शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

अमेरिकेच्या अध्यक्षपदाची शपथ घेतल्यानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा पत्नीसोबत डान्स, पहा फोटो

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 21, 2025 14:45 IST

1 / 7
अमेरिकेचे अध्यक्ष म्हणून शपथ घेतल्यानंतर डोनाल्ड ट्रम्प एका उत्सव सोहळ्यात सहभागी झाले. यावेळी पत्नी मेलानिया ट्रम्प यांच्यासोबत डोनाल्ड ट्रम्प यांनी डान्स केला. त्यांचा रोमँटिक अंदाज यावेळी बघायला मिळाला.
2 / 7
अमेरिकेच्या फर्स्ट लेडी मेलानिया ट्रम्प यांनी या कार्यक्रमासाठी पांढऱ्या शुभ्र ड्रेस परिधान केला होता. मेलानिया ट्रम्प या डोनाल्ड ट्रम्प यांच्या तिसऱ्या पत्नी आहेत.
3 / 7
डोनाल्ड ट्रम्प यांचे पहिले लग्न इवाना ट्रम्प यांच्यासोबत झाले होते. त्यानंतर मार्ला मैपल्स यांच्यासोबत दुसरे लग्न झाले. ६ वर्ष एकत्र राहिल्यानंतर दोघांनी घटस्फोट घेतला. त्यानंतर २००५ मध्य ट्रम्प यांनी मेलानिया यांच्यासोबत तिसरे लग्न केले.
4 / 7
मेलानिया यांचा जन्म २६ एप्रिल १९७० रोजी स्लोव्हेनियामध्ये झाला होता. त्या अमेरिकेच्या दुसऱ्या फर्स्ट लेडी (प्रथम पहिला) आहेत, ज्यांचा जन्म अमेरिकेच्या बाहेर झालेला आहे. मेलानिया ट्रम्प यांनी मॉडेल म्हणून स्वतःची ओळख निर्माण केली होती.
5 / 7
१९९६ मध्ये मेलानिया ट्रम्प या न्यूयॉर्कमध्ये राहायला आल्या. १० वर्ष राहिल्यानंतर त्यांना अमेरिकेचे नागरिकत्व मिळाले. मेलानिया आणि ट्रम्प यांना लग्नानंतर एक मुलगा झाला. ज्याचं नाव बॅरेन ट्रम्प आहे.
6 / 7
अमेरिकेचे ४७वे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना पाच मुलं आहेत. यापैकी डोनाल्ड ट्रम्प ज्युनिअर आणि इवान्का ट्रम्प यांची फार चर्चा होत असते.
7 / 7
राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी शपथविधी सोहळ्यानंतर आयोजित एका कार्यक्रमात केक कापून आनंद साजरा केला.
टॅग्स :Donald Trumpडोनाल्ड ट्रम्पUSअमेरिकाAmericaअमेरिकाWorld Trendingजगातील घडामोडी