शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Narendra Modi: मोदी-बायडेन क्वाड बैठकीत असताना...! रशिया-चीनची अण्वस्त्रवाहू बॉम्बर हवेत झेपावलेली, जपान सीमेपर्यंत

By ऑनलाइन लोकमत | Published: May 25, 2022 2:29 PM

1 / 8
जपानमधील क्वाड देशांच्या बैठकीवेळी चीन आणि रशियाने मोठी आगळीक केली आहे. मुद्दामहून क्वाडच्या नेत्यांना घाबरविण्याचे प्रयत्न करण्यात आले आहेत. जपानच्या सीमेवर कधी नव्हे एवढी तणावाची स्थिती निर्माण झाल्याचे समोर आले आहे.
2 / 8
क्वाड देशांची बैठक सुरु असताना चीन आणि रशिया संयुक्त युद्धाभ्यास करत होते. युक्रेन युद्धानंतरचा युद्धाभ्यास असल्याने महत्वाचा मानला जात होता. मात्र, या दोन देशांनी दोन अण्वस्त्रवाहू बॉम्बर विमानांसह चार फायटरजेट जपानच्या दिशेने वळविली आणि खळबळ उडाली.
3 / 8
कोणालाही हे दोन देश असे करतील याचा हासभास नव्हता. जपानच्या रडारवर ही विमाने दिसताच जपानी हवाईदल लागलीच सक्रीय झाले आणि फायटर जेटना जपानच्या आकाशात घिरट्या घालण्याचे आदेश दिले.
4 / 8
रशियाने TU-95 आणि चीनने H-6 अणुबॉम्बवाहू बॉम्बर विमान जपानच्या सीमेवर पाठविले होते, असे जपानने सांगितले. याचा व्हिडीओ देखील जारी करण्यात आला आहे. ही विमाने अशावेळी जपानच्या सीमेवर आली होती, जेव्हा भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन, जपान आणि ऑस्ट्रेलियाच्या पंतप्रधानांची बैठक सुरु होती.
5 / 8
रशिया आणि चीनच्या या कृत्यामुळे सावध झालेल्या जपानी हवाईदलाच्या मदतीला तातडीने दक्षिण कोरियाची लढाऊ विमानेही हवेत झेपावली होती. रशिया आणि चीनच्या या विमानांनी जपानी समुद्र, पूर्वेकडील चीन समुद्र आमि पश्चिमेकडील प्रशांत महासागरावर उड्डाण केले. दोन देशांनी यापूर्वीही युद्धाभ्यास केला आहे. परंतू क्वाड बैठकीच्या दिवशी ही आगळीक केल्याने संपूर्ण दक्षिण चायना सीमध्ये तणाव पसरला होता.
6 / 8
चारही देशांचे नेते चीनच्या दादागिरीला लगाम घालण्यासाठी बैठक करत होते. या देशांना घाबरविण्यासाठी रशिया आणि चीनने ही आगळीक केल्याचे सांगितले जात आहे.
7 / 8
रशिया आणि चीनची लढाऊ विमाने अनेकदा द. कोरियाच्या आकाशात घुसखोरी करतात. रशिया कोरियाच्या एडीआयझेड हद्दीला मानत नाही. तर चीन म्हणते की या भागातून येण्याजाण्यास पूर्ण मोकळीक आहे. रशियाच्या संरक्षण मंत्रालयानुसार हा युद्धाभ्यास १३ तास सुरु होता.
8 / 8
रशिया आणि चीनने अमेरिकी विमानांना उद्ध्व्स्त करण्यासाठी ही लढाऊ विमाने आणि बॉम्बर तयार केली आहेत. हीच ताकद दाखविण्यासाठी घाबरविण्याचा प्रयत्न करण्यात आला. पुतीन यांनी या विमानाचा वापर फेब्रुवारीत ब्रिटनला घाबरविण्यासाठी केला होता. हे विमान युरोपच्या दिशेने पाठविले होते.
टॅग्स :russiaरशियाchinaचीनNarendra Modiनरेंद्र मोदीJoe Bidenज्यो बायडन