Warning of recession in America! India may lose billions, US Has 29000 billion dollar loan
मंदीचा इशारा! दुसऱ्यांना पैसे वाटणारी अमेरिकाच कर्जाच्या विळख्यात; भारताला होणार अब्जावधींचे नुकसान By ऑनलाइन लोकमत | Published: October 05, 2021 7:34 PM1 / 8जगभरात सुपर पावर म्हणून मिरवत असलेल्या अमेरिकेची (United states of America) हालत येत्या काळात खूपच बिकट होणार आहे. अमेरिकेमध्ये मोठी मंदी पसरण्याचा इशारा देण्यात आला आहे. ही जगासाठी चिंतेची बाब ठरण्याची शक्यता आहे. (US economic recovery would reverse into recession if debt limit not raised)2 / 8अमेरिकेच्या ट्रेझरी सेक्रेटरी जेनेट लुईस येलेन (Janet Louise Yellen) यांनी अमेरिकेवर प्रचंड कर्जाचे ओझे असल्याचे म्हटले आहे. तसेच जर अमेरिका हे कर्ज फेडण्यास असफल ठरला किंवा डिफॉल्टर ठरला तर कोरोनानंतरच्या मंदीनंतर आणखी एक मोठी मंदीची लाट येऊ शकते, असा इशारा दिला आहे. 3 / 8ही पहिली वेळ नाहीय, यापूर्वी देखील येलेन यांनी अमेरिकेला कर्जावरून इशारे दिले आहेत. Squawk Box ला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी असे म्हटले होते. जर अमेरिकन काँग्रेस कर्जाकडे योग्य लक्ष देत नसेल तर त्यामुळे अमेरिकेवर मंदीचे संकट कोसळू शकते, असे त्या म्हणाल्या होत्या. 4 / 8जगातील सर्वात मोठी अर्थव्यवस्था असलेल्या अमेरिकेवर दोन दशकांत कर्जाचे ओझे प्रचंड प्रमाणावर वाढले आहे. अमेरिकेवर एकूण 29 हजार अब्ज डॉलरचे कर्ज आहे. अमेरिकेचे खासदार एलेक्स मुनी यांनी सांगितले की, आमचे कर्ज 29 हजार अब्ज डॉलरवर जाण्याच्या उंबरठ्यावर आहे. याचा अर्थ प्रत्येक व्यक्तीवर कर्जाचा भार वाढत चालला आहे. 5 / 8अमेरिकेला सर्वाधिक कर्ज हे जपान आणि चीनने दिलेले आहे. ते सर्वात मोठे कर्जदाते आहेत. परंतू ते खरेतर आमचे मित्र नाहीएत. कर्जाच्या बाबतीत सूचना या भ्रामक आहेत, असे ते म्हणाले. 6 / 8धक्कादायक बाब म्हणजे भारताचेही अमेरिकेवर 216 अब्ज डॉलरचे कर्ज आहे. चीनचे अमेरिकेवर 1000 अब्ज डॉलरचे कर्ज आहे. तर जपानचे देखील 1000 अब्ज डॉलर एवढे कर्ज अमेरिका देणे आहे. याचबरोबर ब्राझीलने देखील अमेरिकेला 258 अब्ज डॉलर दिले आहेत. 7 / 82000 च्या सुरुवातीला अमेरिकेवर 5600 अब्ज डॉलरचे कर्ज होते. ओबामा सरकारच्या काळात ते दुप्पट झाले. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बायडेन यांनी जानेवारीमध्ये 1900 अब्ज डॉलरच्या कोरोना दिलासा पॅकेजची घोषणा केली होती. महामारीमुळे आलेल्या आर्थिक संकटावर उपाय करण्यात आले आहेत. 8 / 8मूनी आणि विरोधकांनी या पॅकेजला विरोध केला होता. ओबामा यांच्या आठ वर्षांत आपण कर्जाचे ओझे दुप्पट केले आहे. आज आपण आणखी ते वाढवत आहोत. कर्ज आणि जीडीपीचा दर आटोक्याच्या बाहेर गेला आहे. आणखी वाचा Subscribe to Notifications