When was the beginning of April Fools
एकमेकांना मुर्ख बनविण्याची एप्रिल फूल प्रथा कधीपासून आली? By ऑनलाइन लोकमत | Published: April 01, 2019 12:45 PM1 / 61 एप्रिल ही तारीख लहानपणापासून आपल्या डोक्यात फिट बसली आहे. याचं कारणही तसेच आहे, एप्रिल फूल म्हणजे समोरच्याला मुर्ख बनवण्याचा हा दिवस. तसा हा दिवस नेहमीसारखाच. यात काही वेगळे नाही पण थोडीशी गंमत जोडली असते. 2 / 6एरव्ही काही लोक एकमेकांना मूर्ख बनवताच पण हा खास ‘फुल’ म्हणजे मूर्खांचा दिवस म्हणूनच ओळखला जातो. एखाद्याला मुर्ख बनवले की ‘एप्रिल फुल डब्बा गुल’ म्हणत समोरच्याला चिडवले जाते. मात्र हा दिवस आला कुठून याचीही वेगळी गोष्ट आहे. 3 / 6एप्रिल फुलबद्दल आतापर्यंत अनेक तर्कवितर्क लढवले जातात. १५८२ मध्ये पोप तेरावे ग्रेगरी यांनी रोमन कॅलेंडर आणलेमात्र त्याआधी सगळेच जण १ एप्रिलला नववर्ष साजरे करायचे पण पोपच्या नव्या दिनदर्शिकेने सारा घोळच झाला. या नव्या दिनदर्शिकेनुसार आता सगळ्यांनी १ एप्रिल ऐवजी १ जानेवारीला नववर्ष साजरं करावं असा आदेश काढण्यात आला.4 / 6रातोरात फर्मान काढून जर कोणी आपले सणच बदलले म्हणून अनेकांना ते रुचलं नाही, त्यामुळे लोकांनी याला कडाडून विरोध केला. काही असेही लोक होते ज्यांनी मात्र १ जानेवारीला नववर्ष साजरं करण्यास ठाम नकार दिला 5 / 6आम्ही १ एप्रिललाच नववर्ष साजरं करू या निर्णयावर ते ठाम राहिले. त्यामुळे या सगळ्यांनाचा मुर्ख ठरवण्यात आले. तेव्हापासून १ एप्रिल हा दिवस मुर्खाचा दिवस म्हणजे ‘एप्रिल फुल’ डे साजरा करण्यात येऊ लागला.6 / 6इतकचं नाही तर १३ व्या शतकात इंग्लंडचा राजा रिचर्ड सेकंड व बोहेमियाची राजकुमारी यांचा साखरपुडा ठरला व त्याची तारीख ३२ मार्च १३८१ अशी जाहीर केली गेली. लोकांनीही या तारखेवर विश्वास ठेवला पण मार्चमध्ये ३२ ही तारीखच नाही हे कुणाच्याच लक्षात आले नाही. म्हणजेच एक प्रकारे ते मूर्ख ठरले. व ३२ मार्च म्हणजे १ एप्रिल असा ही अर्थ त्यातून काढला गेला. आणखी वाचा Subscribe to Notifications