US model buried with her wedding dress after death due to drug overdose
ड्रग्सच्या ओवरडोजमुळे प्रसिद्ध मॉडलचा मृत्यू, काही दिवसातच होणार होतं तिचं लग्न By ऑनलाइन लोकमत | Published: September 05, 2022 5:11 PM1 / 6Christy Giles Wedding Dress: अमेरिकेच्या लॉस एन्जलिसमधून एक हैराण करणारी घटना समोर आली आहे. इथे एका मॉडलचा ड्रग्सच्या ओवरडोसने मृत्यू झालाय. मॉडलचा साखरपुडा झाला होता आणि ती लवकरच लग्न करणार होती. पण त्याआधीच तिचा मृत्यू झाला. मॉडलचा लग्नाचा गाउनही खरेदी करण्यात आला होता. पण तिचा मृत्यू झाला. मॉडलचे आई-वडील या घटनेने फार दु:खी आहेत. जो लग्नाचा गाउन ती घालू शकली नाही तो त्यांनी तिच्यासोबतच दफन केला.2 / 6'डेली मेल'मध्ये प्रकाशित वृत्तानुसार, ड्रग ओवरडोजमुळे ज्या मॉडलचा मृत्यू झाला तिचं नाव क्रिस्टी गिल्स (Christy Giles) होत. वयाच्या 24व्या वर्षीय तिचा मृत्यू झाला. आरोप आहे की, एका हॉलिवूड निर्मात्याने मॉडल आणि तिच्या आर्किटेक्ट मित्राला ड्रग्सचा ओवरडोज दिला होता. ज्यामुळे मॉडलचा मृत्यू झला. या घटनेमुळे दु:खी झालेल्या मॉडलच्या आई-वडिलांनी तिचा लग्नाचा गाउन तिच्यासोबत दफन केला.3 / 6मॉडल क्रिस्टी गिल्सला अमेरिकेच्या अलबामामध्ये दफन करण्यात आलं. इथे मॉडलचं लग्न होणार होतं. मॉडलच्या आई-वडिलांच्या अनेक इच्छा होत्या. पण लग्नाआधीच त्यांच्या मुलीचं निधन झालं. मॉडलचा साखरपुडा 2019 साली झाला होता. तिचं लग्न जेन सिलिर्ससोबत ठरलं होतं. त्यालाही या घटनेने मोठा धक्का बसला आहे.4 / 6मॉडलच्या आई-वडिलांनी मुलाखतीत सांगितलं की, त्यांना त्यांच्या मुलीला लग्नाच्या ड्रेसमध्ये बघायचं होतं. पण त्यांचं हे स्वप्न पूर्ण होऊ शकलं नाही. लग्नाआधीच मुलीचं निधन झाल्याने त्यांना चांगलाच धक्का बसला. त्यांनी मुलीच्या लग्नासाठी सगळं काही प्लान केलं होतं. 5 / 6दरम्यान, मॉडल एका हॉस्पिटलबाहेर मृत आढळून आली होती. 24 वर्षीय आपल्या मुलीच्या मृत्यूची सूचना मिळाल्यावर आई-वडिलांना विश्वास बसला नव्हता. ते म्हणाले की, त्यांचं त्यांच्या मुलीवर खूप प्रेम होतं. त्यामुळे मुलीसाठी खरेदी केलेला गाउनही आणि तिच्या काही वस्तू त्यांनी तिच्यासोबत दफन केल्या. जेणेकरून त्यांचा कुणी वापर करू नये.6 / 6मॉडलसाठी पांढऱ्या रंगाचा गाउन खरेदी करण्यात आला होता. गाउन दफन करण्याआधी एक फोटो काढण्यात आला. ज्यात ती फार सुंदर दिसत आहे. आणखी वाचा Subscribe to Notifications