Vests gifted to South Korean president were Modi Jackets
दक्षिण कोरियाच्या राष्ट्रपतींना मोदी जॅकेटची भुरळ By ऑनलाइन लोकमत | Published: November 03, 2018 10:01 PM1 / 6भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदीं यांची वेशभूषा आणि त्यांची स्टाइल नेहमीच चर्चेचा विषय ठरत असतो. विरोधकांकडून त्यासाठी त्यांच्यावर टीकाही होते. मात्र आता दक्षिण कोरियाचे राष्ट्रपतीही पंतप्रधान नरेंद्र मोदी वापरत असलेल्या मोदी जॅकेटचे फॅन बनले आहेत. 2 / 6दक्षिण कोरियाचे राष्ट्रपती मून जे इन यांना मोदी जॅकेट एवढी आवडली आहेत की ते कार्यालयामध्ये सुद्धा मोदी जॅकेट परिधान करून जात आहेत. 3 / 6दक्षिण कोरियाचे राष्ट्रपती मून जे इन यांनी स्वत: ट्विटरवरून ही माहिती दिली आहे. तसेच मोदी जॅकेट परिधान केलेले काही फोटोसुद्धा त्यांनी ट्विटरवरून शेअर केले आहेत.4 / 6पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्यासाठी हे जॅकेट पाठवले असून, भारतीय वेशभूषेतील आधुनिक पेहराव असलेले हे जॅकेट आता दक्षिण कोरियामध्येही सहज मिळतील, असे मून जे इन यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे.5 / 6दक्षिण कोरियाचे राष्ट्रपती पुढच्या काही दिवसांमध्ये भारतभेटीवर येणार आहेत. 6 / 6आपल्या भारतभेटीसंदर्भात माहिती देताना मून जे इन यांची सांगितले की, आपण लवकच सपत्निक भारत भेटीवर येणार असून, यावेळी दिवाळी भारतात साजरी करणार आहोत. असे त्यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे. आणखी वाचा Subscribe to Notifications