आकाशात दिसला रहस्यमय असा पांढरा फुगा; लोक म्हणाले, 'एलियन शिप' By ऑनलाइन लोकमत | Published: June 19, 2020 12:44 PM1 / 8एका पांढऱ्या रंगाच्या रहस्यमय फुग्यामुळे जपानमधील लोक आश्चर्यचकित झाले आहेत. आकाशातील हा रहस्यमय फुगा पाहिल्यानंतर सोशल मीडियामध्ये विविध चर्चा रंगल्या आहेत. 2 / 8सोशल मीडियात या रहस्यमय फुग्याला काही लोक युएफओ म्हणत आहेत. तर काही लोक कोरोना व्हायरस आणि उत्तर कोरिया व एलियन्स यांच्याशी याचा संबंध जोडत आहेत.3 / 8वृत्तसंस्था रॉयटर्सने दिलेल्या वृत्तानुसार, जपानच्या सेंदई शहरातून घेतलेल्या टेलिव्हिजन फुटेजमध्ये एका क्रॉसच्या वरती फुग्याच्या आकाराची वस्तू दिसली. 4 / 8या फुग्याच्या खाली दोन क्रॉस प्रोपेलर्स होते, जे त्याला उड्डाण करण्यास मदत करीत होते. पहिल्यांदा लोकांना वाटले की हा जपानच्या हवामान खात्याचा फुगा असणार. मात्र, हवामान खात्याने याला नकार दिला. 5 / 8हवामान खात्याने सांगितले की, 'असा कोणताही फुगा आम्ही आकाशात सोडलेला नाही. हा रहस्यमय फुगा पहाटेच्या वेळेस दिसला. बरेच वेळ हा फुगा एकाच ठिकाणी होती. त्यानंतर ढगांमुळे तो दिसेनासा झाला.'6 / 8बुधवारी दुपारपर्यंत जपानच्या ट्विटरवर हा फुगा ट्रेंडिंगमध्ये आला. अनेकांनी या फुग्याला युएफओ आणि उत्तर कोरियाने पाठवल्याचे म्हटले. 7 / 8तर काही युजर्सनी हा कोरोना व्हायरसचा फैलाव करत असावा, असेही म्हटले आहे. 8 / 8दरम्यान, हा फुगा कोठून आला आणि तो कोठे गेला हे आमच्या सरकारला माहिती नाही. तसेच, तो कोणाच्या मालकीचा आहे, हे देखील आपल्याला माहीत नाही, असे जपान सरकारचे मुख्य कॅबिनेट सचिव योशीहाइड सोगा यांनी सांगितले. आणखी वाचा Subscribe to Notifications