Using the same mask again and Again? This is more dangerous than not wearing mask
सावधान! एकच मास्क परत परत वापरताय? हे तर मास्क न घालण्यापेक्षाही जास्त खतरनाक By ऑनलाइन लोकमत | Published: December 16, 2020 2:45 PM1 / 10केंद्र, राज्य सरकारे आणि महापालिका कोरोना महामारीमुळे मास्क न घालणाऱ्यांविरोधात दंडाची कारवाई करत आहेत. यामुळे बाहेर फिरताना मिळेल तो मास्क घेऊन अनेकजण दंड टाळत आहेत. 2 / 10एकच मास्क वारंवार वापरला जात आहे. हे करणे विनामास्क फिरण्यापेक्षा जास्त खतरनाक असल्याचे अभ्यासात समोर आले आहे.3 / 10वापरलेला मास्क पुन्हा वापरणे हे मास्क न घालण्यापेक्षा कमी सुरक्षित असू शकते असे मत संशोधकांनी मांडले आहे. 4 / 10अमेरिकेच्या मॅसॅच्युसेट्स विद्यापीठ आणि कॅलिफोर्नियाच्या बॅपटिस्ट विद्यापीठाच्या संशोधकाच्या टीमने मास्क प्रभावी आहेत की नाही यावर संशोधन केले आहे. 5 / 10संशोधनात तीन लेअर असलेल्या सर्जिकल मास्कची तपासणी करण्यात आली. यावेळी हे मास्क नवीन असताना छोट्या आकाराच्या तीन चतुर्थांश कणांना रोखण्यात यशस्वी ठरतात. 6 / 10तर एकापेक्षा जास्त वेळा वापरले जाणारे मास्क हे एक चतुर्थांश कणांना रोखण्यात यशस्वी ठरले आहेत. याचाच अर्थ वापरलेल्या मास्कनी कमी कोरोना व्हायरस रोखले आहेत. 7 / 10Physics of Fluids जर्नलमध्ये प्रकाशित झालेल्या या अभ्यासात संशोधकांचे म्हणणे आहे की, जेवढ्या अधिकवेळा ते मास्क वापरले जाते तेवढे ते खराब होत जाते. 8 / 10मास्क लावल्यानंतर व्यक्तीच्या चेहऱ्याच्या आसपासच्या हवेचे वाहणेही बदलते. मास्क घातल्यानंतर केवळ नाक आणि तोंडाकडेच नाही तर मास्कच्या संपूर्ण पृष्ठभागावर हवा वाहते. 9 / 10अभ्यासात सहभागी झालेले असोसिएट प्रोफेसर डॉ. जिनझिआंग यांनी सांगितले की, सामान्यता जुना किंवा नवीन मास्क हा विनामास्क घालण्यापेक्षा खूप सुरक्षित असतो. मात्र, अभ्यासावेळी जेव्हा हवेमध्ये असलेल्या मोठ्या कणांसाठी मास्क वापरला तर 2.5 माइक्रोमीटरपेक्षा कमी जाडीच्या कणांसाठी ही बाब चुकीची ठरते. 10 / 10जगभरातील सामान्य लोकांना तीन लेअरच्या मास्क वापरण्याचा सल्ला दिला जातो. काही एक्सपर्ट N95 मास्क घालण्याचा सल्ला देतात. मात्र, N95 हे मास्क महागडे असतात. तसेच ते सामान्यांना सहज उपलब्धही होत नाहीत. आणखी वाचा Subscribe to Notifications