शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

धोका वाढला! "जगात कोरोनापेक्षाही अधिक घातक व्हायरस येऊ शकतो"; WHO प्रमुखांचा गंभीर इशारा

By ऑनलाइन लोकमत | Published: May 25, 2021 6:17 PM

1 / 16
जगभरात कोरोनाचा हाहाकार पाहायला मिळत आहे. कोरोनाने संपूर्ण जगाला विळखा घातला आहे. रुग्णांच्या संख्येने तब्बल 16 कोटींचा आकडा पार केला असून लाखो लोकांचा मृत्यू झाला आहे.
2 / 16
कोरोनामुळे अनेक देशांत गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. रुग्णांच्या आणि मृतांच्या संख्येत वाढ होत असल्याने पुन्हा एकदा लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली आहे. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी खबरदारीचे उपाय केले जात आहेत.
3 / 16
जगातील सर्वच देश कोरोनाच्या महाभयंकर संकटाचा सामना करत असताना आता पुन्हा एकदा धडकी भरवणारी माहिती समोर आली आहे. 'जगात कोरोनापेक्षाही अधिक घातक व्हायरस येऊ शकतो' असा गंभीर इशारा देण्यात आला आहे.
4 / 16
जागतिक आरोग्य संघटनेचे प्रमुख टेड्रोस घेब्रेयेसस यांनी याबाबत इशारा दिला आहे. जागतिक आरोग्य संघटनेचे सभासद असलेल्या 194 देशांच्या आरोग्य मंत्र्यांच्या वार्षिक बैठकीत ते बोलत होते.
5 / 16
जगभरात अद्याप ही भयंकर स्थिती निर्माण झालेली आहे. वेगाने कोरोनाची लसीकरण केल्यानंतरही आजाराचा धोका संपणार नाही अशा गंभीर इशारा देण्यात आल्याची त्यांनी माहिती दिली आहे,
6 / 16
जागतिक आरोग्य संघटनेच्या प्रमुखांनी सांगितले की, कोरोना व्हायरस आणि त्याच्या नवनवीन व्हेरिएंटचा प्रसार होत आहे अशा वेळी कोणतीही खबरदारींबाबत शिथिलता बाळगणे चुकीचे ठरू शकते.
7 / 16
संपूर्ण जग अखेरच्या महासाथीच्या आजाराचा सामना करत नाही. तर कोरोनाच्या तुलनेत आणखी घातक आणि संसर्गजन्य असलेल्या व्हायरसचा प्रसार होण्याचा धोका असल्याचं देखील त्यांनी म्हटलं आहे.
8 / 16
टेड्रोस यांनी कोरोना लसीचा साठा करणाऱ्या देशांनाही यावेळी सुनावले. त्यांनी म्हटले की, लशीच्या वितरणात जगभरात अपमानास्पद असमानता निर्माण झाली आहे. जगातील एकूण 75 टक्के कोरोना लस फक्त 10 देशांमध्ये देण्यात आली आहे.
9 / 16
गरिब देशातील नागरिकांचे जीव वाचवण्यासाठी नवीन लक्ष्य ठरवण्यात आले आहे. लस साठा करून ठेवणाऱ्या देशांनी गरिब देशांना लसी द्याव्यात असं आवाहन त्यांनी केलं आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.
10 / 16
जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) कोरोनामुळे झालेल्या मृत्यूबद्दल महत्त्वाचं विधान केलं आहे. कोरोना महामारीत होणाऱ्या सर्वच मृत्यूंची नोंद झालेली नाही असं म्हटलं आहे. WHO ने सरकारी आकडेवारीनुसार जे आकडे आपल्यासमोर येत आहेत त्यापेक्षा खूप जास्त रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झालेला आहे.
11 / 16
WHO म्हणण्यानुसार आतापर्यंत 60 ते 80 लाख लोकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. मात्र, आत्तापर्यंत अधिकृत जगात 34.46 लाख लोकांचा मृत्यू झाल्याची नोंद आहे. सर्वच देश कोरोनाच्या संकटाचा सामना करत आहेत.
12 / 16
वार्षिक ग्लोबल हेल्थ स्टॅटिस्टिक्स रिपोर्ट जारी करताना जागतिक आरोग्य संघटनेनं म्हटलं आहे की, कोरोनामुळे वर्ष 2020 मध्येच जवळपास 30 लाख लोकांचा मृत्यू झाला आहे. मात्र, जगातील विविध देशांनी केलेल्या नोंदीनुसार ही आकडेवारी 12 लाखांच्या आसपास आहे.
13 / 16
कोरोनामुळे प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष मोठ्या प्रमाणात लोकांचा मृत्यू होत आहे. मात्र, या सर्वच आकडेवारीची आपल्याकडे नोंद झालेली नाही. अनेक ठिकाणाहून समोर येणारे आकडे प्रत्यक्षात खूप मोठे असल्याची भीती आरोग्य संघटनेनं व्यक्त केली आहे.
14 / 16
मे 2021 पर्यंत कोरोनामुळं 34 लाख लोकांचा मृत्यू झाला आहे. मात्र ही सरकारी आकडेवारी असून खरी संख्या दोन ते तीन पट अधिक असण्याची दाट शक्यता आहे, असे जागतिक आरोग्य संघटनेच्या असिस्टट डायरेक्टर-जनरल (डेटा आणि एनालिटिक्स विभाग) समीरा आसमा यांनी सांगितले आहे.
15 / 16
'आपल्याला दिसत असलेल्या आकडेवारीपेक्षा खरे आकडे दोन ते तीन पट अधिक आहेत. त्यामुळं माझ्या मते आत्तापर्यंत 60 ते 80 लाख लोकांचा कोरोनामुळं मृत्यू झाला आहे. दुसऱ्या आणि पहिल्या महामारीतही अनेक ठिकाणी रुग्णांना दवाखाने आणि खाट उपलब्ध होऊ शकत नव्हते, तेवढी आरोग्य व्यवस्थाच नव्हती.'
16 / 16
'नोंदीपेक्षा अधिक मृत्यू झाले असावेत' असं म्हटलं आहे. WHO चे डेटा एनालिस्ट विलियम मेसेम्बूरी यांनीही आसमा यांच्या मताला दुजोरा दिला आहे. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी जगभरात विविध उपाय केले जात आहेत.
टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याDeathमृत्यूWorld health organisationजागतिक आरोग्य संघटना