शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

'या' देशात मुलींना सैन्यात भरती होण्यासाठी द्यावी लागत होती कौमार्य चाचणी

By ऑनलाइन लोकमत | Published: August 13, 2021 10:03 PM

1 / 10
इंडोनेशियन (Indonesia) सैन्याने महिला कॅडेट्स (Female cadets) साठी कौमार्य चाचण्या (Virginity tests) रद्द करण्याची घोषणा केली आहे. १९६५ पासून इंडोनेशियन लष्कर (Indonesia Army), नौदल (Indonesia Navy) आणि हवाई दलात भरती झालेल्या महिलांच्या कौमार्य चाचण्या (Virginity tests) केल्या जात होत्या.
2 / 10
पण, आता ही चाचणी करण्याचा नियम पूर्णपणे रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. इंडोनेशियाची मानवाधिकार संघटना आणि फेमिनिस्ट्स ग्रुप (Feminists groups) यांनी या निर्णयाचे स्वागत केले आहे.
3 / 10
आर्मी जनरल आणि चीफ ऑफ स्टाफ अँडिका पेरकासा (Andika Perkasa) ने पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी कौमार्य चाचण्या (Virginity tests) आता रद्द करण्यात आल्या आहेत. निवड प्रक्रिया पुरुष आणि महिलांसाठी समान असाली पाहिजे, असे आमचे मत आहे, असे अँडिका पेरकासाने म्हटले आहे.
4 / 10
याच विषयावर बोलताना इंडोनेशियन लष्कराच्या प्रवक्त्याने सांगितले की, इंडोनेशियन लष्करात सामील होणाऱ्या कोणत्याही महिलेचे हायमन तुटले होते किंवा काही प्रमाणात तुटले होते, आता यामुळे काही फरक पडत नाही, कारण तो पहिल्या चाचणीचा भाग होता पण आता असे काही नाही.
5 / 10
विशेष म्हणजे या प्रक्रियेला टू फिंगर टेस्ट म्हणून ओळखली जाते. चाचणीत अपयशी ठरलेली कोणतीही महिला इंडोनेशियन सैन्यात भरतीसाठी पात्र मानली जात नव्हती.
6 / 10
या प्रक्रियेद्वारे महिलांच्या नैतिकतेची चाचणी करण्यात येते, असे इंडोनेशियन सैन्यात आधी मानले जात होते. मात्र, गेल्या अनेक वर्षांपासून अनेक इंडोनेशियन डॉक्टर कौमार्य चाचण्यांना वैज्ञानिक आधार नसल्याचे सांगत आहेत.
7 / 10
या देशातील मानवी हक्क संघटना आणि फेमिनिस्ट्स ग्रुप्स अनेक वर्षांपासून या चाचण्यांविरोधात आंदोलन करत आहेत. या चाचण्या यापुढे सैन्यासह नौदल आणि हवाई दलात ही चाचणी घेण्यात येणार नाही.
8 / 10
रायटर्सशी बोलताना नॅशनल कमिशन ऑन व्हायोलन्स अगेन्स्ट वुमनचे प्रमुख अँडी येन्ट्रियानी म्हणाले की, अशा चाचण्यांची कधीच गरज नाही. २०१८ मध्ये जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) या चाचण्या रद्द करण्याचे आवाहन केले. अशा चाचण्या महिलांच्या हक्कांचे उल्लंघन करतात, असे ते म्हणाले होते.
9 / 10
२०१४ मध्ये ह्यूमन राइट्स वॉचने आपल्या चौकशीनंतर इंडोनेशियाच्या सुरक्षा दलातील महिलांच्या कौमार्य चाचण्या घेण्यात येत असल्याचे उघड केले होते. या तपासणीतच १९६५ पासून हजारो महिलांची ही चाचणी झाली आहे.
10 / 10
संयुक्त राष्ट्रसंघाच्या एका रिपोर्टनुसार, बहुतेक देशांमध्ये कौमार्य चाचण्यांसारख्या अवैज्ञानिक चाचण्या केल्या जात नाहीत, तर अफगाणिस्तान, इजिप्त आणि इंडोनेशिया सारख्या सुमारे २० देशांमध्ये अशा चाचण्या अजूनही अनेक कारणांमुळे केल्या जात आहेत आणि या देशांमधील मानवी हक्क संघटना या चाचण्या रद्द करण्याबाबत सतत बोलत आहेत.
टॅग्स :Indonesiaइंडोनेशिया