Wheat will be exported from India to Afghanistan via Pakistan
अखेर पाक झुकलाच, पाकिस्तान मार्गे अफगाणिस्तानला भारताकडून होणार गव्हाची निर्यात By ऑनलाइन लोकमत | Published: January 29, 2022 5:02 PM1 / 12अफगाणिस्तानात तालिबान (Afghanistan Taliban) सत्तेत आल्यापासून अफगाणिस्तानातील जनतेला अनेक समस्यांचा सामना करावा लागत आहे. अशातच आता भारताकडून अफगाणिस्तानला मदत पोहोचवली जाणार आहे. 2 / 12अफगाणिस्तानसाठी पाकिस्तानमार्गे गव्हाची पहिली खेप पुढील महिन्यात रवाना होण्याची शक्यता आहे. रिपोर्टनुसार अनेक महिन्याच्या चर्चेनंतर अफगाणिस्तानसाठी गव्हाची खेप पोहोचवण्यासाठी सहमती देण्यात आली आहे.3 / 12अफगाणिस्तानातील जनतेसमोर उभं असलेल्या संकटाकत मानतावादी दृष्टीकोनातून मदत करण्यासाठी भारत प्रयत्नशील होता. ५० हजार टन गहू आणि औषधे पाकिस्तानमार्गे रस्ते वाहतुकीने अफगाणिस्तानला पाठवण्याची घोषणा यापूर्वीच करण्यात आली होती. 4 / 12याशिवाय अफगाणिस्तानवर तालिबाननं ताबा मिळवल्यानंतर त्या ठिकाणची बिघडलेली परिस्थिती पाहता गेल्या वर्षी पाकिस्ताननं आपल्या भूमी मार्गे अफगाणिस्तानला भारताकडून ५० हजार मेट्रिक टन गहू पाठवण्याची मंजुरी दिली होती.5 / 12राजनैतिक सूत्रांनी 'द एक्सप्रेस ट्रिब्यून' वृत्तपत्राला सांगितलं की, फेब्रुवारीमध्ये गव्हाची खेप पाठवण्याचं काम सुरू होईल. विहित कार्यपद्धतीनुसार, भारताला पहिल्या खेपाच्या ३० दिवसांच्या आत एकूण गव्हाची वाहतूक करावी लागणार आहे. 6 / 12तणावपूर्ण संबंध असतानाही दोन्ही देशांनी अफगाणिस्तानवर सहकार्य करण्याचा निर्णय घेतला आहे. पद्धतींवर सहमती देण्यासाठी दोन्ही बाजूंनी अनेक आठवडे चर्चा केली असल्याचंही सांगण्यात आलं.7 / 12सुरुवातीला, पाकिस्तानला संयुक्त राष्ट्रांच्या ध्वजाखाली मानवतावादी मदतीच्या वस्तू अफगाणिस्तानला त्यांच्या ट्रकमधून पोहोचवायच्या होत्या. 8 / 12भारतीय किंवा अफगाण ट्रकमधून अन्नधान्य अफगाणिस्तानला पाठवण्याचा प्रस्ताव भारतानं मांडला. नंतर दोन्ही बाजूंनी सहमती दर्शवली की गव्हाची वाहतूक अफगाण ट्रकद्वारे केली जाईल आणि अफगाण कंत्राटदारांची यादी पाकिस्तानला दिली गेली.9 / 12परराष्ट्र कार्यालयाचे प्रवक्ते असीम इफ्तिखार अहमद यांनी शुक्रवारी पत्रकारांना सांगितले की, आता सर्व व्यवस्था करण्यात आल्या आहेत आणि पहिली खेप केव्हा पोहोचवली जाईल या तारखेची वाट पाकिस्तान पाहत आहे. 10 / 12भारताने गेल्या वर्षी ७ ऑक्टोबर रोजी पाकिस्तानला ५० हजार टन गहू आणि जीवनरक्षक औषधे पाकिस्तानच्या भूमीमार्गे अफगाणिस्तानच्या लोकांना पाठवण्यासाठी ट्रान्झिट सुविधेचा प्रस्ताव पाठवला होता आणि त्यानंतर २४ नोव्हेंबर रोजी पाकिस्तानकडून याचं उत्तर मिळालं होतं.11 / 12शुक्रवारी नवी दिल्ली येथे एका ऑनलाइन मीडिया ब्रीफिंगमध्ये अफगाणिस्तानला मानवतावादी मदतीबद्दल विचारले असता, परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते अरिंदम बागची यांनी माहिती दिली. अफगाणिस्तानला काही वस्तूंचा पुरवठा केला जाणार असल्याचं त्यांनी सांगितलं.12 / 12अन्नधान्य, कोरोना प्रतिबंधात्मक लसी आणि जीवनावश्यक गोष्टींसह अफगाण लोकांना मानवतावादी मदत देण्यासाठी सरकार वचनबद्ध आहे. सध्या गव्हाची खरेदी व वाहतूक करण्याचे काम सुरू असून त्यासाठी थोडा वेळ लागत असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं. आणखी वाचा Subscribe to Notifications