शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Coronavirus : 'महासाथ अजून संपलेली नाही', WHO प्रमुखांचा जगाला इशारा; म्हणाले, "कोरोना तेव्हाच संपेल जेव्हा..."

By ऑनलाइन लोकमत | Published: October 25, 2021 1:40 PM

1 / 8
सध्या अनेक ठिकाणी कोरोना महासाथीचा (Coronavirus Pandemic) प्रादुर्भाव कमी होताना दिसत आहे. असं असलं तरी त्याची धोका अद्यापही पूर्णपणे टळलेला नाही.
2 / 8
करोना महासाथीचा प्रादुर्भाव अद्याप पूर्णपणे संपलेला नाही आणि जगाला याचा सामना करण्यासाठी सार्वजनिक आरोग्य उपकरणांचा प्रभावीपणे वापर करण्याची आवश्यकता आहे. जगाला जेव्हा ही महासाथ संपवण्याची इच्छा असेल तेव्हाची ही महासाथ संपेल, असं वक्तव्य जागतिक आरोग्य संघटनेचे प्रमुख टेड्रोस एडनम घेब्रेयेसस यांनी केलं.
3 / 8
कोरोनाची महासाथ तेव्हाच संपेल जेव्हाला जगाला ती संपवायची असेल. ते आपल्या हातात आहे, असं टेड्रोस बर्लिनमध्ये वर्ल्ड हेल्थ समिटला संबोधित करताना म्हणणाले. एएनआय या वृत्तसंस्थेनं यासंदर्भातील वृत्त दिलं आहे.
4 / 8
आपल्याकडे ती सर्वच उपकरणं आहेत, ज्यांची आपल्याला आवश्यकता आहे. आपल्याकडे सार्वजनिक आरोग्य उपकरणं आणि प्रभावी उपचारासाठी उपकरणं आहे. परंतु जगानं त्याचा वापर योग्यरित्या केला नाही. एका आठवड्यात ५० हजार जणांचा मृत्यू झाला आहे. यावरून ही महासाथ संपलेली नाही, असंही त्यांनी स्पष्ट केलं.
5 / 8
यावेळी त्यांनी जगाला लसीकरणाची मोहीम अधिक तेजीनं राबवण्याचं आवाहन केलं. यापूर्वीही अनेकदा जागतिक आरोग्य संघटनेनं कोरोना महासाथीवरून जगाला इशारा दिला होता.
6 / 8
देशातील कोरोनाची दुसरी लाट हळूहळू ओसरत आहे. कोरोना रुग्णांची संख्या नियंत्रणात आली आहे. मात्र महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशची चिंता वाढवणारी माहिती समोर आली आहे. दोन्ही राज्यांमध्ये डेल्टा व्हेरिएंट (AY.4.2) आढळून आला आहे.
7 / 8
मध्य प्रदेशच्या इंदूरमध्ये नव्या व्हेरिएंटचे ७ रुग्ण आढळून आल्याचं वृत्त टाईम्स ऑफ इंडियानं दिलं आहे. नॅशनल सेंटर ऑफ डिजीज कंट्रोलच्या जिनॉम सिक्वन्सिंग अहवालातून ही माहिती समोर आली आहे. नव्या व्हेरिएंटची लागण झालेल्या सात जणांपैकी दोन जण लष्कराचे अधिकारी असल्याची माहिती मुख्य वैद्यकीय आणि आरोग्य अधिकारी डॉ. बी. एस. सैत्या यांनी दिली. यासोबतच महाराष्ट्रातील एक टक्का नमुन्यांमध्ये हा व्हेरिएंट आढळून आला आहे.
8 / 8
डेल्टा AY.4.2. म्युटेशनवर संशोधन सुरू असल्याची माहिती ब्रिटनच्या आरोग्य सुरक्षा यंत्रणेनं २० ऑक्टोबरला दिली आहे. या व्हेरिएंटच्या प्रसाराचा वेग अधिक आहे. त्यामुळे त्याला VUI-21OCT-01 असं शास्त्रीय नाव देण्यात आलं आहे. गेल्या काही महिन्यांपासून या व्हेरिएंटनं ब्रिटनमध्ये धुमाकूळ घातला आहे. डेल्टाच्या तुलनेत या व्हेरिएंटच्या प्रादुर्भावाचा वेग जास्त आहे.
टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याWorld health organisationजागतिक आरोग्य संघटनाCorona vaccineकोरोनाची लस