What are the side effects of Covishield vaccine? The truth came out in the Lancet study
Covishield लसीचे काय आहेत साईड इफेक्ट? लँसेटच्या अभ्यासात समोर आले सत्य By ऑनलाइन लोकमत | Published: April 29, 2021 9:19 AM1 / 10Covishield Vaccine side effects: देशात १ मे पासून १८ वर्षांवरील लोकांसाठी कोरोना लसीकरण मोहिम सुरु होत आहे. तिसऱ्या टप्प्यातील या लसीकरणासाठी लसच उपलब्ध नाहीय ही त्याची दुसरी बाजू असताना जवळपास १ कोटीहून अधिक लोकांनी या लसीकरणासाठी नोंदणी केली आहे. (One in four people experience mild, short-lived systemic side effects after receiving either the Covid-19 preventive by Pfizer or AstraZeneca vaccine -- known as Covishield in India)2 / 10भारतात सध्या सीरम इन्स्टिट्यूट बनवत असलेले कोव्हिशिल्ड (Covishield) आणि भारत बायोटेकचे कोव्हॅक्सिन (covaxin) याची लस दिली जात आहे. यापैकी सीरमच्या लसीला मोठी मागणी आहे. 3 / 10सायन्स जर्नल लँसेटने केलेल्या एका पाहणीत लस टोचल्यानंतर प्रत्येक चार जणांमागे एकाला लसीच्या साईडइफेक्टचा सामना करावा लागतोय. हे साईडइफेक्ट एक किंवा दोन दिवसच दिसून येत असल्याचे आढळून आले आहे. 4 / 10सुरुवातीला कोरोना लस घेतल्यानंतर काही मृत्यू झाल्याने भीती निर्माण झाली होती. मात्र, लसीकरण झालेल्यांच्या संख्येत हे प्रमाण नगण्य असल्याने ही भीती कमी होऊ लागली होती. (What are the side effects of Covishield? science journal lanset study expose truth)5 / 10अभ्यासानुसार ऑक्सफर्ड एस्ट्राझिनेकाची लस ( AstraZeneca vaccine) किंवा फायझरची (Pfizer) लस असो, दोन्ही लसीचे साईडइफेक्ट दिसून आले आहेत. ऑक्सफर्डची लस ही पुण्यातील सीरम इन्स्टिट्यूट बनवत आहे. तिला कोविशिल्ड (Covishield) असे नाव देण्यात आले आहे. 6 / 10लँसेटने लसीचे साईडइफेक्ट जाणून घेण्यासाठी लंडनच्या किंग्स कॉलेजमध्ये रिसर्च केला होता. यामध्ये दोन्ही लसींचे साईडइफेक्ट आढळले. ८ डिसेंबर ते १० मार्च या कालावधीत 6,27,383 लोकांनी सहभाग घेतला होता. 7 / 10डोकेदुखी, लस टोचलेल्या ठिकाणी दुखणे, थकवा ही लक्षणे खूप सामान्य आहेत. मात्र हे साईडइफेक्ट लस टोचल्यानंतरच्या २४ तासांत मोठ्या प्रमाणावर जाणवतात तसेच पुढील दोन दिवस सुरु राहतात. काही लोकांना थरथरणे, डायरिया, ताप, गुडघेदुखी असे दुष्परिणामही जाणवले. (Systemic effects included headache, fatigue, chills and shiver, diarrhoea, fever, arthralgia, myalgia, and nausea.)8 / 10किंग्स कॉलेजचे प्राध्यपक आणि संशोधक टिम स्पेक्टर यांनी सांगितले की, लस टोचल्यानंतर ५० वर्षांपेक्षा अधिक वयाच्या लोकांमध्ये खूप कमी साईड इफेक्ट आढळले. या लोकांनाच कोरोनाचा जास्त धोका आहे. मात्र, ५० वर्षांपेक्षा कमी वयाच्या लोकांमध्ये आणि महिलांमध्ये खूप जास्त साईड इफेक्ट पहायला मिळाले. 9 / 10कोव्हिशिल्डचा पहिला डोस दिल्यावर १२ ते २१ दिवसांच्या काळात कोरोनाच्या इन्फेक्शन रेटमध्ये ३९% घट झाली. याच काळात फायझरची लस घेतलेल्यामध्ये इन्फेक्शन रेट ५८% घसरला. २१ दिवस उलटल्यानंतर कोविशिल्ड ६० टक्के आणि फायझर ६९ टक्के इन्फेक्शन रेट कमी आला. 10 / 10टिम स्पेक्टर यांनी सांगितले की, आम्ही केलेल्या अभ्यासानुसार लस लावल्यानंतर सामान्य साईड इफेक्ट दिसले आहेत. परंतू कोरोनाचा धोका मोठ्या प्रमाणावर कमी झाला आहे. यामुळे लोकांनी लसीला घाबरण्याचे कारण नाही. आणखी वाचा Subscribe to Notifications