The US Navy is stationed at these major locations around the world
जगभरातील या प्रमुख ठिकाणी तैनात आहे अमेरिकन नौदलाचे आरमार By ऑनलाइन लोकमत | Published: January 16, 2020 8:52 AM1 / 8जागतिक महासत्ता असलेल्या अमेरिकेचे सैन्यदल जगात सर्वात प्रभावी आहे. त्यातही अमेरिकेचे नौदल इतर देशांच्या तुलनेत बलाढ्य असून, जगभरात अमेरिकेचे वर्चस्व राखण्यामध्ये हे नौदल महत्त्वाची भूमिका बजावत असते. संपूर्ण जगाचा विचार केल्याच जगभरातील महत्त्वाच्या भागामध्ये अमेरिकन नौदलाचे आरमार तैनात असते. 2 / 8अमेरिकन नौदलाचे दुसरे आरमार उत्तर अटलांटिक महासागरामध्ये अमेरिकेत तैनात आहे. 3 / 8अमेरिकन नौदलाचे तिसरे आरमार पॅसिफिक महासागरात तैनात आहे. याचे मुख्यालय सॅन डियागो येथे आहे. 4 / 8दक्षिण अटलांटिक महासागरामध्ये अमेरिकेच्या चौथ्या आरमाराची तैनाती करण्यात आलेली आहे. या आरमाराचे मुख्यालय मेपो, फ्लोरिडा येथे आहे. 5 / 8अमेरिकन नौदलाचे पाचवे आरमार मध्य पूर्वेत तैनात आहे. या आरामाराचे मुख्यालय बहरीनमधील मनामा आहे. 6 / 8इटलीतील गाएटा येथे अमेरिकेचे सहावे आरमार तैनात करण्यात आलेले आहे. भूमध्य समुद्रामध्ये रशियन नौदलाचा होणारा हस्तक्षेप रोखणे हा या आरमाराच्या तैनातीचा हेतू आहे. 7 / 8पश्चिम पॅसिफिक महासागरात अमेरिकन लष्कराचे सातवे आरमार तैनात आहे. या आरमाराचे मुख्यालय जपानमधील योकोशुमा येथे आहे. 8 / 8अमेरिकेतील मध्य अटलांटिक किनाऱ्यावर अमेरिकेचे दहावे आरमार तैनात आहे. या आरमाराला सायबर कमांड म्हटले जाते. आधुनिका काळातील सायबर वॉरचा सामना करणे हे या कमांडचे काम आहे. आणखी वाचा Subscribe to Notifications