Corona Vaccine : कोरोना लसीमुळे पॅरालिसिसचा कितपत धोका?; रिसर्चमधून मोठा खुलासा, तज्ज्ञ म्हणतात.... By ऑनलाइन लोकमत | Published: August 18, 2021 12:06 PM
1 / 14 जगभरात कोरोनाचा हाहाकारा पाहायला मिळत आहे. रुग्णांच्या संख्येने तब्बल 20 कोटींचा टप्पा पार केला आहे. तर लाखो लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले जात आहेत. 2 / 14 कोरोनामुळे अनेक देशांत गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. रुग्णांच्या संख्येत सातत्याने वाढ होत असल्याने प्रशासनाच्या चिंतेत भर पडली आहे. प्रगत देशही कोरोनापुढे हतबल झाल्याचं पाहायला मिळत आहे. 3 / 14 जगभरात कोरोना लसीकरण मोहीम वेगाने सुरू आहे. कोट्यवधी लोकांनी आतापर्यंत लस घेतली आहे. अशातच लस आणि साईड इफेक्टची चर्चा रंगली आहे. अनेकांनी साईड इफेक्टच्या भीतीने लस घेण्यास नकार दिला आहे. 4 / 14 कोरोना व्हायरस आणि लस याबाबत युद्धापातळीवर संशोधन केलं जात असून रोज नवनवीन माहिती समोर येत आहे. अशाच एका रिसर्चमधून महत्त्वाची माहिती देण्यात आली आहे. कोरोना लसीमुळे पॅरालिसिसचा धोका अत्यंत कमी असल्याची माहिती आहे. 5 / 14 कोरोना लसीचे अनेक फायदे असल्याचंही रिसर्चमध्ये म्हटलं आहे. हाँगकाँग विद्यापीठाच्या संशोधकांनी इनएक्टिवेटेड लस जर एक लाख लोकांना दिली तर 4.8 टक्के लोकांना या चेहऱ्याच्या पॅरालिसिसचा धोका असल्याचं म्हटलं आहे. 6 / 14 लँसेट जर्नलमध्ये प्रकाशित करण्यात आलेल्या रिपोर्टमध्ये संशोधकांनी याला बेल्स पाल्सी असं म्हटलं आहे. ज्यामध्ये चेहऱ्याच्या एका बाजुला लकवा मारला जातो. पण या आजाराची लक्षणं सहा महिन्यांच्या आत नष्ट होतात. 7 / 14 संशोधक प्रा. लॅन चि की वोंग यांनी कोरोनोवॅक लस घेतल्यानंतर अशा प्रकारची अधिक प्रकरणे पाहिली जात आहेत असं म्हटलं आहे. तसेच अमेरिकेत वापरली जाणारी फायझर आणि मॉडर्ना ही एमआरएनए लस आहे. त्यात अशी कोणतीही चिन्हे नाहीत पण देखरेख चालू आहे. 8 / 14 आयर्लंडमध्ये करण्यात आलेल्या एका रिसर्चनुसार, कोविड सिंड्रोम असलेल्या रुग्णांमध्ये बऱ्याच काळापासून रक्त गोठण्याचे प्रमाण जास्त आढळले आहे. यामुळे, श्वास घेण्यात अडचण, शारीरिक तंदुरुस्ती आणि थकवा यासारखी लक्षणे कोरोनापासून बरे झाल्यानंतरही बराच काळ राहतात. 9 / 14 आयर्लंडच्या आरसीएसआय युनिव्हर्सिटी ऑफ मेडिसिन अँड हेल्थ सायन्सच्या संशोधकांनी अभ्यासात 50 रुग्णांचा समावेश केला होता. यातून याबाबत महत्त्वाची माहिती आता समोर आली आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 10 / 14 जगभरात कोरोनाने थैमान घातले आहे. सर्वच जण कोरोनाच्या संकटाचा सामना करत आहेत. मात्र कोरोना काळात शारीरीक आणि मानसिक आरोग्यावरही वाईट परिणाम होत आहे. 11 / 14 तरुणांमधील डिप्रेशनमध्ये वाढ झाली आहे. एका रिसर्चमधून हा दावा करण्यात आला आहे. नैराश्याचा सामना करण्यांमध्ये तरुणांची संख्या ही मोठी आहे. अशा परिस्थितीत नोकरी करणाऱ्या तरुणांसमोर आता दुहेरी आव्हान आहे. 12 / 14 मेडिकल जर्नल जेएएमए पीडियाट्रिक्समध्ये प्रकाशित करण्यात आलेल्या रिसर्चनुसार, जागतिक स्तरावर चारमधील एक तरुण डिप्रेशनच्या समस्येचा सामना करत आहे. तर पाचमधील एकामध्ये एंजायटीची लक्षणं पाहायला मिळत आहेत. 13 / 14 विद्यापीठाचे क्लिनिकल मानसशास्त्रज्ञ आणि संशोधनाचे प्रमुख लेखक डॉ निकोल रेसिन यांनी दिलेल्या माहितीनुसार, सर्वात मोठी चिंता ही आहे की तरुणांमध्ये ही लक्षणे कालांतराने वाढतात. 14 / 14 कॅनडाच्या कॅलगरी विद्यापीठाने केलेल्या अभ्यासानुसार असे दिसून आले आहे की कोरोनाच्या काळात मुले आणि किशोरवयीन मुलांमध्ये मानसिक समस्या वाढल्या आहेत. हा अभ्यास जगभरातील 29 वेगवेगळ्या संशोधनांकडून गोळा केलेल्या डेटावर आधारित आहे. ज्यात 80,879 जणांचा समावेश आहे. आणखी वाचा