शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

लाखो भारतीयांना व्लादिमीर पुतिन मोठं गिफ्ट देणार; रशिया लवकरच घोषणा करणार

By ऑनलाइन लोकमत | Published: September 15, 2022 1:17 PM

1 / 8
रशिया भारतीय पर्यटकांसाठी व्हिसा-फ्री प्रवेश व्यवस्था सुरू करण्याचा विचार करत आहे. रशिया भारतीय व्यापारी आणि पर्यटकांसाठी व्हिसा फ्री योजना सुरू करण्याच्या योजनेवर काम करत आहे ज्यावर लवकरच निर्णय घेतला जाईल असं मॉस्को सिटी टुरिझम कमिटीचे डेप्युटी चेअरमन अलिना अरुतुनोव्हा यांनी मुंबईतील एका कार्यक्रमात सांगितले.
2 / 8
सध्या रशिया लवकरच भारतीयांसाठी ई-व्हिसा सुरू करणार आहे. अरुतुनोव्हा यांनी सांगितले की, रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्हिसा फ्री योजनेच्या पुढाकाराचे समर्थन करतात. इराणसाठी व्हिसामुक्त योजनेला यापूर्वीच हिरवा कंदील देण्यात आला असून लवकरच ही योजना भारतासाठीही सुरू होण्याची शक्यता आहे.
3 / 8
दरवर्षी तुर्की, जर्मनी आणि भारतातून मोठ्या संख्येने पर्यटक रशियात येतात. २०२० मध्ये भारतासह ५२ देशांसाठी इलेक्ट्रॉनिक व्हिसा सुरू करण्याच्या प्रस्तावाला मान्यता देण्यात आली होती. परंतु कोरोनामुळे ही योजना अद्याप लागू होऊ शकली नाही. परंतु लवकरच आता हे सुरु करण्यात येईल. ई-व्हिसामुळे परदेशी पर्यटकांसाठी प्रक्रिया सुलभ होईल असंही रशियानं सांगितले.
4 / 8
जगभरातील अनिश्चिततेच्या वातावरणात, पर्यटन हे लोक आणि संस्कृती यांच्यातील दुवा म्हणून काम करते. या वर्षाच्या पहिल्या सहा महिन्यांत १३,३०० भारतीय पर्यटकांनी रशियाला भेट दिली. २०२३ च्या अखेरीस हा आकडा महामारीच्या अगोदरच्या संख्येएवढा असेल असा विश्वास अरुतुनोव्हा यांनी व्यक्त केला.
5 / 8
२०१६ ते २०१९ या कालावधीत भारतातून रशियाकडे येणाऱ्या पर्यटकांची संख्या ६१ हजारांहून एक लाखांवर गेली. विशेष म्हणजे २०२१ मध्ये रशियाला आलेल्या भारतीय प्रवाशांपैकी ४८ टक्के प्रवासी वर्षातून दोनदा तिथे प्रवास करत होते. एका ट्रॅव्हल एजंटने सांगितले की २०२१ मध्ये, रशिया अशा काही देशांपैकी एक होता ज्यांनी तेथे येणाऱ्या लोकांसाठी क्वारंटाईन ठेवण्याचा नियम लागू केला नव्हता.
6 / 8
या देशांमध्ये भारतीयांना व्हिसा मोफत प्रवेश - नेपाळ, मकाऊ, फिजी, मार्शल बेटे, जॉर्डन, ओमान, कतार, अल्बेनिया, सर्बिया, बार्बाडोस, सामोआ, पलाऊ बेट, मायक्रोनेशिया, भूतान, ब्रिटिश व्हर्जिन बेटे, डोमिनिका, ग्रेनाडा, हैती, जमैका, मोन्सेरात, सेंट किट्स आणि नेव्हिस , सेंट व्हिन्सेंट आणि ग्रेनेडाइन्स, त्रिनिदाद आणि टोबॅगो,
7 / 8
कंबोडिया इंडोनेशिया, सेंट लुसिया, लाओस, मकाओ, थायलंड, तिमोर-लेस्टे, बोलिव्हिया, गॅबॉन, गिनी-बिसाऊ, कुक बेटे, मायक्रोनेशिया, युगांडा, इथिओपिया, झिम्बाब्वे, केप वर्डे बेट, कोमोरो बेट, अल साल्वाडोर, बोत्सवाना, बुरुंडी, सेशेल्स, सिएरा लिओन, सोमालिया, टांझानिया यांसारख्या सुमारे ६० देशांमध्ये व्हिसाशिवाय प्रवेश करता येतो.
8 / 8
हे देश व्हिसा ऑन अरायव्हलची सुविधा देतात - अनेक देश भारतीयांना व्हिसा ऑन अरायव्हलची सुविधा देखील देतात, म्हणजे तुम्ही ज्या देशात जात आहात तो देश तुम्हाला विमानतळावर लगेच व्हिसा देईल. आपला शेजारी देश श्रीलंका भारतीय पर्यटकांना व्हिसा ऑन अरायव्हल सुविधा देतो. याशिवाय मॉरिशस, मालदीव, हाँगकाँग, मलेशिया, थायलंड आणि इंडोनेशिया देखील भारतातून येणाऱ्या लोकांना व्हिसा ऑन अरायव्हल सुविधा देतात.
टॅग्स :russiaरशियाIndiaभारतtourismपर्यटन