शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

अमेरिकेकडून चीनविरोधात युद्धाची तयारी?; दुसऱ्या महायुद्धातील नौदलाच्या 'विध्वंसक' तळाची पुन्हा उभारणी

By ऑनलाइन लोकमत | Published: July 13, 2020 3:07 PM

1 / 10
दक्षिण चीन सागरामध्ये काही दिवसांपूर्वीच चीनच्या धमकीनंतर अमेरिकेने अण्वस्त्र वाहून नेणारे विमान आणि सोबत 10 लढाऊ विमाने उडविल्याने चीनच्या तळपायाची आग मस्तकात गेली आहे. या समुद्रात चीनदेखील युद्धाभ्यास करत आहे.
2 / 10
यामुळे दोन्ही देशांमध्ये संबंध चिघळण्याची शक्यता असून चीनच्या कोणत्याही पावलाला उत्तर देण्यासाठी अमेरिका चीनला चारही बाजुंनी घेरण्याची तयारी करत आहे.
3 / 10
चीनच्या कोणत्याही हल्ल्याला रोखण्यासाठी अमेरिका दुसऱ्या महायुद्धातील एका नौसेनेच्या तळाला अद्ययावत करू लागला आहे. दुसऱ्या महायुद्धात हा तळ जपान आणि अमेरिकेच्य़ा भीषण युद्धाचा साक्षीदार बनला होता.
4 / 10
प्रशांत महासागरात वेक बेटावर अमेरिकेच्या नौदलाचा तळ जवळपास बंद ठेवला होता. हा तळ अमेरिकेच्या हवाई आणि जपानच्या मध्ये आहे. हा तळ दुसऱ्या महायुद्धावेळी वापरण्यात आला होता. या तळावरून अमेरिका चीन आणि उत्तर कोरियाच्या प्रत्येक हालचालींवर लक्ष ठेवू शकणार आहे.
5 / 10
वेक बेट हे अमेरिकेचे एक रणनीतिक पोस्ट आहे. इथे नौसैनिक विश्रांती घेण्यासाठी येतात. तसेच काही युद्धनौकांची दुरुस्ती किंवा इंधन साठविण्यात येते.
6 / 10
हवाई न्‍यूज सर्व्हीस केआयटीव्ही 4 नुसार या तळावर गेल्या काही दिवसांपासून हालचाली वाढल्या आहेत. या नाविक तळ अद्ययावत करण्य़ासाठी अमेरिका जोरात काम करत आहे.
7 / 10
महत्वाचे म्हणजे हा नाविक तळ उत्तर कोरिया आणि चीनच्या मध्यम पल्ल्याच्या क्षेपणास्त्रांच्या टप्प्यात येत नाही. येथे हवाईदलासाठी मजबूत बांधकाम केले जात आहे.
8 / 10
या बेटावर तीन किमी लांब रनवे आहे. येथे लढाऊ विमाने आरामात उतरू शकतात. आता हा अड्डा पूर्णपणे अद्यायवत करण्यात येत आहे.
9 / 10
दक्षिण चायना समुद्रावर वर्चस्व प्रस्थापित करण्यासाठी चीन कृत्रिम बेटांवर सैन्याचा तळ उभारू लागला आहे. यामुळे अमेरिकेचे हे पाऊल चीनवर दबाव वाढविण्यासाठी आहे.
10 / 10
जवळपास 10 वर्षे चीनने या समुद्रात घुसखोरी करून मोठे तळ उभारले आहेत. आता चीन या ठिकाणी एअर डिफेन्स आयडेंटिफिकेशन झोन बनविणार आहे. या झोनमध्ये चीन तैवान आणि व्हिएतनामच्या बेटांनाही सहभागी करणार आहे. यामुळे शेजारी देशांशी व अमेरिकेशी तणाव मोठ्या प्रमाणावर वाढण्याची शक्यता आहे.
टॅग्स :AmericaअमेरिकाchinaचीनJapanजपान