तीन आठवड्यांनंतर पाकिस्तानवर मोठे संकट कोसळणार; इम्रान खानसमोर मोठे आव्हान By ऑनलाइन लोकमत | Published: April 29, 2021 1:26 PM
1 / 10 कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत पाकिस्तानचे खेळाडू भारताला मदत करण्याचे आवाहन करत असले तरी देखील पुढील काही दिवसांत भारतच पाकिस्तानींसाठी तारणहार म्हणून उभा ठाकण्याची शक्यता निर्माण झाली आहे. 2 / 10 कोरोना आणि महागाईच्या घोर संकटात सापडलेल्या पाकिस्तानवर आणखी एक मोठे संकट कोसळणार आहे. पाकिस्तानकडे केवळ तीन आठवडेच पुरेल एवढा गहू शिल्लक आहे. पाकिस्तानचे अर्थमंत्री शौकत तारीन यांनी सांगितले की, पाकिस्तानला तातडीने 60 लाख मेट्रीक टन गव्हाची गरज आहे. 3 / 10 नॅशनल प्राईज मॉ़निटरिंग कमिटीने (NPMC) नुसार यंदा गव्हाचे अंदाजे उत्पादन हे 2.6 कोटी मेट्रीक टन होईल असे सांगितले आहे. जे येणाऱ्या वर्षाच्या एकूण वापरापेक्षा 30 लाख टन कमी आहे. यामुळे देशाला गहू आयात करून साठा करावा लागणार आहे. 4 / 10 तारीन हे कमिटीसोबत पहिलीच बैठक घेत होते. यामध्ये गव्हाची टंचाई होणार असल्याचे समोर आले आहे. NPMC ही अशी समिती आहे जिच्याकडे कायदेशीररित्या कोणताही निर्णय घेण्याचा अधिकार नाही. 5 / 10 देशात गव्हाचा साठा हा गेल्या आठवड्यानुसार 647,687 एवढाच उरला आहे. सध्याच्या मागणीप्रमाणे हा साठा केवळ अडीज आठवडेच पुरणार आहे. एप्रिलच्या शेवटी हा साठा कमी होऊन 3,84,000 मेट्रीक टन उरणार आहे. पाकिस्तानात सध्या गव्हाची कापणी सुरु आहे. हा गहू बाजारात येण्यात अजून महिना दोन महिने लागण्याची शक्यता आहे. 6 / 10 एनपीएमसीने दिलेल्या आकडेवारीनुसार पाकिस्तानच्या पंजाब प्रांतात स्टॉक ४ लाख मेट्रीक टन, सिंधमध्ये 57,000 मे.टन, खैबर पख्तूनख्वाहमध्ये 58,000 मे. टन आणि PASSCO मध्ये 140,000 मे. टन पेक्षा कमी साठा शिल्लक आहे. 7 / 10 बलुचिस्तान सरकारने गव्हाचा काहीच साठा केलेला नाही. या संकटामुळे तारीन यांनी प्रांतीय सरकारांना तातडीने गहू आणि साखर खरेदी करण्याचे आदेश दिले आहेत. 8 / 10 गेल्या वर्षी 2.6 कोटी मे. टन गव्हाचे उत्पादन झाले होते. देशातील गरजेसाठी पाकिस्तानला 21 लाख मे. टन गहू आयात करावा लागला होता. 2021-22 साठी पाकिस्तानला 2.93 कोटी मे. टन गहू लागणार आहे. यामुळे पाकिस्तानला ३० लाख मे. टन गहू आयात करावा लागणार आहे. 9 / 10 सावधगिरी म्हणून देशात ६० लाख मेय टन गहू साठवण्याची गरज आहे. यामुळे पाकिस्तानला पुढील आठवड्यापर्यंत परदेशांतून हा गहू मागवावा लागणार आहे. एवढ्या पटकन गहू मिळविण्यासाठी पाकिस्तानकडे भारतच एक पर्याय आहे. 10 / 10 २०१८ मध्ये इम्रान खान सत्तेत आल्यापासून पाकिस्तानात गव्हाची आणि पिठाची किंमत दुप्पट झाली आहे. साखर, तेल, चिकन, अंडी आणि भाज्यांची किंमत गगनाला भिडली आहे. आणखी वाचा