शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

'या' देशानं जारी केली तब्बल 10 लाख रुपयांची नोट; पण एवढ्यात भारतामध्ये अर्धा लिटर पेट्रोलही येत नाही!

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 6, 2021 22:02 IST

1 / 15
दक्षिण अमेरिकेतील देश व्हेनेझुएलाने (venezuela) आर्थिक संकटाचा आणि तीव्र महागाईचा सामना करण्यासाठी तब्बल 10 लाख बोलिवरची (1 million bolivar) नवी नोट जारी केली आहे. यापूर्वी जगातील कुठल्याही देशाने एवढी मोठी चनली नोट जारी केलेली नाही.
2 / 15
व्हेनेझुएलातील सध्याच्या वाढत्या महागाईनुसार, 10 लाख बोलिवरची किंमत अर्धा अमेरिकन डॉलर (म्हणजे 36 रुपये) असेल. एवढ्या पैशांत भारतात अर्धालिटर पेट्रोलही येत नाही.
3 / 15
कधीकाळी तेलाच्या बळावर संपन्नतेचे जीवन जगणाऱ्या व्हेनेझुएलामध्ये लोकांवर आता उपासमारीची वेळ आली आहे.
4 / 15
येथे रुपयाचे एवढे अवमूल्यन झाले आहे, की लोक बॅग अथवा पोत्यात नोटा नेतात आणि एखाद्या पॉलिथीममध्ये घरच्यासाठी दैनंदीन सामान आणतात.
5 / 15
पुढच्या आठवड्यात 2 लाख आणि 5 लाखांच्या नोटा जारी होणार - व्हेनेझुएलाच्या केंद्रीय बँकेने म्हटले आहे, की देशाची अर्थव्यवस्था पाहता, एवढी मोठी चलनी नोट जारी करावी लागली आहे. पुढील आठवड्यात दोन लाख बोलिवर आणि पाच लाख बोलिवरच्या नोटादेखील जारी करण्यात येणार आहेत.
6 / 15
सध्या व्हेनेझुएलामध्ये 10 हजार, 20 हजार आणि 50 हजार बोलिवरच्या नोटा चलनात आहेत.
7 / 15
व्हेनेझुएलामध्ये भारताच्या 1 रुपयाची किंमत 25584.66 बोलिवर एवढी आहे.
8 / 15
गेल्या वर्षीपासूनच सुरू होती नोटा छापण्याची चर्चा - गेल्यावर्षी ब्लुमबर्गच्या अहवालात सांगण्यात आले होते, की व्हेनेझुएला सरकार लवकरच 10 लाख बोलिवर (तेथील एक रुपया)ची नोट छापणार आहे. यासाठी इटलीतील एका फर्मकडून 71 टन सिक्योरिटी पेपरची आयातही करण्यात आली आहे.
9 / 15
इटलीतील कंपनी बॅन कॅपिटलकडे या फर्मचे अधिकार आहेत. ही कंपनी जगातील अनेक देशांना सिक्योरिटी पेपरची निर्यात करते. कस्टमच्या रिपोर्टमध्येही सिक्योरिटी पेपर मागविल्याचा खुलासा झाला आहे.
10 / 15
या 10 लाख बोलिवरचे मूल्य केवळ अर्धा यूएस डॉलर आहे. यात केवळ दोन किलो बटाटे अथवा अर्धा किलो तांदूळच विकत घेतले जाऊ शखतात.
11 / 15
खरेतर येथील नागरिकांच्या सुविधेसाठी व्हेनेझुएला सरकार एवढी मोठी नोट चलनात आणत आहे. कारण सध्या, काहीही आणायचे असेल, तर येथील लोकांना बॅग अथवा पोत्यात पेसे भरून न्यावे लागतात. यामुळे त्यांना प्रचंड त्रास होत आहे.
12 / 15
यावर्षी कोरोना महामारीने आणि तेलातील घटलेल्या उत्पन्नामुळे व्हेनेझुएलाची अर्थव्यवस्था 20 टक्क्यांपर्यंत घसरू शकते. चलन स्थिर करण्यासाठी सरकारने केलेले विविध प्रयत्नही अयशस्वी ठरले आहेत.
13 / 15
देश सोडतायत लोक - एका अहवालानुसार, 2013 नंततर जवळपास 30 लाख लोकांनी आपला देश सोडून शेजारील ब्राजील, कंबोडिया, इक्वाडोर आणि पेरू देशांचा आश्रय घेतला आहे.
14 / 15
परिस्थिती एवढी बिकट झाली आहे, की या देशांनी व्हेनेझुएलाच्या सीमेवर आपले सैन्य तैनात केले आहे.
15 / 15
2017पासून व्हेनेझुएलात महागाई मोठ्या प्रमाणात वाढताना दिसली आहे. परिणामी लोकांना अत्यावश्यक वस्तूंची खरेदी करणेही अशक्य होत आहे.
टॅग्स :InflationमहागाईMONEYपैसाMigrationस्थलांतरणMarketबाजार