गुंतवून चीननं सीमा परिसरात इतर गोष्टींना बळकटी आणण्याचा डाव साधला हे यातून दिसून येतं असं अहवालात नमूद करण्यात आलं आहे. फायबर ऑप्टिक नेटवर्क आणि १०० घरांचं गाव हे त्याचच फलित असल्याचं नमूद करण्यात आलं आहे.
8 / 9
चीनकडून सातत्यानं अण्वस्त्रांच्या संख्येत वाढ केली जात आहे. २०३० पर्यंत ड्रॅगनकडे असलेल्या अण्वस्त्रांची संख्या हजाराच्या घरात जाईल, असा अंदाज पेंटागॉननं बांधला आहे. चीननं सैन्याच्या आधुनिकीकरणावर लक्ष केंद्रीत केलं आहे. चीननं अण्वस्त्रांच्या संख्येत वाढ करण्यासाठी टॉप गियर टाकला आहे. चीनकडून होणारी अण्वस्त्र वाढ संपूर्ण जगाची चिंता वाढवणारी आहे.
9 / 9
दशकाच्या अखेरपर्यंत चीनकडे असलेल्या अण्वस्त्रांची संख्या ४०० च्या आसपास असेल असा अंदाज पेंटागॉननं आधीच्या अहवालात व्यक्त केला होता. मात्र आता पेंटागॉननं हाच आकडा हजारच्या घरात जाईल असा अंदाज बांधला आहे. सध्या अमेरिकेकडे ३ हजार ७५० अण्वस्त्रं आहेत. यामध्ये वाढ करण्याचा अमेरिकेचा सध्या तरी कोणताही विचार नाही.
टॅग्स :chinaचीनindia china faceoffभारत-चीन तणावAmericaअमेरिका