US Capitol: अमेरिकेत हिंसाचारामध्ये ४ नागरिकांचा मृत्यू, संचारबंदी लागू; नेमकं काय झालं जाणून घ्या!
By मुकेश चव्हाण | Updated: January 7, 2021 15:01 IST
1 / 8अमेरिकेत अध्यक्षपदाच्या निवडणूक निकालानंतरही राजकीय तणाव सुरु आहे. निवडणूक निकालात फेरफार झाल्याचा आरोप करत अमेरिकेचे मावळते राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून दबाव टाकण्याचा प्रयत्न करत आहे. याचपार्श्वभूमीवर निवडणूक निकालांबाबत अमेरिकेच्या संसदेची बैठक बोलावण्यात आली होती. 2 / 8या बैठकीत इलेक्टोरल कॉलेजबाबत चर्चा सुरु होती. बैठकीत जो बायडन यांच्या विजयाची घोषणा केली जाणार होती. परंतु त्याचवेळी ट्रम्प समर्थक कॅपिटल बिल्डिंगमध्ये घुसले, परिणामी संसदेचं कामकाज थांबवावं लागलं. ट्रम्प समर्थकांनी कॅपिटल बिल्डिंगबाहेर गोंधळही घातला. या घटनेवर देशभरात टीका केली जात आहे.3 / 8कॅपिटल बिल्डिंगबाहेर ट्रम्प समर्थकांची पोलिसांसोबत झटापटही झाली. या हिंसाचारात ४ नागरिकांचा मृत्यू झाला असून काही जण जखमी झाल्याचं समजतं. वॉशिंग्टन डीसी पोलीस प्रमुखांनी या वृत्ताला दुजोरा मिळाला आहे. 4 / 8डोनाल्ड ट्रम्प यांनी आपल्या समर्थकांना शांत राहण्याचं आवाहन केलं आहे. शांततेत आंदोलन करण्याचा आवाहन करताना ट्रम्प म्हणाले की, आंदोलनात हिंसाचार होऊ नये, असं डोनाल्ड ट्रम्प यांनी सांगितले. 5 / 8तर दुसरीकडे निवडून आलेले अध्यक्ष जो बायडन म्हणाले की, मी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना आवाहन करतो की, त्यांनी आपली शपथ पूर्ण करुन संविधानाचं संरक्षण करावं आणि हा वेढा संपवण्याची मागणी करावी. तसेच कॅपिटल बिल्डिंगवर झालेला गोंधळ हा देशद्रोह असल्याचं जो बायडन म्हणाले. 'मी स्पष्ट करतो की, कॅपिटल बिल्डिंगबाहेर जो गोंधळ झाला आम्ही तसे नाहीत. कायदा न पाळणाऱ्यांचीही संख्या आहे, असं बायडन यांनी सांगितले. 6 / 8दरम्यान, नियमांचं उल्लंघन केल्याप्रकरणी ट्विटरने डोनाल्ड ट्रम्प यांचे अकाउंट १२ तासांसाठी, तर फेसबुकने २४ तासांसाठी लॉक केले आहे. तसेच, नागरी अखंडत्वाबद्दल नियम मोडणारे तीन ट्विट्स डिलीट न केल्यास डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर कायमस्वरुपी बंदी आणण्याचा इशारा सुद्धा ट्विटरने दिला. 7 / 8ट्विटरनंतर अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा व्हिडिओ फेसबुकने डिलीट केला. अमेरिकेच्या कॅपिटलमध्ये झालेल्या हिंसाचाराच्या वेळी ट्रम्प यांनी आपल्या समर्थकांना संबोधित केले होते. 'आम्ही ट्रम्प यांचा व्हिडिओ हटविला आहे, कारण ट्रम्प यांचा व्हिडिओ सुरु असलेल्या हिंसाचार कमी करण्याऐवजी प्रोत्साहन देत होता,' असे फेसबुकचे व्हाईस प्रेसिडेंट ऑफ इंटीग्रिटी गाय रोसेन यांनी म्हटले आहे.8 / 8२०२० मध्ये झालेल्या अमेरिकेच्या अध्यक्षीय निवडणुकीच्या निकालावर अद्याप राजकीय पेच सुरूच आहेत. अमेरिकेचे मावळते राष्ट्राध्यक्ष यांच्याकडून निवडणुकीत गोंधळ उडाल्याचा आरोप करत दबाव आणला जात होता. यातच आता डोनाल्ड ट्रम्प समर्थकांनी व्हाईट हाऊस आणि कॅपिटल बिल्डिंगबाहेर गोंधळ घातला. त्यामुळे वॉशिंग्टन डीसीमध्ये कर्फ्यू लागू करण्यात आला आहे.