शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

'हा' देश आणतोय तब्बल एक लाख रुपयांची नोट; पण खरेदी करता येतील फक्त दोन किलो बटाटे...!

By श्रीकृष्ण अंकुश | Published: October 07, 2020 10:30 PM

1 / 10
व्हेनेझुएला हा एके काळी अत्यंत श्रीमंत देश होता. मात्र, आज या देशाच्या चलनाची किंमत पार रद्दी सारखी झाली आहे.
2 / 10
या देशात महागाईने अक्षरशः कळस गाठला आहे. येथे महागाई एवढी वाढली आहे, की साधा एक कप चहा अथवा कॉफी प्यायची असली तरी, लोक बॅग भरून नोटा सोबत नेत आहेत.
3 / 10
ही समस्या दूर करण्यासाठी आता व्हेनेझुएला सरकार पुन्हा एकदा मोठी नोट व्यवहारात आणत आहे. ब्लूमबर्गने दिलेल्या वृत्तानुसार, कॅशच्या कमतरतेमुळे व्हेनेझुएला बँकनोट पेपरदेखील बाहेरूनच मागवत आहे.
4 / 10
व्हेनेझुएलाने एका इटालियन कंपनीकडून आतापर्यंत 71 टन सिक्युरिटी पेपर विकत घेतला आहे. व्हेनेझुएलाची केंद्रीय बँक आता 1,00000 बोलिवरची नोट जारी करणार आहे.
5 / 10
ही नोट आतापर्यंतची सर्वाधिक मूल्य असलेली नोट असेल. मात्र, या एक लाख बोलिवरच्या नोटेची किंमत केवळ 0.23 डॉलर एढीच असेल. अर्थात यात केवळ एक अथवा दोन किलो बटाटेच विकत घेता येऊ शकतात.
6 / 10
एका अंदाजानुसार, गत वर्षीचा व्हेनेझुएलाचा महागाई दर 2400 टक्के होता. याअगोदरही व्हेनेझुएला सरकारने 50 हजार बोलिवरची नोट छापली होती. आता व्हेनेझुएला यापेक्षाही मोठी नोट आणण्याच्या तयारीत आहे.
7 / 10
गेल्या सात वर्षापासून व्हेनेझुएला आर्थिक मंदीचा सामना करत आहे.
8 / 10
यावर्षी कोरोना महामारीने आणि तेलातील घटलेल्या उत्पन्नामुळे व्हेनेझुएलाची अर्थव्यवस्था 20 टक्क्यांपर्यंत घसरू शकते. चलन स्थिर करण्यासाठी सरकारने केलेले विविध प्रयत्नही अयशस्वी ठरले आहेत.
9 / 10
व्हेनेझुएलामध्ये बरेच लोक आता अमेरिकन डॉलरचा व्यवहारात वापर करत आहेत.
10 / 10
2017पासून व्हेनेझुएलात महागाई मोठ्या प्रमाणात वाढताना दिसली आहे. परिणामी लोकांना अत्यावश्यक वस्तूंची खरेदी करणेही अशक्य होत आहे.
टॅग्स :MONEYपैसाEconomyअर्थव्यवस्थाCorruptionभ्रष्टाचार