us justice department says recovery of millions of ransom from hackers of colonial pipeline
Colonial Pipeline: अमेरिकेशी पंगा घेणं पडलं भारी; रशियन हॅकर्सकडून वसूल केले ४ लाख डॉलर्स By ऑनलाइन लोकमत | Published: June 09, 2021 3:44 PM1 / 10अलीकडेच अमेरिकेच्या एका इंधन वाहून नेणाऱ्या पाईपलाइनवर मोठा सायबर हल्ला करण्यात आला होता. काही काळासाठी ही पाइपलाइन बंद करण्यात आली होती. 2 / 10या सायबर हल्ल्यात १०० जीबी डेटाची चोरी करण्यात आली होती. डेटा परत मिळवण्यासाठी कंपनीने ४.४ मिलियन डॉलर म्हणजेच जवळपास ३२ करोड २० लाख रुपयांची खंडणी दिली होती. 3 / 10अमेरिकेतील या कंपनीचे नाव कोलोनियल. अमेरिकेतील एका अधिकाऱ्याने केलेल्या दाव्यानुसार, खंडणीस्वरुपात दिलेली रकमेपैकी मोठी रक्कम पुन्हा वसूल करण्यास सुरुवात केली आहे. 4 / 10रशियन हॅकर्सनी ही कोट्यावधींची रक्कम क्रिप्टोकरन्सीमध्ये गुंतवली होती. अमेरिकेतील तपास अधिकाऱ्यांनी ४ मिलियन डॉलरचे ७५ बिटकॉइन शोधून काढले आहेत. 5 / 10पाईपलाईनवर केलेल्या सायबर हल्ल्यामुळे अमेरिकेत आणीबाणीची परिस्थिती निर्माण झाली होती. बायडेन यांच्या प्रशासनाने न्याय विभागाच्या अंतर्गत एका विशेष टास्क फोर्सची निर्मिती केली होती. 6 / 10या टास्क फोर्समधील अधिकाऱ्यांनी खंडणीचा मागोवा घेतला आणि त्यानंतर डार्कसाइडवरील २३ वेगवेगळ्या इलेक्ट्रॉनिक खात्यांचा तपास करण्यास सुरुवात केली. यामधून सुमारे ६३.७ बिटकॉइन जप्त करण्यात आले.7 / 10नफ्यासाठी अगदी संपूर्ण शहरांना ओलिस ठेवण्यासाठी तंत्रज्ञानाचा अत्याधुनिक वापर करण्यात येत आहे. २१व्या शतकातील हे मोठे आव्हान आहे असे डिप्टी अॅटर्नी जनरल लिसा मोनाको यांनी सांगितले. 8 / 10खंडणी आणि इतर सायबर-हल्ले रोखण्यासाठी आम्ही आमची सर्व उपकरणे व संसाधनांचा वापर सुरू ठेवणार आहोत, असेही लिसा मोनाको यांनी सांगितले. 9 / 10गेल्या महिन्यात ७ मे रोजी सायबर हल्ल्यानंतर कंपनीच्या एका कर्मचार्यास नियंत्रण कक्षातील कॉम्प्युटर हॅकर्सकडून खंडणीचे पत्र पाठवले होते. 10 / 10कंपनीवर जेव्हा सायबर हल्ला झाला तेव्हा जवळपास पाच दिवस या सेवा खंडित झाल्या होत्या. त्याचा थेट परिणाम देशातील इंधन पुरवठ्यावर झाला. आणखी वाचा Subscribe to Notifications