शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

खूशखबर! अखेर मंगळ ग्रहावर पाणी सापडलं, जमिनीखाली दडली आहेत तीन सरोवर

By अमित इंगोले | Published: September 29, 2020 10:49 AM

1 / 10
नासाच्या वैज्ञानिकांनी मंगळ ग्रहावरील पाण्याचा स्त्रोत शोधून काढला आहे. वैज्ञानिकांना मंगळ ग्रहाच्या जमिनीखाली तीन तलाव सापडले आहेत. याआधी दोन वर्षांपूर्वीही मंगळ ग्रहावरील दक्षिण ध्रुवावर एक खाऱ्या पाण्याचं सरोवर आढळून आलं होतं. हा सरोवर बर्फाखाली दबलेला आहे. म्हणजे जर या पाण्याचा उपयोग केला गेला तर भविष्यात मंगळ ग्रहावर जाऊन राहता येऊ शकतं.
2 / 10
यूरोपियन स्पेस एजन्सी स्पेसक्राफ्ट मार्स एक्सप्रेसने २०१८ मध्ये ज्या जागेवर बर्फाखालील खाऱ्या पाण्याचं सरोवर शोधलं होतं. याचेच ठोस पुरावे मिळवण्यासाठी २०१२ ते २०१५ पर्यंत मार्स एक्सप्रेस सॅटेलाइट २९ वेळा या परिसरातून गेलं. त्याचे फोटो काढले. त्या परिसराच्या आजूबाजूला तीन आणखी सरोवर आढळून आले.
3 / 10
मंगळ ग्रहाच्या पृष्ठभागावर पाणी तरल अवस्थेत आढळून आलंय. सायन्स मॅगझिन नेचर एस्ट्रोनॉमीमध्ये हा रिपोर्ट प्रकाशित झाला आहे. २०१८ मध्ये शोधलेलं सरोवर मंगळ ग्रहाच्या दक्षिण ध्रुवावर स्थित आहे. हा सरोवर बर्फाने झाकला गेला आहे. हे सरोवर साधारण २० किलोमीटर रूंद आहे. हा मंगळ ग्रहावर साडलेला पाण्याचा आतापर्यंतचा सर्वात मोठा स्त्रोत आहे.
4 / 10
रोम यूनिव्हर्सिटीच्या एस्ट्रोसायंटिस्ट एलना पेटीनेली यांनी सांगितले की, आम्ही दोन वर्षांपूर्वी शोधलेलं सरोवराच्या आजूबाजूलाच तीन आणखी सरोवर शोधले आहेत. मंगळ ग्रहावर पाण्याचा स्त्रोत सापडणं फार दुर्मीळ बाब आहे.
5 / 10
मंगळ ग्रह हा कोरडा आणि दुष्काळी नाही. काही परिस्थितींमध्ये पाणी तरल अवस्थेत मंगळ ग्रहावर आढळून येतं. वैज्ञानिकांचं असं मत आहे की, कधीकाळी या लाल ग्रहावर भरपूर पाणी वाहत होतं. तीन अब्ज वर्षाआधी जलवायुत आलेल्या बदलांमुळे मंगळ ग्रहावर अनेक बदल झालेत.
6 / 10
ऑस्ट्रेलियातील स्विनबर्न विश्वविद्यालयातील सहायक प्राध्यापक एलन डफी यांनी याला मोठं यश मानलं आहे. तसेच ते म्हणाले की, याने जीवनासंबंधी अनुकूल परिस्थितींची शक्यता वाढते. याआधी नासाने घोषणा केली होती की, मंगळ ग्रहावर २०१२ मध्ये उतरलेल्या रोबोटला तीन अब्ज वर्ष जुने कार्बनिक अणु मिळाले आहेत. यावरून हे दिसून येतं की, इथे आधी जीवन होतं.
7 / 10
अमेरिकन रोबोट्स रोवर क्यूरिओसिटी आणि ESA च्या सॅटेलाइट्समुळे हे जाणून घेणं सोपं झालं की, मंगळ ग्रहाच्या कोणत्या जागेवर ओलावा आहे. कोणत्या जागेवर कोरडी जमीन आहे. रोवर्सने हे शोधून काढलं की, येथील हवेत अधिक आर्दता आहे.
8 / 10

9 / 10

10 / 10

टॅग्स :NASAनासाMarsमंगळ ग्रहWaterपाणी