२०२४ मध्ये जगभरात काय घडणार? नास्रेदेमसने शेकडो वर्षांपूर्वी केलीय धक्कादायक भविष्यवाणी
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 4, 2023 16:06 IST
1 / 6प्राख्यात भविष्यवेत्ता नास्रेदेमस याने हिटलरच्या उदयापासून ते अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जॉन एफ केनेडी यांच्या हत्येपर्यंतच्या शेकडो भविष्यवाण्या अचूकरीत्या केलेल्या आहेत. नास्रेदेमस यांनी कवितांच्या माध्यमातून भविष्यवाण्या केल्या आहेत. 2 / 6आता २०२४ हे वर्ष सुरू होण्यास अवघे काही महिने राहिले आहेत. अशा परिस्थितीत येणारं नवं वर्ष त्यांच्यासाठी कसं राहिल हे जाणून घेण्यासाठी सर्वजण उत्सुक आहेत. नास्रेदेमस यांनी शेकडो वर्षांपूर्वी २०२४ साठी भविष्यवाणी केली होती. त्यांचं म्हणणं सत्य सिद्ध झाल्यास येणारं वर्ष जगासाठी तितकसं चांगलं ठरणार नाही. 3 / 6२०२४ या वर्षासाठी नास्त्रेदेमस यांची भविष्यवाणी जगाची चिंता वाढवणारी आहे. त्यांच्या भविष्यवाण्यांनुसार अमेरिकेमध्ये राष्ट्राध्यक्ष निवडणुकीमध्ये अस्थिरता निर्माण होऊ शकते. तसेच इथे गृहयुद्धासारखी परिस्थिती निर्माण होऊ शकते.4 / 6नास्त्रेदेमस यांच्या भविष्यानुसार २०२४ मध्ये अमेरिका आणि चीन या जगातील दोन मोठ्या देशांमध्ये युद्धाला तोंड फुटू शकते. त्यांनी आपल्या कवितांमध्ये लिहिले आहे की, लाल शत्रू भयाने पिवळा होईल. महान सागरामध्ये भयाचं वातावरण असेल. अनेक लोक लाल शत्रू म्हणजे कम्युनिस्ट चीन असं मानतात.5 / 6नास्रेदेमस यांनी त्यांच्या पुस्तकामधून आणखी एक गंभीर इशारा दिला आहे. त्यांनी आपल्या पुस्तकामध्ये लिहिलं आहे की, सन २०२४ मध्ये न्यूक्लिअर स्फोट होईल. त्यामुळे हवामानावर मोठा परिणाम होईल. 6 / 6नास्रेदेमसच्या मते सन २०२४ मध्ये मोठ्या प्रमाणावर वातावरणात बदल होतील. तसेच पृथ्वी आधीच्या तुलनेत अधिक गरम होईल. यावर्षी हिटव्हेवची स्थिती खूप राहण्याची शक्यता आहे.